२६ नोव्हें, २०१५

२६ नोव्हंबर संविधान दिन



२६ नोव्हेंबर संविधान दिन

या संविधान दिनी एक प्रतिज्ञा करू कि आपला  धर्म आणि भारतीय संविधान यात अंतर आले , तर आपण संविधनाचे पालन करू . भारत देश आज एक आहे - जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे - त्याची बीजे संविधानात आहेत …।  संविधनाचा मुलभुत ढाचा आणि राज्यघटनेतिल मार्गदर्श तत्वे याचे अनुसरण  राजकाराण  आणि समाजकारणात व्हावे  म्हणून प्रयत्नशील राहू .

--------------------
भारतीय संविधनाचि मूळ प्रत : अतिशय दुर्मिळ अशी  हि केवळ १००० प्रतींची आवृत्ती आहे : यात भारतातील विविध धर्म , परंपरा , राजे यांची चित्रे आहेत .  हि संविधानाचि पहिली प्रत होय . हीच प्रत डॉ. आंबेडकरांच्या चित्रात / पुतळ्यात दिसते :  त्याची पीडीएफ कोपि इंटर्नेट वर उपलब्ध आहे   http://dl.wdl.org/2672/service/2672.pdf

२५ नोव्हें, २०१५

आमिरचे इस्लामी अंतरंग


आमिर  खान चे ग्रेट पूर्वज मौलाना जमालुद्दीन यांनी सहिष्णू अकबर बादशहा  विरुद्ध  जेहाद पुकारला होता हे कोणाला माहित आहे ? जेहाद म्हणजे काय ? अथवा देश सोडुन जाणे - हिजरत याचा इस्लामी पारिभाषिक अर्थ किती लोकांना समजतो ? इस्लाम बद्दल संपुर्ण अज्ञान बाळगणारी जमात म्हणजे हिंदु . आणि इस्लामला  दुध पाजून गोंजारणारा घटक म्हणजे पुरोगामी हिंदु . ज्येष्ठ पत्रकार तवलीन सिंग या धर्माने शीख असल्याने त्यांच्याजवळ हिंदु पुरोगाम्या एव्हढी सद्गुण विकृती नाही . म्हणून त्यांनी खांन साहेबाच्या असहिष्णू परदेश वापसी वर सणसणीत गुगली टाकली.   ती गुगली टोलवण्याच्या नादात आमिरचा  त्रिफळा  अल्ला, कुराण  आणि हिजरत च्या रूपाने प्रकटला . तवलिन सिंग यांनी स्पष्टच विचारले कि इस्लामी दहशत वादाबद्दल  भारतीय असहिष्णुते इतकी काळजी वाटते का ?  त्यावर चर्चा घडली . या प्रश्नोत्तराचा अर्थ  हिंदू लोकांना कळणार नाही कारण त्याना इस्लामचा अर्थ आणि संदर्भ बिल्कुलच  समजत नाही . हिंदुत्व वाद्यात अभ्यासाची परंपरा नाही . आणि पुरोगामी अभ्यासकात इस्लामचे खोटे कौतुक करण्याची परंपरा आहे . आमिरची  भूमिका  समजून सांगायला हा लेख लिहित आहोत.  अमीर फार मोठ्या इस्लामी खानदानाचा चिराग आहे . त्याच्या घराण्याचा इतिहासही समजून घ्यावा लागणार आहे .

आमिर खानचे  केवळ त्या घराण्यात असणे   महत्वाचे नाही . तर त्यांचे विचारही  पूर्वजांशि जुळतात   ते महत्वाचे आहे . 

एकाच मुलाखतीत भारताला असहिष्णू  … इस्लामला  सहिष्णू आणि … भारत सोडण्याला वर्धिष्णू असे आमिर खान का म्हणाला ? याचा उलगडा लेख वाचल्यावर होऊ शकेल . आणि हे केवळ मुस्लिम व्होट बेंक पोलिटिक्स नव्हे - जिता जागता इस्लाम आहे .  याचीही प्रचीती येईल .




त्रिफळा : आमिरची असहिष्णुता , आझादांचा करार  आणि जमालुद्दीन चा जेहाद 


असे भारत सोडुन जायचे आवाहन आमिरच्या खानदानात अनेकांनी केलेले आहे . त्याला इस्लामी परिभाषेत हिजरत असे म्हणतात .  आमिरचे मामे आजोबा म्हणजे अबुल कलाम आझाद आणि या मामुजान चे  ग्रेट पूर्वज म्हणजे मौलवि जमालुद्दीन होय . (१)  या तिघांचे रक्ताचे थेट नाते तर आहेच शिवाय इस्लामी मेंदुच्या ताराही जुळलेल्या आहेत . आमिरची असहीष्णूता समजून घ्यायची असेल तर प्रथम मामुजान मौलाना  आझादांची हिजरत समजून घ्यावी लागेल  आणि त्या आधी  त्याचे ग्रेट पूर्वज मौलवी जमालुद्दीन यांचा जिहाद समजून घ्यावा लागेल.  तर आमिरचे ग्रेट पूर्वज मौलाना जमालुद्दीन यांनी सहिष्णू अकबरा विरुद्ध  जेहाद पुकारला होता .  (२)

या दोन पूर्वज मौलानांशी  आमिर खानचे विचार कसे जुळतात ते  पाहुया.  


जमालुद्दीन चा अकबरा विरुद्ध  जेहाद   


बादशहा अकबर हा मध्ययुगातला विचारी राजा आहे. आणी नव्या अनुभवानी.... नव्या विचारानी माणसे बदलतात.... याचे उदाहरण आहे. सुरवातीला पारंपारिक जुलमी असलेला अकबर पुढे भारतातील वेगवेगळ्या पंडितांशि चर्चा करू लागला . धार्मिक विