२८ फेब्रु, २०१६

शमसुल इस्लामची बकरी ईद # 1 (शिखीस्तान )

शमसुल इस्लामची बकरी ईद (शिखीस्तान )
शमसुल इस्लाम नामक महाभागाने सावरकरांवर एक - दोन टुकार पुस्तके लिहिली आहेत . त्यातील बराचसा भाग हा खोटा , अपलापी आणि लबाडीने भरलेला आहे. शमसुद्दिनच्या शेळ्या नामक नवी प्रजात महाराष्ट्रात उदयाला आली असून इस्लामच्या पुस्तकातील दाखले देत सावरकराना बदनाम करण्याचे उद्योग सुरु आहेत . नाशिकचे निरंजन टकले हे  या बकरी ईद मधील प्रमुख खाटिक होत . सावरकर हा माणुस ब्रोकन म्यान - शेळी आहे असे म्हणत टकल्याने विकृती सुरु केली आहे.    त्यांचा प्रतिकार आम्ही अवश्य करु. 

शमसुल च्या भिकार पुस्तकातले खोटे दाखले सोशल मिडियावर  टाकून फुरोगामित्व सिद्ध करण्याची स्पर्धा सुरु आहे. त्यातले नवे प्रकरण - म्हणजे सावरकर हे (शिखीस्तान ) खलिस्तान वादि  होते असा दडपून खोटा प्रचार होय. सावरकर काही देव नव्हेत ! त्याचे अनेक विचार चूक असू शकतात . आहेतही . पण आकस आणि लबाडीने केलेले खोटे आरोप --  हे भारताचे वैचारिक विश्व प्रदूषित करण्याचे लाल कारस्थान आहे. त्याचा कठोर प्रतिवाद आणि जबर प्रतिकार आवश्यक आहे. 


शमसुल इस्लाम            निरंजन टकले            विनायक  सावरकर  


तर नाशिकच्या निरंजन टकलेने आधी द विक मध्ये एक लबाड लेख लिहिला . त्याचे साधार खंडन प्रा बालाजी चिरडे (इंग्रजी ) आणी डॉ श्रीरंग गोडबोले यांनी (मराठीत) केले आहे. त्याचे उत्तर न देता -- टकले खाटिक  पुन्हा शमसुल इस्लामच्या भामट्या पुस्तकातले फोटू सोशल मिडीयावर टाकत आहे . यासाठी त्यांची प्रेरणा काय ? हे मला अजून समजले नाही . निरंजन नावाच्या दिवट्याला आर्थिक लोभ वा बौद्धिक दारिद्र्य या दोन प्रेरणा असू शकतिल . त्यावर निश्चित उपाय शोधला पाहिजे. असो.  

शमसुल इस्लामने सावरकरांना द्विराष्ट्रवादी - त्री राष्ट्रवादी ठरवण्याचा घाट घातला आहे . इस्लामने कुराण वाचले आहे काय ? दार उल हरब आणि दार उल इस्लाम - जिहाद - काफिर इत्यादी इस्लामी कुराणि  संकल्पना शमसुल ला माहित असाव्यात. तरी हा लबाड माणूस सावरकरामुळे   फाळणी झाली इत्यादी बडबड करतो आहे . सावरकरांचा शिखीस्तान / खलिस्तान ला पाठिंबा होता असा अत्यंत नीच आरोप इस्लामने केला … नंतर टकल्याने प्रचारला.

निरंजन टकले साहेबांनी  शमसुल इस्लामच्या पुस्तकातील एक फोटू सोशल मिडीयावर टाकला आहे . अनभ्यस्त आडाणि (माफ) पण  अभ्यासू नेहरूवादी सुद्धा टकले- इस्लाम  समर्थनार्थ जागृत झाले आहेत. हा तो  फ़ोटो. 




हे म्हणजे सावरकर खलिस्तान वादि  होते याचा पुरावा म्हणून  दाखवलेले तर्कट होय . भारताच्या इतिहासाचा थोडातरी अभ्यास कथित अभ्यस्त लोक्स चा आहे काय ? सावरकर खलिस्तान / शिखीस्तान  वादि  होते ? हा विनोद आहे कि वेडाचार ?? किती नीचपणा करावा ? किती खोटे बोलावे ? हरामखोरीला काय हद्द असावी ?  

सदर वक्तव्य हे सावरकरांनी प्रांत सरकारच्या निवडणुकी संदर्भात केले आहे . शिखांनी सैन्यात जावे . निवडणुका लढवाव्यात. शीख समाज राजकीय द्रुश्ट्या पुढे आला पाहिजे. शिखांनी काबुल कराची पर्यंत राज्य केले आहे. फाळणी टाळली पाहिजे . मुस्लिम लीगचे फाळणीचे दिवास्वप्न ज्या दिवशी विरेल तेव्हा त्याना पाकिस्तान ऐवजी पंजाबात शिखिस्तान दिसेल असे सावरकरांचे म्हणणे आहे .हे जे शिखीस्तान सावरकर बोलत आहेत ते फ़ाळणिचा विरोध करण्यासाठी आहे . सदर मतलब वेगळा शिखांचा देश असा नसून शिखांचे राजकारणातील प्राबल्य असा आहे. सावरकरांचे सदर निवेदन संपुर्ण  वाचले तर सावरकर काय बोलत आहेत ते ध्यानात येईल …. पण खोटारड्या पेड पोंगा पत्रकारांनी काहीही वाचलेले नाही. ते आहेत इस्लामचे नोकर … असो … सावरकरांचे  मुळ स्टेट्मेंट असे : -






अतिशय स्पश्ट्पणे सावरकरांनी वरील निवेदनात अखंड भारताचा पुरस्कार आणि शिखांनी मुस्लिम लीगला चेक मेट करण्यासाठी ताकद वाढवावी असे म्ह्टले आहे. टाकल्याला आणि त्याच्या इस्लामी गुरूला इंग्लिश वाचता येत्ये - पण केवळ खोटे बोलून भारताचा घात करणारी हि जमात आहे. आणि अगदी स्पष्टपणे हि किड आहे . विकृती आहे. 

खरे पाहता भारतीय राजकारणाच्या इतिहासात सावरकर हा अतिशय लहान विषय आहे . त्यांचे राजकीय महत्व मर्यादित आहे. सावरकरांचे  विचार बुद्धिवादी - विज्ञान निष्ठ होते , पण त्याना फारसे अनुयायी  मिळाले नाहीत.  जे मिळाले ते भक्त होते . त्यांनी सावरकरांची पूजा केली - चिकित्सा केलीच नाही ! त्यामुळे सावरकर विचार कधी भारतीय राजकारणात महत्वाचा बनेल याची शक्यता शून्य आहे. कारण त्यांच्या अनुयायांना बुद्धिवाद हि गोष्ट समजलेली नाही - समजणार नाही . ज्या नास्तिक  - पुरोगामी लोकांनी बुद्धिवादी  सावरकर आपले म्ह्टले पाहिजेत - ते मुख्यत: संघविरोधासाठि सावरकर विरोध करत आहेत. सावरकरांचा कोणताच विचार संघाला परवडणारा नाही .  हे समजून घेण्याची बौद्धिक पात्रता पुरोगाम्यांकडे नाही. अवघड आहे सगळच…

असो सदर लेखमालेचे किती भाग होतील माहित नाही . हा #१ भाग आहे . जितक्या वेळेला टक्कल इस्लामी  नीचपणा केला जाइल तितक्या वेळा प्रतिकार करू . आणि या अर्थाने मी संघि सावरकरवादी  ठरलो तरी हरकत नाहि. 

२६ फेब्रु, २०१६

कम्युनिस्टांचे २१ देशद्रोह - (भाग १) : हैद्राबाद

कम्युनिस्टांचे २१ देशद्रोह  - (भाग १) :  हैद्राबाद
हे २१ देशद्रोह अपेक्षित आहेत . त्यात धक्कादायक काहीच नाही . जरा वाचन केले तर अशी हजारो उदाहरणे मिळतील . अमानुष हिंसा कम्युनिस्टांकडुन अपेक्षित आहे .  भारत कि बरबादी , काश्मीरची आझादी आणि जय अफजल च्या जेएनयु मधील घटना  मध्ये धक्कादायक काहीच नाही . हा  लल्यांचा राजकीय अजेंडा आहे. भारताचे हजार तुकडे करण्याचे स्वप्न कम्युनिस्ट का पाहतात ? त्यामागची लाल राजकीय भूमिका काय ? मार्क्सवाद हिंसक , देशद्रोही आणि मानवता विरोधक असण्याची वैचारिक कारणे काय ? हे शेवटच्या म्हणजे २२ व्या भागात पाहूया . हि लहान - लहान लेखांची मालिका आहे. रोज एक भाग.
--------------------------------------------------
कम्युनिस्टांचे २१ देशद्रोह  - (भाग १)  : हैद्राबाद मधील लाल उठाव
--------------------------------------------------

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ने भारतीय स्वातंत्र्याच्या पहाटेला हिंसेचे लाल विष कालवले. त्यामागचा इतिहास मोठा रंजक आहे. १५ ओगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला पण त्यातली संस्थाने - राजे राजवाडे नवाब लोक अजून भारतात सामील झालेले नाहीत. भारतविरोध आणि काफिर  प्रजेचे दमन करण्यासाठी निजामाच्या आशीर्वादाने हैद्राबाद संस्थानात 

२४ फेब्रु, २०१६

ख्रिस्ताचे हिंदुत्व : काही मूलभूत प्रश्न




बाबाराव सावरकर हे वि दा सावरकरांचे ज्येष्ठ बंधु. त्यांचे स्वतंत्र्य लढ्यातील योगदान महत्वाचे आहे. 



बाबाराव सावरकर हे वि दा सावरकरांचे ज्येष्ठ बंधु. त्यांचे स्वतंत्र्य लढ्यातील योगदान महत्वाचे आहे. 

बाबाराव यांनी  ख्रिस्ताचे हिंदुत्व नामक पुस्तक पूर्वी लिहिले होते.  सध्या ते पुन्हा प्रकाशित होते आहे . येशु ख्रिस्त हा तामिळी ब्राम्हण होता आणि त्याची मुंज झाली होती असे बाबाराव सावरकरांचे मत आहे. ख्रिस्त हा भारतात जन्मलेला हिंदु होता असे सिद्ध करणारे बरेच पुरावे (!) या पुस्तकात आहेत. 

प्रकाशन हा एक मुद्दा . पण त्यातला विचार सावरकर वाद्यांना मान्य आहे काय ? मान्य असेल तर पुढील प्रश्न निर्माण होतात

१) ख्रिस्त हा देशी भारतीय ठरतो. त्यामुळे ख्रिस्ती धर्म हा पण भारतीय ठरतो. हा देश पितृभूमी आणि पुण्यभूमी " असलेले" लोक म्हणजे हिंदु अशी वि दा सावरकरांची हिंदुत्वाची  व्याख्या आहे. त्यानुसार भारतातील ख्रिश्चन हे हिंदु ठरतात काय ?

२) मग ख्रिस्ती धर्मांतराला विरोध का  ? 

३) मक्केत शिवलिंग आहे  , इस्लाम चे प्रेषित मुहम्मद यांचा संस्कृत  भाषेत  समास विग्रह  महान मद: यस्य असा होतो .  (मुसळ मानव = मुसलमान ) - कारण श्रीकृष्णाच्या यादव कुळाला मुसळाचा शाप मिळाल्याचे दाखले पुराणात आहेत .  = श्रीकृष्णाचे यदुकुलीन वंशज म्हणजे मुसलमान होय …. अशा अनेक गोष्टी विद्वान इतिहासकार पु ना ओक यांनी सिद्ध केल्या आहेत . त्या मान्य आहेत काय ?

४) मान्य असतील तर इस्लाम ला अराष्ट्रीय का म्हणता ?  कृष्णाच्या वंशजांना (= मुस्लिमांना)  देशद्रोही का म्हणता ? 

५) बाबाराव आणि विनायकराव यांचे विचार एकच होते काय ? 




 ख्रिस्ती धर्मांतराला विरोध करण्याचे प्रयोजन काय ?

---------------------------------------------------
जाता जाता थोडी गंमत -

कथा : जय सीता रोमैय्या

बरका मुलानो-  रोम म्हणजे राम . सोनिया म्हणजे सीता . आज आपण राजीव लोचन राम आणि (सोनिया ) सितामैया यांची हिंदु गोष्ट ऐकायची आहे.

 तर मुलानो (रोम ) रामनगरीत एक पराक्रमी योद्धा राहत असे . (Stefano Maino) स्तवनमान्य असे त्याचे नाव होते . (Benito Mussolini) बंतोमुसलि राजाचा स्तवनमान्य हा एकनिष्ठ सेनापती होता . स्तवनमान्य सेनापतीस कन्यारत्न झाले. हत्तीवरून पेढे वाटण्यात आले . काही पेढे हत्तीच्या पायाखाली चिरडून चप्पट झाले. त्यासच हल्लीच्या रामनगरीत पास्ता असे म्हणतात. स्तवनमान्य सेनापतीने आपल्या कन्येचे नाव Edvige = (इ)द्विजे असे ठेवले होते.
द्विज म्हणजे ब्राम्हण- द्विजे म्हणजे ब्राम्हण कन्या - तर (इ)द्विजे म्हणजे संगणक शास्त्रात पारंगत अशी ब्राम्हण कन्या होय. यावरून हे सिद्ध होते कि, प्राचीन हिंदु संस्कृती इटाली पर्यंत पसरली होती व तेथील ब्राम्हण कन्या संगणक तज्ञ होत्या.




तर (इ)द्विजे ची पहिल्यापासून सीतेवर फार भक्ती त्यामुळे लोक तिला सितामैया असेच म्हणू लागले. या सितामैया चा अपभ्रंश सोनिया असा झाला . पुढे राजीवलोचन रामाने तिच्याशी विवाह केला . प्रभू राजीव लोचन राम व (बोफोर्स ) बर्फ़ासुर क्वात्रोची यांची कथा उद्या सांगेन बरका !! जय सीता रोमैय्या !!


---------------------------------------------------
याने जग जिंकता येत नाही . 

सुतावरून स्वर्ग गाठणे म्हणून एक वाक्प्रचार आहे. कृष्ण आणि ख्रिस्त या नावात काही साम्य आहे . निरनिराळ्या भाषात काही शब्द सारखे असतात . मानवी मेंदूची जडण - घडण मिळती जुळती असल्याने असे समान शब्द तयार होतात . त्याचा अर्थ कृष्ण वरून ख्रिस्त आला असा घेता येतो . त्यासाठी अफ़ाट धर्म वाङ्ग्मयातुन काही मिळते जुळते उतारे आणि श्लोक काढता येतात . या वर्णनात कृष्ण आणि ख्रिस्ता बरोबर - बराक ओबामा सुद्धा बसवता येतो. मानवी भाषा मानवी इतिहास , मानवी देह यष्टी आणि माणसाचे मन सर्वत्र सारखे असते . त्यामुळे ख्रिस्त म्हणजेच कृष्ण असे सिद्ध करता येते - ख्रिस्ती धर्मप्रचारक तसे करत असतात . हा प्रकार उलट्या बाजूनेही करता येतो. असे काही मौलिक इतिहास संशोधन आम्हीही करू शकतो - उदाहरणार्थ वरील मौलिक इतिहास संशोधन - कथा : जय सीता रोमैय्या . 

याने जग जिंकता येत नाही .
---------------------------------------------------

डॉ अभिराम दिक्षित




१९ फेब्रु, २०१६

वंश जातीवादी - कार्ल मार्क्स


 कम्युनिस्ट धर्माची चिकित्सा :( भाग  २)

  वंश जातीवादी  - कार्ल मार्क्स  

या सुधारित लेखासाठी कम्युनिस्टांच्या अधिकृत वेबसाइट्वारिल संदर्भ दिले आहेत. जुन्या लेखात आवश्यक ते  बदल केले आहेत.  टेक्निकल चुका सुधारल्या आहेत. 




कम्युनिस्ट धर्म  प्रेषित कार्ल मार्क्सने कृष्णवर्णीय निग्रोना  हीन दर्जाचे मानले होते. (आफ्रिकन योग्य शब्द ) किंबहुना काळ्या कातडीच्या लोकांच्या हिनतेचे - गुलामीचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष समर्थन मार्क्स च्या लिखाणात येते  .

जेएनयु मधील आजचे AISF  कन्हैय्या मार्क्सवादी  जगाला समता  - आणि सहिष्णुतेचे डोस पाजत आहेत. ते ढोंग आहे . कपट आहे. कम्युनिस्टांच्या नेणिवेतले कपट उघडे करण्यासाठी हा लेख …

 मार्क्स आणि मार्क्स वाद्यांच्या जाणिव आणि नेणिवेतील वंश वाद , वर्ण श्रेष्ठत्व आणि त्यांच्या हिंसक विचारांचा प्रस्तुत लेखात आढावा घ्यायचा आहे . त्यासाठी मार्क्सवाद्यांनिच  ऑनलाइन  प्रकाशित केलेले साहित्य  संदर्भ म्हणून वापरायचे आहे.  कम्युनिस्टांच्या  इंटरनेट  लिंक्स द्यायच्या आहेत.

 कामगार प्रश्नावरील प्रामाणिक लढयांसाठी कम्युनिस्ट बंधुंचे  अभिनंदन आणि  आभार मानून मी    त्यांना लाल सलाम करतो . कम्युनिस्ट अतिशय प्रामाणिक आणि बुद्धिमान आहेत - त्याबद्दल नमन - प्रोब्लेम त्यांच्या बॉस मध्ये आहे - कार्ल मार्क्स मध्ये आहे. मुलभुत कम्युनिस्ट विचार वाइट  आहे.

प्रस्तुत लेख हा  वाट चुकलेल्या  लाल बांधवांच्या --- मार्क्स अवतारा बद्दलच्या --- अंधश्रद्धा निर्मुलनाचा  नम्र प्रयत्न आहे.

मार्क्सने केलेली जातीय टिका 

३० जुलै १८६२ रोजी एंजल्स ला लिहिलेल्या पत्रात मार्क्स ने स्वत:च्या छळवादी शत्रूवर खालील टिका केलेली आहे : -
" आता मला स्पष्ट झाले कि लासाले  च्या डोक्याचा आकार आणि केसाचा पोत; त्याची निग्गर पाळेमुळे दर्शवतो. एकतर  तो  मोझेस ची साथ देणार्या काळ्या आफ्रिकनाचा वंशज असेल  अन्यथा -- त्याची आई वा आज्जी काळ्याशि रत झाली असेल --- जर्मन  ज्युचे सत्व आणि आणि काळा आफ्रिकी कच्चा माल  ( basic negroid stock ) याच्या मिश्रणातून  असलेच  विचित्र प्रोडक्ट तयार होणार .  लासाले चा आगाव हट्टीपणा  (importunate) एखाद्या  निग्गर  सारखाच आहे "  (संदर्भ १)

वर्ण वर्चस्व वाद मार्क्स च्या वाक्या - वाक्यातून ओसांडून वाहतो आहे.… मार्क्स आणि एंजल्स चा मुळातला पत्रव्यवहार जर्मन भाषेतून आहे.

जर्मनीतला बोली शब्द नेगार असा आहे .

 नेगार न वापरता … जर्मन पत्रातही मार्क्स आणि एंजल्स ने निग्गर  हाच इंग्रजी शब्द वारंवार वापरला आहे .  निग्गर हि अपमानास्पद शिवी आहे . रक्त भेसळ , कवटिचा आकार आणि केसाचा पोत यावरून माणसाच्या वर्ण - वंश आणि वर्तणुकीबद्दल  (importunate)  मार्क्सने केलेली टिप्पणी यात दिसते .

 हा शुद्ध वंशवाद आहे . हिटलरपूर्व  युरोपात या विचाराची पक्की पकड होती . मार्क्स वरही  त्याचा प्रभाव दिसतो. लासाले आणि मार्क्स चे काही आर्थिक कारणावरून विवाद झाले होते . आर्थिक कारणासाठी समोरच्या व्यक्तीचा वंश - शत्रूची जात  आणि त्याच्या कवटिचा आकार तपासणार्या मार्क्सच्या डोक्यात किती समता असेल ? मार्क्स बाबाने वरील पत्रात स्त्रियां विषयी वापरलेली भाषा लक्षात घेतली पाहिजे -








मार्क्स मत :  हीन वंशाचे काळे कृष्णवर्णीय 

मार्क्सचा वर्गलढा आणि समता गोऱ्या राष्ट्रातील गोऱ्या लोकांसाठी आहे . इतर राष्ट्रांना मार्क्स वाद लागू  असला  तरी शुद्ध वंश , हीन दर्जाचे वंश , मारून टाकण्याच्या लायकीचे वंश , गुलाम व्हायच्या लायकीचे वंश या तत्कालीन संकल्पना  मार्क्सच्या डोक्यात फ़िट्ट आहेत . ट्रीमोअ या वंशवादि शास्त्रज्ञा वर स्तुतिसुमने उधळत मार्क्स ने खालील मत व्यक्त केले आहे : -

" ट्रीमो चे संशोधन डार्विन पेक्षा अधिक योग्य आहे . त्याच्या विचाराचे ऐतिहासिक आणि राजकीय उपयोजन  महत्वाचे आणि   अधिक फलदायी ठरते …. ट्रिमो ने सिद्ध केले  आहे कि काळ्यांचा निग्रो वंश हा  उत्क्रांतीत हीन दर्जाला घसरलेला वंश होय . "  (संदर्भ २)  

ट्रिमॉअ वर मार्क्स भलताच भाळला होता.  याचे कैक पुरावे मार्क्स च्या साहित्यात मिळतात .  ट्रिमॉअ ने लावलेले  उत्क्रांती वादाचे असे  अनेक चुकीचे बोध  तत्कालीन युरोपात प्रचलीत होते.  सजीवाची उत्क्रांती प्रगतीकडे होते आणि काळे लोक हा उत्क्रांत सजीव नसून -   माकडाच्या   दिशेने खाली अधोगती झालेला अभागी जीव आहे असे हे ट्रिमॉ चे म्हणणे आहे . काळ्याचे माणूसपण ट्रिमो  नाकारतो . मार्क्स ने त्याला उचलून धरले आहे .

पण वंशवाद हे ट्रिमो आणि मार्क्सचे घोर अज्ञान आहे . वास्तविक पाहता  डार्विनचा विकसित  सिद्धांत  वंशभेद   खोडून काढतो आणि सर्व मानव  एकच आहेत अशा निष्कर्षाला आज येतो .( यावर अधिक माहिती साठी येथे क्लिक करा  . )

पण तत्कालीन युरोपने  डार्विनचा चुकीचा अर्थ काढत….  युजेनिक्स पासून हिटलरच्या वंश संहारापर्यंत अनेक विकृत प्रयोग केलेले होते . मार्क्स चा विचार तत्कालीन युरोपियन विचारा प्रमाणे जातीवादी - वंश - वर्ण श्रेष्ठत्व वादि असाच आहे .




कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स



मार्क्स एंजल्सचि युरोपियन जोडगोळी : १८४८ 

१७८९ सालची पहिली फ्रेंच राज्यक्रांति, १८०४ साली नेपोलियनचा राज्याभिषेक.  या पार्श्व भूमीवर १८४८ साली युरोपात सार्वत्री क्रांती - लढाया - बंडे आणि नव राष्ट्रवादाचा उदय झालेला दिसतो . मुख्यत: पश्चिम आणि मध्य युरोपातल्या देशात राजेशाही विरुद्ध बंड घडत होते. तंत्र - विज्ञानातली  प्रगती , औद्योगिक क्रांति , कामगार वर्गाचे शोषण , मध्यम वर्गाचा उदय यातून हा घनघोर संघर्ष पेटत होता .

राजांचे राजमुकुट पालथे पडले , सिंहासने मोडली…….  इटालीत लोकशाही , फ्रांन्स मध्ये फेब्रुवारी क्रांती , जर्मनीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुकार , डेन्मार्कची नवी राज्यघटना - हंगेरी , पोलंड , ब्राझील सार्या देशात १८४८ साली उठाव आणि युद्धे चालू आहेत . राजेशाहीकडून लोकशाहीकडे आणि सामंतशाहि कडुन घटनात्मक आधुनिक राज्य - राष्ट्रांकडे …… युरोपचा प्रवास चालू झाला आहे .


व्हर्नेअ या चित्रकाराचे १८४८ च्या अनागोंद क्रांतिचे प्रसिद्ध  तैलचित्र 

मात्र लोकशाही मागणारे सारे युरोपियन भारतासारख्या वसाहतीना  गुलाम बनवून त्यांचे शोषण करणे चालूच ठेवत आहेत.   मानवी मुल्ये फक्त युरोप पुरतीच लागू आहेत . याच १८४८ साली मार्क्स आणि एंजल्स हे दोन युरोपियन मित्र त्यांचा जाहीरनामा प्रकाशित करतात - कम्युनिस्ट मेनिफ़ेस्टो . त्यांचा धर्म ग्रंथ !

  समकालीन युरोप प्रमाणे  मार्क्स आणि एंजल्स  चे विचार युरोप बाहेरील काळ्यांना मानव समजत नाहीत यात काही आश्चर्य नाहि.

हिटलरचा नेशनल सोशालीझम (नास्झी ) , मुसोलिनीचा हुकुमशाही समाजवाद,  मार्क्सचा साम्यवाद
हे त्या काळात जन्मलेले काही हिंसक विचार आहेत .दुसर्या महायुद्धात  जे हरले ते संपले . मार्क्स वादाला मात्र कम्युनिस्ट धर्माचे स्वरूप आल्याने तो टिकुन आहे. त्याचे अनेक उप प्रकार जन्मले आहेत . फ़्रोईड च्या कालबाह्य आणि आज चूक ठरलेल्या मानस शास्त्राबरोबर मार्क्स ची संगड घालत …जाणिव नेणिवेतील वर्ग संघर्ष आजही पोथिप्रिय मार्क्स धर्मियात लोकप्रिय आहे.



मार्क्समत  :  काळ्यांची गुलामी - जाणिव आणि नेणीवेत !

अमेरिकेत त्या काळी आफ्रिकन स्त्री पुरुषांना गुलाम म्हणून राबवले जात आहे. त्यांना जनावराप्रमाणे कोंडुन ठेवले जात आहे. पुरेसे अन्न नाही . चाबकाचे फटके आहेत . जीवघेणे कष्ट आहेत . काळ्यांच्या गुलामी   बद्दल मार्क्सचे लिखाण अतिशय सूचक आहे .

मार्क्स गुलामीचे दोन भाग पाडतो . प्रत्यक्ष गुलामी आणि अप्रत्यक्ष गुलामी काळ्या माणसांच्या गुलामीला तो प्रत्यक्ष गुलामी म्हणतो . आणि युरोपातील गोऱ्या कामगारांच्या शोषक नोकरीला  अप्रत्यक्ष गुलामी म्हणतो . मार्क्सचा वर्ग लढा (अप्रत्यक्ष गुलामी) 

गोऱ्या राष्ट्रातील समतेसाठी गोऱ्या गुलामांनि गोऱ्या मालकांशी केलेले युद्ध आहे .




 पुद्धोऑ  नावाच्या समाज वाद्याशी मार्क्स चे बरेच वाद विवाद झालेले आहेत.      पुद्धोऑ लिखित पुस्तकाला उत्तर द्यायला मार्क्स ने पोव्हर्टि ऑफ फ़िलोसोफ़ि' ( तत्वज्ञानाची गरिबी ) नामक पुस्तिका लिहिली आहे .  मार्क्स लिहितो  :

" (काळ्या) गुलामाशिवाय कापूस नाही . कापसाशिवाय यंत्रमाग नाही -  कि नवी औद्योगिक क्रांति नाही. गुलामीमुळे वसाहतींना मुल्य प्राप्त होते . वसाहतींमुळे जागतिक व्यापार संभवतो , व्यापारामुळेच मोठे उद्योग उभे राहतात . गुलामी हि अतिशय महत्वाची अर्थशास्त्रीय कल्पना आहे . जर गुलामी रद्द केली तर अमेरिके सारखा प्रगीतीशील देश एक पितृसत्ताक सामंतशाहि देश (patriarchal country) बनून जाईल . जर अमेरिकेचा नाश झाला तर सर्व आधुनिक अर्थशास्त्र आणि प्रागतिक संस्कृती नष्ट होऊन जाइल. "  ( संदर्भ ३ पृष्ठ  ५० ) 
 " हे पुन्हा स्पष्ट करायची अजिबातच गरज नाही कि येथे मी प्रत्यक्ष गुलामिबद्दल बोलतो आहे . अमेरिका , ब्राझील आदी देशातील काळ्या निग्रोंच्या गुलामी बद्दल लिहितो आहे . बुर्झ्वा उद्योगात जे यंत्राचे स्थान आहे . तेच स्थान प्रत्यक्ष गुलामीला तेथे आहे . " ( संदर्भ ३ पृष्ठ  ४९ - ५० )

पितृसत्ताक सामंतशाहि देश (patriarchal country) तयार होऊ नयेत म्हणून काळ्यांनी गुलामीत राहिले पाहिजे हि मार्क्सवादी विचारधारा आपण निट समजून घेतली पाहिजे.

मार्क्सने काळ्या गुलामांची तुलना यंत्राशि केली आहे . काळ्याना मार्क्स  मानव नसून प्राणि समजत असे हे  आधीच्या लेखातून स्पष्ट झालेले आहे .

सदर मार्क्सच्या लिखाणाला एंजल्स ने तळटिप जोडली आहे . आणि १८४७ साली मार्क्सचे लिखाण कसे बरोबर होते …. ते पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे . एंजल्स हा मार्क्स चा मित्र आणि सर्वश्रेष्ठ समकालीन भाष्यकार आहे . डाय्लेक्टिक चा प्रत्यक्ष अर्थ काय घ्यायचा ? याचे व्यवस्थित मार्गदर्शन एंजल्स ने केले आहे.

हेगेलच्या डायलेक्टिक्स चा मार्क्स  आणि मार्क्स वाद्यांवर प्रचंड प्रभाव आहे. वरील  चर्चा  हेगेल च्या डायलेक्टिक्स चे उपयोजन आहे .  वंशवादाचे समर्थन मार्क्सच्या जाणिवेत तर आहेच पण कथित नेणिवेत सुद्धा आहे.

आंबेडकर आणि मार्क्स 

डॉ   बाबासाहेब आंबेडकरांनी मार्क्स आणि बुद्ध नावाचे एक पुस्तक लिहिले आहे . त्याच्या शेवटच्या वाक्यांचा  सारांश असा -

"  फ़्रेंच राज्यक्रांति मला स्वीकाराहार्य वाटते कारण  समता, बंधुता आणि स्वातंत्र्य हि तिची घोषणा !  (मानवी ) बंधुता आणि स्वातंत्र्य याचा मार्क्सवादात स्वीकार नाही . म्हणून मार्क्स मान्य नाही.  (बुद्धात तिन्ही असल्याने तो मला अधिक प्रिय आहे )" 
  We welcome the Russian Revolution because it aims to produce equality. But it cannot be too much emphasised that in producing equality society cannot afford to sacrifice fraternity or liberty. Equality will be of no value without fraternity or liberty. It seems that the three can coexist only if one follows the way of the Buddha. Communism can give one but not all. - Dr BR Ambedkar 

 (मानवी ) बंधुता आणि स्वातंत्र्य याचा मार्क्सवादात स्वीकार नाही म्हणून मार्क्स मान्य नाही . 

(मार्क्स चे जातीयवादी वांशिक उद्गार त्याकाळी जर्मन भाषेत उपलब्ध होते. त्या काळी  इंग्रजीत भाषांतरीत  झाले नव्हते, तरीही बंधुता आणि स्वातंत्र्य याचा आभाव कम्युनिस्ट विचारात आढळल्याने बाबासाहेबांनी  मार्क्स नाकारला. साहेबांच्या बुद्धिमत्तेची चुणुक इथे दिसते.  )




मार्क्स - एंजल्स  मत : हीन वंश आणि गरीब राष्ट्रे नष्ट करा 

हिटलरपूर्व जर्मनीत ज्यू द्वेषाचे प्रमाण तुलनेने कमी होते. आणि अनेक ज्यू तरुणांनाही जर्मन राइश (साम्राज्याची) स्वप्ने पडत असत . जर्मनीच्या पूर्वेला असलेल्या इंग्लंड फ्रांस आदी देशा बद्दल आदर आणि पश्चिमेच्या - स्लाव, झेक आणि रुमानिया वगैरे राष्ट्रांचा नाश हे  तत्कालीन जर्मनीचे तरुण स्वप्न  होते. हिटलर आणि मार्क्सची काही स्वप्ने तंतोतंत सारखी आहेत .  मार्क्स आणि एंजल्स ने १८४८ साली नव्या राइशन  चे  वृत्तपत्र म्हणून पेपर काढला . याचा संपादक मार्क्स आहे . एंजल्स लिहितो
"आम्ही पुन्हा बजावून सांगतो : पोलिश,टर्किश, रूसी  वगळता स्लाव वंशियांना भविष्य नाही . स्लाव लोकांकडे इतिहास , भूगोल , राजकारण , उद्योग यापैकी काहीच नाहि.आणि म्हणूनच  स्वतंत्र राष्ट्र म्हणून घेण्याची त्यांची पात्रता नाहि "   (संदर्भ ५ : १४-२२-१८४९ चा लेख ) 
याच  वर्तमानपत्रात मार्क्स आणि एंजल्स ने स्लाव , झेक , रुमानिया  आदी  राष्ट्रांविरुद्ध -- लहान राष्ट्रांविरुद्ध विषारी प्रचार चालवला होता .  एंजल्स आणखी लिहितो :
" मागास बाल्कन राष्ट्रांनि तात्काळ करायचे कर्तव्य म्हणजे क्रांतीच्या वादळात विरून जाणे हे होय . जर्मन पोल आणि हंगेरियन - बालकनांचा  भीतीदायक   सूड  घेणार आहेत.   सर्वंकश युद्धाचा प्रारंभ होईल. त्यात हि इटुकली बैलबोडी राष्ट्रे  कायमची नष्ट होणार आहेत. प्रतिक्रियात्मक , राज्ये , वंश आणि लोकही नष्ट होणार आहेत. आणि तीच प्रगती असेल. "  (संदर्भ ६)
एंजल्स ची हि सिंह गर्जना पुढे हिटलर ने वास्तवात आणली .



मार्क्सच्या आर्थिक विचारातले क्रौर्य - हिंसा आणि वंशवाद याचे आकलन होण्यासाठी मार्क्स वर प्रभाव टाकणारे तत्वज्ञ थोडक्यात समजून घ्यावे लागतील .



मार्क्स वर प्रभाव असणारे विचारवंत : ट्रीमो  , हेगेल आणि स्पेन्सर 

डार्विन वा लमर्क चा अतिशय चुकीचा अर्थ  तत्कालीन युरोपात प्रचलित होता . बळी तो कान पिळी " सर्व्हायव्हल ऑफ द फ़िटेस्ट . शक्तिमान करी राज्य ! असा काहीसा हा विचार आहे . त्यात तथा कथित हीन दर्जाच्या वंशाला (स्पीशीज) मारून टाकणे  वा गुलाम करणे हे नैसर्गिक मानले गेले आहे . शुद्ध आणि श्रेष्ठ वंशीय गोऱ्या लोकांच्यातलि  विषमता मिटवण्यासाठी हिटलरचा नाझीवाद किंवा मार्क्सचा साम्यवाद आहे. हेगेल , स्पेन्सर आणि ट्रिमॉ च्या भंकस मतांचा विलक्षण प्रभाव हिटलर वर सुद्धा आहे .

 हिटलरने युजेनिक्स म्हणून काही वांशिक प्रयोग केले होते . काळ्या , अपंग , बुटक्या , कुरूप , कमकुवत लोकांची नसबंदी आणि सुधृढ लोकांचे भरगोस पुनरुत्पादन यातून देशाला रोगमुक्त आणि सबळ करण्याचा हा हिटलरि विचार आहे . गरिबी नष्ट करण्यासाठी गरिबांना मारून टाका असे म्हणण्या इतकेच युजेनिक्स मुर्खपणाचे आहे .

युजेनिक्स च्या विचार वृक्षाला नाझी छळ छावणीत फळे आली 
हा युजेनिक्स चा विचार ट्रिमो , हेगेल आणि स्पेन्सरच्या विचाराचे फळ आहे. हेगेलचे डायलेक्टिक्स समजले कि हिटलर मार्क्स मुसोलिनीचा विचार कसा बनला ते ध्यानात येते .



हेगेलचे डायलेक्टिक्स

मनात एखादा विचार (थेसिस ) आला कि त्यावर काही शंका - आक्षेप (एन्टी थिसिस ) घेता येतात.  त्याच्या घुसळणितुन एक नवा विचार (सिन्थेसिस ) जन्माला येतो . हा सिन्थेसिस (नव विचार) सुद्धा एक प्रकारचा विचार (थेसिस) आहे. मग त्यालाही शंका - आक्षेप (एन्टी थिसिस ) घेता येतात . मग पुन्हा नवा विचार जन्मतो . अशा प्रकारच्या विचार कलहातून - विचाराची प्रगती होत जाते .

हिटलर आणि नाझी पक्षाने  हेगेलचे डायलेक्टिक्स वंशवादाला लावले . आणि हीन वंशाचा नाश करण्यासाठी   योजना बनवल्या . एन्टी थिसिस असलेल्या हीन वंशाचा नाश केल्याशिवाय नवा सिंन्थेसिस कसा जन्माला येईल ? !!!!

 हेगेलचे डायलेक्टिक्स समाजशास्त्रात वापरले तर संघर्ष हिंसा आणि वंश विच्छेद अटळ आहे .

मार्क्स ने हेगेलचे डायलेक्टिक्स   अर्थशास्त्राला लावले आणि कम्युनिझम चा जन्म झाला. त्यामुळे कम्युनिझम मध्येही वर्ग संघर्ष आणि हिंसा अटळ आहे . 



























मुळात  हेगेलचे डायलेक्टिक्स साफ चुकीचे आहे . विज्ञान आणि जीवशास्त्र याच्याशी हेगेल सुसंगत नाहि.  मानवी विचार हे थेसिस - एन्टी थिसिस अशा प्रकारे चालत नाहीत .  मेंदुशास्त्र हा एका  स्वतंत्र लेखाचा विषय आहे. असो

 संघर्ष आणि हिंसेशिवाय सुद्धा प्रगती होते . आणि कायम प्रगती झालीच पाहिजे अशी काही अट परमेश्वराने (!) घातलेली नाही . हेगेलचे  नियम समाज शास्त्रांना लावता येत नाहीत .  हिटलरचीच चूक मार्क्स ने केलेली आहे. पोथिनिश्ठ मार्क्सवादी नवे विज्ञान न शिकता…  हेगेलच्या डायलेक्टिक्स ची  पारायणे करत बसले आहेत .



मार्क्सवादी विष पेरणी 

क्रांतीकारकांचा दहशत वाद , हिंसेशिवाय प्रगती अशक्य , हिंसा हि क्रांतीला जन्म देणारी सुइण आहे अशा अर्थाची मार्क्सची शेकडो वाक्ये आहेत. स्टेलिन आणि माओ हे दोन मार्क्सचे अनुयायी .
रशियाच्या कम्युनिस्ट राजवटीत - स्टेलिन च्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हुकुमाद्वारे लाखो (सात लाख आय गेस - हिशोब कदाचित शेकड्यात चूकेल)  माणसे मारली गेली आहेत. माओ ची हिंसा थरकाप उडवणारी आहे . लाल चीन ने तरुण निशस्त्र विद्यार्थी आंदोलकांवर रणगाडे चालवून चौक च्या चौक रक्ताने भरले आहेत . (तियानान्मान चौक १९८९ )






लाखो लोकाना मारणार्या खुनी खमुनिस्टानि सहिष्णुतेची भाषा बोलावी ?


सामाजिक क्रांति झाली का ?

उत्तर नाही असे आहे.

लपवणे , दडपून खोटे बोलणे यात कम्युनिस्ट राजवटी पारंगत आहेत . चंद्रावर उतरलेला पहिला माणुस रशियन होता असे रशियन सरकार शिकवत असे. आजही चीन मध्ये फेसबुकवर बंदि आहे . तीयानंमान चौक याबद्दल कोणतीही माहिती चीन मधल्या इंटर्नेट वर मिळत नाही .

हेगेल च्या मुळात बोगस तत्वज्ञानाचा  विकृत अर्थ काढून जमेल तेंव्हा हिंसा आणि न जमल्यास पुढच्या हिंसेची तयारी असे कम्युनिस्टांचे सूत्र आहे . जाणिव नेणीव खाउजा विरोध वर्ग संघर्ष मय  इतिहास---  या कम्युनिस्ट विचाराची विष पेरणी यत्र तत्र सर्वत्र झाली आहे. उद्याच्या हिंसेसाठी  हि तयारी केली गेली आहे. हेगेल मार्क्सचे विचार पुढे नेले तर हेच घडणार आहे. कम्युनिसटांच्या जाणिवेतले ध्येय हिंसा आणि नेणिवेतले ध्येय वंश्वाद असावे !!

कम्युनिस्ट बंधुहो १८ व्या शतकातील मागास विचाराला शास्त्रीय समाजवाद मानू  नका .

कोम्रेड बांधवांचे त्यांच्या त्यागाबद्दल आभार मानून सुद्धा त्यांची चिकित्सा करणे आणि मार्क्स बाबाच्या धार्मिक अंधश्रद्धेतून त्याना बाहेर काढणे . हे आम्ही आमचे कर्तव्य समजातो . त्यात माणुसकीचे भले आहे .  भारताचे हित आहे .  पुरोगाम्याचे कल्याण आहे आणि कम्युनिस्टांचे तर कोटकल्याण आहे .
(क्रमश:)

(लाल सलाम  पुढचा भाग : कॉम्रेड स्टालिन ते कोम्रेड शरद)
-------------------------------------------------------------------------------------------------------------

संदर्भ

१) कृष्णवर्णीय टिप्पणी :  https://marxists.anu.edu.au/archive/marx/works/1862/letters/62_07_30a.htm

२) मार्क्स मत :  हीन वंशाचे काळे कृष्णवर्णीय 
https://marxists.anu.edu.au/archive/marx/works/1866/letters/66_08_07.htm

३)  काळ्यांची गुलामी - जाणिव आणि नेणीव  (पृष्ठ ४९ -५०)
https://www.marxists.org/archive/marx/works/download/pdf/Poverty-Philosophy.pdf

४) आंबेडकर आणि मार्क्स 
http://www.ambedkar.org/ambcd/20.Buddha%20or%20Karl%20Marx.htm#a8

५) स्लाव वंश स्वातंत्र्यास अपात्र ( १४-२-१८४९) 
https://www.marxists.org/archive/marx/works/download/Marx_Articles_from_the_NRZ.pdf

६) Neue Rheinische Zeitung. Translated By Wolf Pg 39 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

१८ फेब्रु, २०१६

डाव्यांचा हातोडा विज्ञानावर - कोयता बुद्धीवर

डाव्यांचा हातोडा विज्ञानावर  - कोयता बुद्धीवर 

कम्युनिस्ट , डावे,  फुरोगामी (क.डा.फू.)  इत्यादी लोक प्रस्थापित धर्माच्या विरोधी असतात . त्यामुळे ते विज्ञान निष्ठ असतील असा एक गैरसमज पसरला आहे. कडाफू लोक्स हे विज्ञान निष्ठ नाहीत . तर कमालीचे विज्ञान विरोधी आहेत.  विज्ञान म्हणजे रॉकेट , कॉम्युटर इत्यादी तांत्रिक प्रगती नव्हे. तर विज्ञान हि विचार करायची पद्धत आहे. निरिक्षण - तर्कशास्त्र या सह ---आणि ----पूर्वग्रहा शिवाय  - स्वत:च्या  बुद्धीने त्यात निष्कर्ष काढायचे असतात. आणि  त्यातून प्रामाणीकपणा निर्माण होतो. कम्युनिस्ट हि अतिशय अप्रामाणिक आणि हिंसक जमात आहे.







ऱ्याण्डम जग : अनिश्चित विज्ञान (Random)

आपण शाळेत असतना ब्रावोनियन मुव्हमेंट  म्हणुन काहीतरी अभ्यासले होते . आठवतय का ? का फिजिक्स मधला तो भाग ऑप्शन ला टाकला होता !! सारे पदार्थविज्ञान ऑप्शन ला नसावे  अशी आशा करतो !!! भरपूर प्रकाशातले धुळीचे कण कसे हलतात ? अनिश्चित आणि ऱ्याण्डम ! जग अनंत शक्यतांचे असते . मानवी मन आणि मेंदु - त्याचे जीवशास्त्र तर अतिशय अनिश्चित असते . ते सतत बदलत असते. खाणे,  पिणे,  प्रकाश,  हार्मोन्स आणि आजूबाजूची ब्रावोनियन  Random परिस्थिती यानुसार मानवी मेंदु वेगवेगळे निर्णय घेत असतो . माणुस सतत बदलत असतो. क. डा. फ़ु.  ला हे पटत नाही . (कम्युनिस्ट , डावे,  फुरोगामी)


शत्रुकेंद्रि डाव्यांचे - विचित्र अलंकारिक  दावे 

शत्रू कोण ? हे डाव्या कम्युनिस्टांनि आधीच गृहीत धरले आहे. शत्रूला  फायदा होऊ नये . म्हणुन सारी बुद्धी पणाला लावायची आहे . बुद्धिवाद मेला. विज्ञानाचे श्राद्ध घातले. आणि तर्काचा तेरावा घालून हि जमात फक्त आणि फक्त शत्रुचाच विचार करते . (क. डा. फ़ु ला शत्रू कायम लागतात ) . विज्ञानाच्या अनिश्चित वास्तवाची चिता कडाफ़ुंनि इथे पेटवली आहे!! आमची चिंता अशी कि, वास्तवात समाजाचे ज्ञान कायम वाढत  असते - त्यामुळे शत्रू असलेच पाहिजेत हा कडाफ़ु नियम जळजळीत विस्तव असो - तरी साफ चूक ठरतो  आहे.


कम्युनिस्ट एक  सेमेटिक धर्मविचार  :
 आधीचे  भेसळयुक्त आणि नंतरचे बनावट
ज्यू , ख्रिस्ती , इस्लाम हे सेमेटिक धर्म म्हणून ओळखले जातात . सर्वात आधी मोझेस ने ज्यू धर्म स्थापित केला . त्यानंतर ख्रिस्ताला प्रेषित बनवून चर्चने ख्रिस्ती धर्माची स्थापना केली . त्या सर्वावर कडी करत मुहम्मदाने स्वत:ला शेवटचा सेमेटिक प्रेषित म्हणून जाहीर केले . यातल्या प्रत्येक धर्माने आधीचा धर्म भेसळयुक्त-खोटा आहे हे जाहीर केले आहे . नंतरचा बानावाट आहे हे ओघाने आलेच ! ख्रिश्चन चर्च नुसार जुना ज्यू धर्म पाखंडी ठरतो आणि नव्या इस्लाम नुसार   ख्रिस्ती आणि ज्यू हे दोन्ही धर्म भेसळयुक्त ठरत असतात. ००




शुद्ध धर्म आमचाच आहे .
आमच्या  आधीचे धर्म   भेसळयुक्त आणि नंतरचे बनावट या पक्क्या श्रद्धेवर  हे तीनही सेमेटिक धर्म उभे आहेत . ज्यू - ख्रिस्ती आणि मुस्लिमांनी  एकमेकांचा प्रचंड खुनशी वंश संहर केलेला आहे. कम्युनिस्टांनि असेच रक्तरंजित वंशसंहार /  जिनोसाइड केलेल्या आहेत . हिटलर पेक्षा जास्त खून लाल स्टालिन ने पाडले आहेत . कारण ज्यू आणि  ख्रिस्ती चर्च आणि इस्लाम हे तीनही धर्म ज्या मूलभूत विचाराला मानतात - नेमक्या त्याच विचाराचा मार्क्स ने प्रसार केला.



मार्क्स धर्म : हेगेल चे डायलेक्टिक
कम्युनिस्ट विचार हा सेमेटिक धर्मासारखाच आहे. क्रांति आणि प्रतिक्रांति हे त्याचे मूळ तत्व आहे. हेगेल नुसार एक विचार तयार होतो (थेसिस) त्याच्या विरुद्ध आणखी एक विचार तयार होतो (एण्टि थेसिस) . या दोन विचाराचा संघर्ष होतो .  कम्युनिस्ट लोक त्याला क्रांति (रेव्ह्ल्युशन / इन्किलाब / आझादी  ) असे म्हणतात. हि क्रांति रक्त् पाती आहे . कारण थेसिस   आणि एण्टि थेसिस याच्यात संवाद होऊ शकत नाही . त्यात रक्तपात होतो . जिहाद - क्रुसेड आणि लाल क्रांति या एकाच विचारातून जन्मल्या आहेत.







दैवी विरुद्ध सैतानी : सेमेटिक मूलतत्व 
अल्लाला  न मानणारा नास्तिक त्याला नरकाच्या आगीत टाकले जाइल - उकळते तेलद्रव्य चेहर्यावर टाकले जाइल . मग पुन्हा कातडी लावून पुन्हा असेच उकळते द्रव्य टाकले जाइल. तेच उकळते द्रव्य काफिराना प्यायला दिले जाइल असे कुराणात (कुराण १८:२९) स्पष्टपणे  म्हटले आहे.  नेटवर शोध घ्या कुराण १८:२९ असे इंग्रजीतून टाइपुन गुगळा.  काफिरांचा  वध  योग्य आहे असेही पुरेशी शक्ती असताना केले पाहिजे . ज्यू आणि ख्रिस्ती यांची मते इस्लामहून भिन्न नाहीत . जगात काहीतरी सैतानी आहे . काहीतरी दैवी आहे.  सुष्ट आणि दुष्ट असा संघर्ष या जगात सुरु आहे . असे तीनही सेमेटिक धर्म मानतात . मार्क्सवाद हा चौथा सेमेटिक धर्म होय.

मार्क्स धर्म 

इतर धर्म / पंथ खोटे आहेत. माझा धर्म हा धर्म नसून धर्माहून हुच्च अशी जीवन पद्धती / संस्कृती आहे असे सगळ्याच धर्माचे म्हणणे आहे . इतिहास - भूतकाळाचे पर्फ़ेक्ट पौराणिक आकलन आणि आणि पुढचे राशी भविष्य  सांगण्याची कला सगळ्याच धर्माकडे आहे . ज्यू /मुस्लिम / ख्रिस्ती एकमेकाना खोट धर्म - पाखंड असे म्हणत असतातच ! मार्क्स इतर धर्माना  खोटे म्हणतो यात कौतुक काय आहे ?  सगळे सेमेटिक एकमेकाना खोटे धर्म = अफूची गोळी असेच म्हणत असतात इतिहास आणि भविष्यकाळ मार्क्स वाद्यांना बिनचूक कळतो म्हणून त्याना वर्तमानकाळात आदेश सुद्धा काढता येतात . आजवरचे मार्क्सिस्ट सरकारचे आदेश हे मोदि  वा ठाकरे सरकार पेक्षा कितीतरी अधिक हिटलर वादी  असतात हा इतिहास सर्वमान्य आहे . 

नाझीवाद आणि मार्क्सवाद 
फ्यासिझम - नाझीझम आणि मार्क्सिझम हि जुळी भावंडे आहेत. एकाच कालखंडात एकाच संस्कृतित आणि एकाच भौगोलिक प्रदेशात ती जन्मली आहेत. वैचारिक शत्रूला ठार मारण्यावर  त्यांचा विश्वास आहे. ख्रिस्ती व्हायला तयार झालेल्या अनेक ज्यूंना हिटलरी नाझींनी जीवदान  दिले होते. इस्लामने काफ़िरांना आणि क्रुसेडि ख्रिस्तांनि  पेगनांना अशीच उदार वागणुक दिलेली आहे. हि उदारता किती किती  किती गोड आहे . कम्युनिस्ट व्हा मग जीवदान मिळेल अशी स्टालिन माओ ची उदारता याच सेमेटिक विचाराचे फळ आहे.








आधी हिंदु बद्दल  बोला
बोलूया . हिंदु धर्म हा अत्यंत फ़ालतु  आहे म्हणून तो बुडवला पाहिजे . असे मत आम्ही हिंदुच्या धर्माचा अभ्यास करून बनवले आहे. त्यावर बरेच लेखन हि केले आहे. गीता आणि वेद हि समाजाला विषम अकर्मी आणि कर्तुत्व शून्य बनवणारी साधने आहेत.  पण त्यासाठी हिंदु समाजाचा बळी कम्युनिस्ट नाझी वाद्यांच्या तोंडी दिला पाहिजे हि सक्ती काय म्हणुन ?  धर्म बुडवुया - पण समाजाचे काय ? हिंदु समाज माझा आहे . आणि या अवैज्ञानिक खोटारड्या शत्रुकेंद्रि  क. डा. फ़ु. च्या तोंडी मी माझा देश आणि समाज जाऊ देणार नाही . यात बुद्धिवाद असा कि हि आम्ही हिंदु विषमता वादि  वगैरे सगळे आहोत . ती आमची वाइट गोष्ट आहे . अत्यंत चूक आहे .

तरी  आम्ही प्रामाणिक आहोत. आणि स्वत:ला बदलण्याचि  तीव्र इच्छा आमच्यापाशी आहे . डाव्या कम्युनिस्टांपेक्षा संघ परिवार  अधिक बुद्धिवादी आहे . मी अतिशय विचारपूर्वक पुन्हा बोलतो - कम्युनिस्टांपेक्षा हिंदु समाज अधिक बरा आणि ढोंगि फुरोगाम्यांपेक्षा संघि परवडले . मी संघ्यांचा आयुष्यभर विरोध करत राहीन - हल्ली संघि लोक्स नरेंद्र दाभोलकरां सारख्या  खर्या पुरोगामी विज्ञान निष्ठ लोकांना  पण आडून आडून विरोध करतात . थोडे माजलेत . सनातन प्रभातच्या नादि  लागलेत . असो .


हिंदूची विकृती 

जशास तसे नावाची विकृती यांच्यात येऊ लागलीय. म्हण्जे दहशतवादाला उत्तर दहशत वाद हि विकृती आहे . याहून अधिक शहाण पणाने प्रश्न हाताळता येतात. दहशत वादाला उत्तर म्हणून फुले पाठवायची सद्गुण विकृती जितकी चूक आहे तितकीच हिंसक दुर्गुण विकृती सुद्धा  चूक आहे. याहून अधिक शहाण पणाने प्रश्न हाताळता येतात.


समारोप 
शत्रुकेंद्रि डाव्यांनी देशभर असहिष्णुता पेटवून लाल क्रांति करायची योजना आखलेली दिसते. त्याला मी मरेपर्यंत विरोध करेन . जगातले सर्व धर्म बुडवले पाहिजेत यावर माझे सर्व पुरोगाम्यांशि एकमत आहे. आणि पुरोगाम्यात बुद्धिवादाची बीजे आहेत हेही मला मान्य आहे. विज्ञान निष्ठेची चर्चा सनातन्याशी करता येत नाही .  हे हि खरे आहे . पण हा बुद्धीवाद राजकारणात झक मारतो . त्याचे काय ?

डाव्या कम्युनिस्टांचे फुट सोल्जर बनणे मला मान्य नाही . अफझल गुरु  मान्य नाही . आणि अफल समर्थकांचे बकवास युक्तिवाद सुद्धा मान्य नाहित.  मी नास्तिक आहे . कोणताच धर्म मानत नाही . पण हिंदु समाज माझा आहे . त्याने मला पाळले . आणि हिंदुनिच मला वाढवले . या हिंदु समाजाचे मी जीवात जीव असेपर्यंत रक्षण करेन . वास्तविक पाहता हिंदु हे नाव धर्माचे नाहीच - समाजाचे आहे. यांचे कैक फालतू धर्म आहेत . काही असले तरी लोक माझे आहेत . अफजल वाले नाहित. अफझल खान सुद्धा आमचा म्हणूया - अफजल गुरु सुद्धा आमचाच -  इतकी विकृती माझ्यात नाही. अणि हि आफ्झुल्ली विकृती मी सहन सुद्धा करणार नाहि.


सध्या बहुसंख्य पुरोगाम्यांनी स्वत:चे मेंदु मार्क्स बाबा कडे गहाण टाकले आहेत . पुरोगामी चातुर्वणातले ब्राम्ह्ण्य कम्युनिस्टांकडे जाते . या नाझी-फ़्यासिस्ट - कम्युनिस्टांचि गुलामगिरी मला अमान्य आहे … तुमचे काय ? ठरवा बाबा .





  

११ फेब्रु, २०१६

लाला लजपत राय - फाळणीचे कट्टर समर्थक

लाल बाल पाल हि भारतीय स्वातंत्र्य लढ्याची आद्य त्रिमूर्ती समजली जाते. त्यापैकी बाळ गंगाधर टिळक हे हिंदुत्व वादी विचाराकडे झुकलेले समजले जातात. हे खरे आहे काय  ?

लाला लजपत राय यांनी टिळकांच्या लखनौ करारावर का टीका केली होती ?    

कडवे राष्ट्रवादी लाला लाजपत राय यांनी हिंदु - मुस्लिम फाळणीचे समर्थन १९२० च्या दशकापासून पासून का ? आणि कसे सुरु केले ?  लाला जी धर्मांध होते काय ?

लालाजी  कॉंग्रेसचे कि हिंदू महासभेचे ?  हिंदू महासभा आणि कॉंग्रेसचा संबंध काय होता? इत्यादी प्रश्नावर आपण विचार करायचा आहे. 

 भारतीय स्वातंत्र्य लढ्याची आद्य त्रिमूर्ती लाला लाजपत राय , बाल गंगाधर टिळक आणि बिपीन चंद्र पाल 

१९२० : खिलाफत :  टिळकांचे लोकमान्य समर्थन  

१९२० च्या ऑगस्ट महिन्यात खिलाफतीचे वादळ घोंगावू लागले. केमाल पाशा या मुस्लिम सुधारकाने सनातनी खलिफा हाकलून दिला . त्या  तुर्कस्थानच्या धर्मगुरू - राजगुरू ला पुन्हा गादी वर बसवण्यासाठी  भारतीय मुस्लिमांनी सुरु केलेला हा जिहाद - धर्म पराकाष्ठा होती. जिहादचा अतिशय स्पष्ट उल्लेख खिलाफत कमिटी करत होती.  त्याआधी जून महिन्यात अखिल भारतीय  खिलाफत परिषद स्थापन करण्यात आली. त्याला हिंदुंचा पाठिंबा मिळवण्या साठी हिंदु मुस्लिम अशी संयुक्त बैठक आयोजित केली गेली. त्या बैठकीला गांधीजी बरोबर लाला लजपत राय सुद्धा हजर होते.  १९२० च्या कलकत्ता येथील विशेष कोन्ग्रेस अधिवेशनाचे लजपत राय हे अध्यक्ष सुद्धा होते. खिलाफतीला पाठिबा देण्यासाठी कोन्ग्रेस तर्फे असहकार आंदोलन सुरु केले गेले . त्यावेळी पंजाबचे सिंह लाला लजपत राय गरजले होते कि , 

" खिलाफत हा मुस्लिमांसाठी धार्मिक  विषय असला तरी हिंदू करता तो राजकीय विषय आहे . भारताचे राजकीय हित धोक्यात येणार नाही या मर्यादेतच हिंदु त्यांना मदत करू शकतील."   (१ - २१७ )
१९२० च्या विशेष अधिवेशनात खिलाफतीच्या समर्थनार्थ असहकार आंदोलनाचा ठराव पास होतो . त्याचे  अध्यक्ष लाला लाजपतराय असतात . याच अधिवेशनात टिळकांनि उचलून धरलेली स्वराज्याची मागणी खिलाफत आणि असहाकाराशी जोडली जाते . टिळकांनी लोकमान्य केलेली स्वराज्याची मागणी काय आहे ?

स्वराज्य वेगळे - संपूर्ण स्वातंत्र्य निराळे 

स्वराज्य हे काही संपुर्ण स्वातंत्र्य  नाही . टिळकांनी वसाहतीचे मर्यादित अधिकार ब्रिटिशांकडे मागितलेले आहेत.  लखनौ करार करून टिळकांनी मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणाहुन अधिक मतदान , जास्त जागा  आणि स्वतंत्र धार्मिक मतदार संघ  दिलेले आहेत .

हे जे होमरूल - स्वराज्य  आहे ते म्हणजे शरियतच्या इस्लामी कायद्याचे राज्य आहे . असे मुस्लिमांनी गृहीत धरले आहे. मौलाना आझाद आणि मौलाना बारी अगदी स्पष्टपणे तसे सांगत आहेत . (२-१८५). लोकमान्य टिळकांचा खिलाफतीच्या धार्मिक आंदोलनाला पाठिंबा आहे.  केवळ गांधिजिंचा नव्हे ! (२- १८७)    याच सुमारास मुस्लिमांच्यात कडव्या जातीय आणि हिंदु विरोधी संघटना तयार होऊ लागतात . तंझीम आणि तबलीग या हिंदुचे धर्मांतर करण्यासाठी काढलेल्या त्या संघटना होत. 'जमियत उल उलेमा हिंद'  ने  आता सरळ हिंदुविरोधी भूमिका घेतलेली दिसते. लखनौचे मौलवी बारी लिहितात
" हिंदुच्या भावनेचा विचार न करता गोहत्या करा. जर (इस्लामी धार्मिक कायदा ) शरियत च्या आज्ञा पायाखाली तुडवल्या जाणार असतील , तर तो निर्णय दिल्लीच्या मैदानात घेतलेला असो, कि सिमल्याच्या महालात ! आमच्यासाठी तो सारखाच आहे. इस्लामच्या प्रत्येक शत्रूशी असहकार करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे . मग तो शत्रू तुर्कस्थानचा असो कि अरेबियाचा असो कि आग्रा वा बनारस (काशी ) येथिल असो !"  (२- २२७)

खिलाफतीचे परिणाम उलटे झाले . लाल बाल पाल मधील बिपीन चंद्र पाल लिहितात " हिंदुनि आता मुसलमानांप्रमाणेच आपली शक्ती व साधने संघटित करणाच्या मागे गंभिरपणे लागले पाहिजे . " (उक्त २२८)

१९२४ : लाला लजपत रायांचा एल्गार 

२६ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर १९२४ या काळात लाला लजपत राय यांनी ट्रिब्युन वर्तमानपत्रात घणाघाती लेख लिहिले आहेत. कोलंबिया युनिव्हर्सिटिने  ते सर्व लेख इंटरनेट वर उपलब्ध करून दिले आहेत.  (३)  लालाजिं नी लोकमान्य टिळकांच्या धोरणावर जाहीर टिका केलेली दिसते.  टिळक कृत लखनौ करावर सडकून हल्ला केलेला दिसतो . पंजाब केसरी लाला लजपतराय लिहीतात

" लखनौ करारात मुस्लिमाना दिलेले स्वतंत्र मतदार संघ यादवी युद्धाशिवाय काढुन घेता येणार नाहीत. त्यास मान्यता देणे म्हणजे देशाची हिंदु भारत आणि मुस्लिम भारत अशी विभागणी करणे होय. मुस्लिमांच्या वाढत्या मागण्यांपुढे पंजाब आणि बंगालची फाळणी आम्ही हिंदु अधिक पसंद करू . फाळणी करून हिंदु व मुस्लिम प्रांतांचि स्वतंत्र संघराज्ये स्थापन करावीत. 


पंजाबचे सिंह : लाला लजपत राय 


हिंदू मुस्लिम तेढिचे कारण सांगताना लालाजी लिहितात  :-

 " गेले सहा महिने माझा बहुतेक वेळ मुस्लिम कायदा व मुस्लिम इतिहास यांचा अभ्यास करण्यात खर्च झाला आहे. यावरून माझे असे मत बनत चालले आहे कि - हिंदु मुस्लिम ऐक्य शक्य नाही आणि व्यावहारिक सुद्धा नाही . … मी मुस्लिम पुढार्यांवर विश्वास टाकायला  पुर्णपणे तयार आहे . पण कुराण आणि हदीस यातील आज्ञांचे काय ? "  ( ४ - २७५ आणि  २७६ )

लजपत राय यांनी वरील पत्र देशबंधु  चित्तरंजन दास यांना लिहिले होते . डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पाकिस्तानवरील पुस्तकात ते पत्र उधृत केले आहे. (Ref Dr B R Ambedkar Volume 8 page 275 - 276) 


१९२४ : लालाजी फाळणीची योजना मांडतात : -  

पुढे जाउन लाला लजपत राय फाळणीची योजना मांडतात. वायव्य व इशान्य भारतातील मुस्लिम प्रांतांचे मुस्लिम संघराज्य व उर्वरित भारताचे हिंदु संघराज्य स्थापावे अशी लाला लजपत राय यांची सूचना आहे.  चार मुस्लिम बहुल प्रांत   वेगळे काढावे असे त्यांचे मत आहे. १) पूर्व बंगाल २) पश्चिम पंजाब ३) सिंध ४) बलोच आणि वायव्य सरहद्द प्रांत.  नेमके हे चार प्रांत आज पाकिस्तान - बांग्लादेश या नावाने प्रसिद्ध आहेत.

फाळणीची सूचना करणारे ते महत्वाचे हिंदु  नेते आहेत . हे १९२४ साली घडते आहे .  मुस्लिमांना इशारा देताना
लालाजी म्हणतात -

" आम्हाला जिहाद ची धमकी देऊ नका. आम्ही खूप जिहाद पाहिले आहेत. गेल्या  बाराशे वर्षात आमच्या राष्ट्रीय अस्तित्वा विरुद्धच्या या घोषणा आम्ही दररोज ऐकल्या आहेत. आमच्या राष्ट्रासाठी बलिदान करण्यास आम्ही तयार आहोत. आम्ही धमक्यांना आणि दडपशाहीला भिणार नाही " ( ५-७३)

आम्ही धमक्यांना  भिणार नाही !


१९२५ : लालाजी हिंदू महासभेचे अध्यक्ष :

हिंदु महासभा हे काय प्रकरण आहे ? ते प्रथम समजून घ्यावे लागेल. १९०६ साली मुस्लिम लीग ची स्थापना झाली . त्याला प्रत्युत्तर म्हणून लाला लजपत राय यांनी पंजाब हिंदु सभेची स्थापना १९०९ साली केली होती . पुढे अनेक प्रांतात हिंदु सभा स्थापन झाल्या आणि १९१५ साली त्या सर्व गटांचे एकीकरण घडून अखिल भारतीय हिंदु महासभेची स्थापना झालेली आहे. लालाजी पहिल्या पासून हिंदु  महासभेचे पालक आहेत.

कोन्ग्रेस मध्ये सर्व विचाराची मंडळि पूर्वी असत. कॉंग्रेस या शब्दाचा अर्थच मुळी एकीकरण - मंच सभा असा आहे . त्यामुळे हिंदु महासभेचे पालक लालाजी १९२० साली कॉंग्रेस चे अध्यक्ष असतात. पुढे मुस्लिम प्रश्नावर खवळून ते   कोन्ग्रेस पासून दूर जातात  आणि १९२५ साली अ. भा.  हिंदु महासभेचे अध्यक्ष होतात. हिंदू महासभेचे अध्यक्ष असताना ठणकावून सांगतात कि -
" हिंदुनि संघटित होणे कोणाला मुस्लिमविरोधी वा राष्ट्रविरोधी वाटले तर मी मनापासून  सांगतो कि , हिंदुसभा दोन्हीही आहे " (५ -७४ ) 

 लाला जी धर्मांध होते काय ? 

मुस्लिम लीग च्या धमक्यांना भिक घालता कामा नये .  इस्लाम धर्माचे लांगुलचालन करू नये. मुस्लिम मुजोरीला तोंड देण्यासाठी हिंदुनि संघटित व्हावे असे लाला लजपतराय म्हणतात. पण त्याना हिंदुच्या धर्मावरचे सनातनी राष्ट्र नको आहे . कट्टरता आणि धर्मांधता हिंदुत यायला नको आहे. देशबंधुना लिहिलेल्या ज्या पत्रात लालाजिंनी  इस्लाम धर्म , कुराण यामुळे फाळणीची आवश्यकता मांडण्याचि सुरुवात केली होती  त्याच पत्रात ते म्हणतात.
" हिंदुना मी सांगेन कि , जर कोणि या देशात हिंदुराज्य स्थापण्याचे स्वप्न पाहत असेल तर ते मूर्ख व वेडे आहेत. " ( २-२३०)
हिंदु धर्मात अनेक दोष आहेत. त्याचे निराकरण केले पाहिजे असे मानणार्या आर्य समाजाचे लालाजी चाहते होते. पंजाबचे सिंह लाला लजपतराय यांच्या मृत्युनंतर  श्रद्धांजली वाहताना डॉ बाबासाहेब आंबेडकर   ७ डिसेंबर १ ९ २ ८  च्या बहिष्कृत भारत च्या अग्रलेखात   म्हणतात -


" लाला लजपत राय यांनी राजकारण आणि समाजकारण यात फारकत करून  आपल्या पंगुपणाचे प्रदर्शन कधीच केले नाही .त्याकाळी  लालाजिंचा आर्य समाज मुस्लिमांच्या आक्रमणापेक्षा जातीभेदादि हिंदु समाजाच्या अंतर्गत दोषांकडे अधिक लक्ष पुरवत असे . अस्पृश्यांच्या चळवळीबद्दल लालाजिंचि सहानुभूती कळकळीची होती  "   - डॉ बाबासाहेब आंबेडकर





लालाजीं नी संपुर्ण स्वातंत्र्याचि मागणी केली नाही . मर्यादित स्वराज्याची केली आहे.  अखंड  भारताचे संपुर्ण स्वातंत्र्य म्हणजे लोकसंख्येच्या बळावर मुस्लिम राज्य असे त्यांना वाटत असे. (२-२७० )   १९२५ च्या कलकत्त्याच्या हिंदु महासभेच्या अध्यक्षपदावरुन बोलताना लालाजींनि आधी लखनौ कराराचा निषेध केला आहे.  आणि म्हटले आहे : -

" ज्या लोकसत्ताक राज्यात भारतातील  हिंदु मुसलमान व अन्य धर्मीय हे त्या धर्माचे नव्हे तर भारतीय म्हणुन साभागी होऊ शकतील अशा स्वराज्याचे आम्ही आग्रही समर्थन करतो . "         (२ -२३०) 


 सेक्युलर भारतासाठी फाळणी 

भारत सेक्युलर ठेवण्यासाठी लालाजींच्या हिंदु महासभेला फाळणी हवी आहे . फाळणी झाल्यानंतर येथील मुस्लिमांना तिकडे पाठवुन द्यावे असे  लाला लजपत राय म्हटलेले नाहीत. मुस्लिम लोकसंख्येच्या बळावर मुस्लिम लीग धमक्या देतो आहे . फाळणी झाली कि मुस्लिम लोकसंख्या कमी होईल आणि मग उरलेल्या मोजक्यांना  आपण आपल्या राष्ट्रीय सेक्युलर प्रवाहात सामील करून घेऊ असे त्यांना वाटत असावे. लालाजिंचे विचार  दोन लोकांनी पुढे चालवले - पण वेगवेगळ्या अर्थाने ! ते दोघे आहेत सावरकर आणि जिन्हा !


लालाजींचे विचार सावरकर आणि जिन्हा उधृत करतात 

१९३७ साली सावरकरांनी हिंदु महासभेच्या अध्यक्षपदावरुन लाला लजपत रायांचा वारसा पुढे चालवला आहे. हिंदू आणि मुसलमान हि दोन राष्ट्रे आहेत . त्यात एकता होणे अवघड आहे असा द्वि राष्ट्रवाद सावरकरांनी सत्य म्हणून मांडला. मुस्लिम लीगच्या दादा गिरीला तोंड देण्यासाठी हिंदुनि संघटित व्हावे . पण फाळणी मात्र करू नये असे सावरकरांचे मत होते. या दोन राष्ट्रांनी एकाच देशात रहावे.  मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा द्याव्यात . पण त्यांच्या अव्वाच्या सव्वा मागण्या मान्य करू नयेत . देशाचे संविधान निधर्मी सेक्युलर विज्ञान निष्ठ असावे असे सावरकरांचे स्पष्ट मत आहे . हे लाला लजपत रायांचेच  विचार हिंदु महासभेच्या नव्या अध्यक्षाने पुढे न्यावेत हे हि अतिशय नैसर्गिक आहे .   


१९४० : जिन्हा लालाजिंचे दाखले देतात 

विज्ञान निष्ठा , सेक्युलर भारत असल्या भानगडी मुस्लिम लीग ला  मान्य नव्हत्या . मुस्लिम लीगच्या १९४० सालच्या अध्यक्ष पदावरून आपले मत सिद्ध करण्यासाठी महम्मद अली जिन्हांनि लाला लजपत राय यांचेच दाखले दिले आहेत. जिन्हा म्हणतात 

" मुसलमान नेते कुराण आणि हदीसच्या आज्ञा तोडू शकत नाहीत. हे लाला  लजपतचे  मत अगदी अचूक आहे. लाला भारतातील सात कोटि मुस्लिमांना भीत नसत पण ते अफगाणिस्तान , अरेबिया तुर्की या एकत्रित मुस्लिम उम्मत ला भीत असत
हिंदुना धमक्या द्यायला आणि आपल्या द्वि राष्ट्र वादाचे समर्थन करायलाही जिन्हा लालाजिंचे विचार उधृत करतात हे लक्षणिय आहे.


फाळणी एका वरदान 

डॉ  आंबेडकर सनातन धर्माचे विरोधक होते. पण हिंदु समाजाच्या हिताची त्यांना काळजी होती . फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५  साली -  बाबासाहेब म्हणाले होते. --

" पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . " (६-१४६)  



फाळणीचे कारण सांगताना बाबासाहेब लिहितात - 

 " इस्लामी बंधुत्व हे सर्व मानवांसाठी  नाही. ते फक्त मुस्लिमांपुरतेच मर्यादित आहे. मुस्लिम बंधुसंघा ( Corporation) साठी सर्व प्रेम व फायदे आहेत . जे मुस्लिम बंधुसंघाबाहेर आहेत त्यांकरता घृणा आणि शत्रुत्व याशिवाय काहीही नाही .....  भारताला आपली मातृभूमी आणि हिंदुना बांधव मानण्याची परवानगी - इस्लाम धर्म सच्च्या मुस्लिमाला  देत नाही . "  (४-३३०)


हिंदु बहुसंख्येचा भारत सेक्युलर राहण्याच्या शक्यता अधिक आहेत . भारत सेक्युलर राहावा म्हणुन डॉ आंबेडकरांनी  फाळणीचे समर्थन केलेले आहे. लाला लजपत राय यांनीही याच कारणाने फाळणीचे समर्थन केलेले आहे. दोन राष्ट्रांचे वास्तव मान्य करूनही फाळणी नको ! हि सावरकरांची भूमिका मात्र कोड्यात  टाकणारी आहे !!


सर सय्यदांनी प्रथम १८८७ साली द्विराष्ट्रवादाची तुतारी फुंकली होती . पुढे १९२४ ला लाला लजपतराय , १९३७ ला सावरकर आणि १९४० ला जिन्हा हीच द्विराष्ट्रवादाची भूमिका मांडत आहेत.  निष्कर्ष वेगळे असले असले तरी जिन्हा , सावरकर,  सर सय्यद , लाला लजपत राय आणि डॉ  आंबेडकर  यांचे एका बाबतीत मात्र एकमत आहे . --
इस्लाम धर्म आणि  कुराणानुसार द्वि राष्ट्र वाद सत्य आहे . आणि हि धार्मिक आज्ञा मुस्लिम समाज सोडणार नाही !  





-----------------
संदर्भ 

(८ - ३२०)  हा संदर्भ ८ व्या संदर्भ ग्रंथातील  ३२० वे पान असा वाचावा . 

(१)  Gandhi: Pan-Islamism, Imperialism, and Nationalism in India. B. R. Nanda - OUP (1889)

(२) गांधी आणि कोन्ग्रेस ने अखंड भारत का नाकारला ? मोरे शेषराव - राजहंस प्रकाशन

(३)२६ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर १९२४ या काळात लाला लजपत राय यांनी ट्रिब्युन वर्तमानपत्रातले  लेख  (सौजन्य  कोलंबिया युनिव्हर्सिटि)  त्याची लिंक : . http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00islamlinks/txt_lajpatrai_1924/txt_lajpatrai_1924.html

४)  Dr B R Ambedkar  Volume 8 : पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया   

५) Hindu Nationalism: Origins, Ideologies and Modern Myths by Chetan Bhatt

६) Volume 1. Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989)  

८ फेब्रु, २०१६

निरंजन टकलेंचि शेळी : बें बें सावरकर

निरंजन टकलेंचि  शेळी :  बें बें सावरकर

महापुरुष हि  कल्पना मला मान्य नाही. महात्मा  गांधीजी , पंडित नेहरू किंवा नेताजी बोस प्रमाणेच सावरकर एक मनुष्य होते आणि त्यामुळे त्यांकडे चुकण्याचा - शिकण्याचा - स्वत:ला   बदलण्याचा अधिकार आहे, असे मला वाटते. हिमालया एव्हढ्या चुका करण्याचा - असा अधिकार प्रत्येक माणसाला असतो . त्यातून नवे शिकण्याचा अधिकार सुद्धा असतो . पण  नाशिक स्थित टकले  सावरकरांना माणुस समजत नाहीत  -

टकले सावरकरांना भ्याड आणि पळपुटि शेळी म्हणून  हिणवतात. शेळीला केले सिंह - सावरकर - अ ल्यांब लायनाइज्ड  असा लेख त्यांनी द वीक मध्ये   लिहिला आहे. सावरकर हा  माणुस नसून (भित्री ) शेळी होती असे टकलेने सिद्ध केले असते तर ठीकच ! पण तसे न करता त्यांनी ५००० शब्दाहून अधिक थापाच थापा मारल्या आहेत .






खोटे पुरावे , चुकीच्या तारखा,  लबाड निष्कर्ष  

टीव्हीवर बोलताना टकले  (२१/१५ / १० इत्यादी )  हजारो कागदपत्रे आर्काइव्हस मधून वाचल्याचा बाता मारतात  . वास्तवात त्यांनी  एकही मूळ पुरावा वाचलेला नाही. एकही अस्सल कागद पत्राचा संदर्भ दिलेला नाही. बाकी सोडा हो - टकल्यांनि सावरकर चरित्र सुद्धा वाचलेले नाही . टकलेंचा लेख पाच हजार शब्दाहून मोठा आहे . त्यात एकही मूळ कागद नाही . एकही नवा पुरावा नाही . अशा बेशिस्त खोटारड्याला मराठी सुशिक्षित लोक अभ्यासक समजू लागले आहेत. टकले हा भाडोत्री माणुस आहे.   सगळ्यात मोठी गंमत म्हणजे टकलेने
य दि फ़डकेंना कट्टर सावरकरवादी - स्त्रोञ्च सावरकराइट म्हटले आहे . ज्यांनी थोडे बहुत वाचन केले आहे अशी मराठी माणसे   या टाकल्यांच्या  स्त्रोञ्च विनोदावर ख्खो  ख्खो ख्खो हसतील !

निरंजन टकले स्वत:च्या (आड ) नावाबद्दल फारच सेन्सिटिव्ह आहेत. त्याला  टकल्या म्हटले की राग येतो . सावरकर माणूस नसून शेळी  आहे . परत ती सावरकर  भित्री शेळी आहे --- हे याच  ४२० केस चे मत आहे.     . ज्याला सावरकराना माणूस म्हणायचे नाही - त्याच्या आडनावाची  चिंता मी तरी करणार नाही .  बाकी त्यानी मारलेल्या थापा पाहुया …

सर्वात मोठी थाप 

सावरकर विषयक  लिहिताना गांधीजिंच्या खुनाचे  भांडवल केले पाहिजे हा फुरोगामी नियम निरंजनाने पाळला आहे . पण पुन्हा पुन्हा खोटे आणि पुरावे शून्य !   कपूर आयोगात पुरावे आहेत असे निरंजन टकलेंचे मत आहे.   . मग हा कथित शोध पत्रकार  गंमत करतो आणि त्याच्या लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात म्हणतो - कि कपूर आयोग २२ मार्च १९६५ रोजी स्थापन झाला .  टकल्या खान्कून  खोटे बोलतो आहे. कपूर आयोग स्थापन झाला २१ नोव्हेबर १९६६ साली . शोध पत्रकाराने तारीख का बदलली ? या खोट्या तारखे मागचे कारण फार इंटरेस्टिंग आहे !

कपूर आयोग इंटर्नेट वर उपलब्द्ध आहे. कपूर कमिशन असे गुगल वर टाइप केले तर तो मिळेल. त्याच्या सातव्या पानाचा स्क्रीन शॉट खाली देतो आहे .




-------------------------------------------------------------------------------------------------------


टकल्याने कपूर आयोग १९६५ साली स्थापन झाला असे तद्दन खोटे त्याच्या लेखात  लिहिले आहे . टकले नामक शोध पत्रकार खोटे बोलतो -- कारण त्याला खोटे निष्कर्ष काढायचे आहेत. सावरकरांचा मृत्यू फेब्रुवारी १९६६ सालचा आहे . कपूर आयोग १९६५ साली दाखवला कि बर्याच थापा मारता येतात.

  १९६५ साली पाठक आयोग स्थापन झाला आणि जस्टिस कपूर नोव्हेंबर १९६६ साली नियुक्त झाले - असे स्वत: जस्टिस कपुरनीच त्या कपूर आयोगात लिहिले आहे. पण निरंजन टकल्यांनि  तारीख बदलली - कारण त्यांना  त्याच्या मालकांनी भाडोत्री निष्कर्ष काढण्यासाठी कामावर ठेवले आहे . जो आयोग सावरकर मेल्यानंतर काम सुरु करतो तो कपूर आयोग टक्ल्यांनि एक वर्ष अलिकडे खेचला आहे !! बिच्चारे कपूर ! वस्तुत: आधीच्या आयोगांनी पुरेसे  काम केले नाही म्हणून कपूर नियुक्त झाले होते.

या  शेळी  लेखात टकले लिहितात  


"The report, however, came too late. Savarkar died on February 26, 1966, weeks after he stopped taking food and medicines.  "
लेखकाचे उद्देश इथेच स्पष्ट होतात. रिपोर्ट उशिरा आला असे त्याला म्हणायचे आहे.
वस्तुत:  सावरकरांना फासावर चढवायची टकल्याची  संधि हुकली ती रिपोर्ट उशिरा आला म्हणून नाही . तर टकल्याने तारीख चुकवली म्हणून !

सावारकर मेल्यानंतर  जस्टिस कपूर आयोगाचे काम सुरु  झाले . हे तर लेखक  लपवतोच पुन्हा खोट्टारड्या थापाडेपणाचि मजल गाठत म्हणतो - कि , कपूर आयोगापुढे सावरकरांचे अंगरक्षक  अप्पा कासार आणि दामलेंचि साक्ष झाली आहे . आणि या साक्षितुन सावरकर गोडसे संबंध सिद्ध होतात ! खोटे बोलण्याच्या सर्व मर्यादा  त्यांनी  पार पाडल्या आहेत !! 

निरंजन समर्थक फ़ुरोगाम्यांनि  समजून घ्यावे कि  कपूर आयोगासमोर अप्पा कासार आणि दामलेंचि साक्ष झालीच नव्हती.

अजिबात नाही . 

टकल्याची हि शुद्ध थाप आहे . कपूर आयोग जो इंटर्नेट वर उपलब्ध आहे - त्यात साक्षिदारांचि लिस्ट आहे - त्यात कासार / दामले हि नावे नाहीत . खोटार्डेपणा हा निरंजन टाकल्यांच्या चारीत्र्या वरचा डार्केस्ट स्पोट होय .








इस्लाम समर्थक टकले 

टकल्यांनि  त्यांच्या लेखात एकही नवा पुरावा दिलेला नाही. शमसुद्दीन इस्लामला मात्र ठीक ठिकाणी कोट केलेले आहे - सेड इस्लाम असे टकल्याच्या लेखात  ठिकठीकाणी येते -  हा शमसुद्दिन इस्लाम कोण आहे ? या इस्लामने शिवाजी महाराजांबद्दल काय लिहिले आहे ? ते मी सविस्तर लिहिणारच आहे .  निरंजन द पत्रकार - लिहितो कि , सावरकरांनि   फ़ाळणिला कारणीभूत ठरलेला  - दोन राष्ट्राचा सिद्धांत मांडला - आणि जिन्हांच्या मुस्लिम लीग ने तो उचलून धरला . म्हणजे हि आयडीया सावरकरांनि  जिन्हांना दिली !!  , टकल्यांचे मुळ वाक्य असे ,

"Thus, the theory of two nations, first proposed in Essentials of Hindutva, was passed as a resolution of the Mahasabha in 1937. Three years later, the All-India Muslim League, led by Jinnah, adopted the concept in its Lahore session."

निरंजन नेहमीप्रमाणे खोटे बोलतो आहे .  सर सय्यदांनी प्रथम १८८७ साली द्विराष्ट्रवादाची तुतारी फुंकली होती त्यावेळी गांधिजी शाळकरी वयाचे होते आणी चार वर्षाचे सावरकर नुकतेच बोलायला शिकले होते. द्विराष्ट्रवादाच्या मागणीसाठी या दोन्ही लहानग्यांना जवाबदार ठरवणे हे बालिशपणाचेच ठरेल.  परत लाल बाल पाल मधले - लाला लाजपत राय काय म्हटले होते ? हिंदु - मुस्लिम ऐक्याबद्दल ?? 

१९२४ सालच्या आधीपासून लाला लजपतराय फाळणीची बीजे रोवत आहेत. इस्लाम हा एक असहिष्णू धर्म आहे. आणि इस्लाम धर्म,  कुराण,  हदीस मध्ये हिंदुंचे हत्याकांड करावे असे स्पष्ट आदेश आहेत . असे लजपतराय म्हणतात . लाजपत राय हिंदु महासभेचे सर्वेसर्वा   आधीपासून होते - आणि हिंदू लजपत रायांच्या हत्येचा सूड घेण्याच्या केस मध्ये (सोडर्स मर्डर केस ) नास्तिक भगतसिंग हसत फाशीवर चढला . हे टकल्याला माहित असण्याचे कारण नाही .   मुळ कागद पत्रे सोडाच . इतिहासाचे पाठ्यपुस्तक सुद्धा या शोध पत्रकाराने वाचलेले नाही . लाला  लजपत राय लिहितात 


" गेले सहा महिने माझा बहुतेक वेळ मुस्लिम कायदा व मुस्लिम इतिहास यांचा अभ्यास करण्यात खर्च झाला आहे. यावरून माझे असे मत बनत चालले आहे कि - हिंदु मुस्लिम ऐक्य शक्य नाही आणि व्यावहारिक सुद्धा नाही . … मी मुस्लिम पुढार्यांवर विश्वास टाकायला  पुर्णपणे तयार आहे . पण कुराण आणि हदीस यातील आज्ञांचे काय ? "  (Ref Dr B R Ambedkar Volume 8 page 275 - 276) 

अर्थात थापेबाज टकल्याने आधी सावरकरच वाचलेले नाहीत मग हिंदु महासभेचे पूर्वसुरी लाला  लाजपत राय काय लिहितात ?  हे   कसे माहित असणार ? आणि लाजपत राय च्या हि  आधी १८८७ साली सय्यदांनि द्वि राष्ट्रवादाची तुतारी फुंकली होती हे तरी कसे कळणार ? बाकी कुराण आणि हदीस वाचून इस्लाम तटस्थपणे समजून घ्यावा हि अपेक्षा शमसुद्दिन इस्लामच्या  शिष्य गणांकडून  करता येत नाही . 


नीच मनोवृत्ती   : लबाड   समर्थक 

सावरकरांच्या माफीवर निरंजन  बरेच तेवले आहे.   लेखानुसार सावरकर नउ वर्ष आणि दहा महिने जेल मध्ये होते . टकल्या किती दिवस जेल मध्ये होता ? आणि कोणत्या कारणासाठी ??   असो





हा शोध पत्रकार लिहितो  कि सावरकरांनी कोलु चालवलाच नाही ! निरंजन ब्रिगेडी असावा . स्वत:चेच खंडन करणारे पुरावे हा  पढतमूर्ख स्वत:च्याच लेखात देतो आहे. सावरकरांचे माफीपत्र म्हणून एक स्क्यान त्यांनी स्वत:च्या लेखात टाकला आहे . त्यात माफी तर नाहीच . भारतीय जेल मध्ये टाका - असे सावरकरांचे निवेदन दिसते . नेमक्या त्याच स्क्यान मध्ये - कोलु  चा  उल्लेख (ओइल मिल ) सावरकरांनी केला आहे .  निरंजनाने कोणत्या लॉजिकने सावरकरांनी कोलु  चालवलाच नाही असे म्ह्टले ? - ते कळायला मार्ग नाही . टक्ल्याच्याच लेखात आलेले सावरकरांचे वाक्य असे आहे  -  

" त्याच काळात मला कोइर च्या कामास जुंपले गेले माझे हात रक्त्बंबाळ झाले आणि नंतर मला तेलाच्या घाणीस (कोलु ) जुंपले गेले . येथील (अंदमानातील )  सर्वाधिक कष्ट दायक शिक्षा. " - सावरकर 




 नाशिकच्या निरंजन टकल्यांचे फ़ेकाड्पंथि लॉजिक इथेच संपत नाही . बंडल ऑफ कोण्ट्राडिक्श्न या चैकटित त्याने आणखी धमाल केली आहे . निरंजन टकले लिहितात  कि माझी जन्मठेप या पुस्तकात मात्र सावरकरांनि माफ़िपत्राचा उल्लेख केलेला नाही . हि खोटार्डेपणाचि लिमिट झाली . निरंजन टकले नि माझी जन्मठेप हे पुस्तक वाचले असते तर तसा उल्लेख अगदी स्पष्टपणे अनेकदा आला आहे हे त्याना  कळले असते. 

'आत्महत्या, भ्रम, धरपकड आणि दुसरा व तिसरा संप' या प्रकरणातील क्रॅडॉकबरोबर झालेली चर्चा पहा. प्रकरणाच्या शेवटी आहे. चौथा संप आणि शरीर स्वास्थ्याचा बिघाड यातही सविस्तर विवेचन आलेले आहे )

माझी जन्मठेप या पुस्तकात सावरकरांनी माफ़ि प्रकरण सविस्तर लीहिले आहे . पण सावरकरांच्या या पुस्तकात तसा उल्लेखच नाही असा दिव्य शोध दिवट्या निरांजनाने लावला आहे. माझी जन्मठेप मधील काही पानांचे स्क्यान : - 








 बाकी टकल्याचे अंध समर्थक त्याहून घातक आहेत. 


रत्नागिरीत सावरकरांनी हिंदुसभा हे एक समाज सुधारणा मंडळ स्थापन केले होते . त्याचा हिंदु महासभेशी काहीही संबंध नाही . थापा मारण्याच्या ओघात हिंदुसभा हे समाज सुधारणा मंडळ आणि हिंदु महासभा हा राजकीय प्ल्याटफ़ोर्म  यातला फरक लेखकाने बेमालूम दडपला आहे .  

पुढे सावरकर थेट  हिंदु महासभेत  गेलेले नाहीत आधी स्वराज्य पक्षात गेलेले आहेत , मग बर्याच काळाने लाला लाजपतराय यांच्या हिंदु महासभेत सावरकरांनी प्रवेश केला …

माफिचे उत्तरकांड  हि निरंजन निरंतर खोटेच बोलतो आहे . 

कथित माफी नंतर सावरकर सुटलेले नाहीत सावरकर  फक्त भारतातल्या जेल मध्ये हलवले गेले. आणि त्यांचे हिंदुत्व हे पुस्तक सुद्धा जेल मध्ये लिहिलेले आहे .   इथेही थाप  !

ते पुन्हा जेल मध्येच राहिले आणि नंतर रत्नागिरीत स्थान बद्धतेत राहिले. तिथेही सावरकरांच्या उद्योगात खंड पडलेला नव्हता . रात्नागीरीतली एक महत्वाची घटना टाकलेंच्या  लेखात येते . 

रत्नागिरी कालखंडात  क्रांतिकारक विनायक चव्हाण यांनी  ब्रिटीशांवर गोळ्या झाडल्या . हे चव्हाण सावरकरांचे अनुयायी होते असे टकल्याने स्वत:च्याच लेखात लिहिले आहे . परत  थोबाड  वर करून विचारतो आहे - 
कि सावरकरांनी अंदमान नंतर रत्नागिरीत  काय केले ?

थोबाड फुटले असते  

शिवसैनिक जुन्या फार्मात असते तर टकल्या विरुद्ध आंदोलन  फुटले असते. सुदैवाने सैनिक सध्या विवेकी झाले आहेत . हिंदुत्व हा शब्द १९४७ नंतर पहिल्यांदा उद्गारणार्या वडीलधार्या व्यक्तीवर  हलकट दर्जाची टिका करूनही - या खोटारड्याला फक्त वैचारिक विरोधाचा सामना करावा लागतो आहे . हि अतिशय समाधानकारक बाब आहे .  हा विवेक वाद असाच रहावा !!

पण निरंजन टकले यांकडे थोडाही विवेक नाही . धमक्या देणे , हमारी तुमरीवर येणे , लोकांना नपुंसक म्हणणे , बंदुका गोळ्या अशी भाषा वापरणे हि टकल्यांचि   वैचारिकता ! यापेक्षा अल्पशिक्षित सैनिक सभ्य आहेत .   टकल्यां सारखि भाषा वापरून मला माझे थोबाड बिघडवायचे नाही. 






सावरकरांचा बुद्धिवाद -  विज्ञान निष्ठा - जाति व्यवस्था विरोधी विचार - नास्तिक मत  याला टकल्याने त्याच्या लेखात स्थान दिलेले नाही . पण ते ठीकच…। 

कारण - टकले ने सावरकर वाचलेलेच नाहीत . सावरकर मुस्लिम लोकांस समान हक्क देऊ इच्छित होते . मुस्लिम सुधारक केमाल पाशाचे मुक्त कंठाने कौतुक करत होते .  मुस्लिमांना आधुनिक बुद्धिवादी विज्ञान निष्ठ होण्याचे आवाहन करत होते . 

हे त्यांच्या भाषणातले मुद्दे  हा शोध पत्रकार विचारात घेणार नाही … कारण तो इस्लामचा शिष्य  आहे . बाकी टकल्याने आमच्याशी वैयक्तिक भांडण घेऊन गोळ्या देण्या घेण्याची जाहीर भाषा केली आहे. 

 त्यानंतरहि त्याला मिळणारा गांधिवाद्यांचा पाठिंबा लक्षणिय आहे .  असो . 

मी आधी भारतीय  सैन्यातल्या   अधिकार्यां बरोबर काम केले आहे .  मेडिकल ऑफिसर होतो. श्रिलंकेतल्या युद्धभूमीवर वावरलो आहे . आणि हे बंदुक गोळ्या  सारे जवळून पाहिले आहे. देशाबाहेरील शत्रूकडून गोळ्या खायची आमची तयारी होती .  आणि देशाच्या आतील निरंजन टकल्या च्या समर्थका कडुन असे काही घडले तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही .  











सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *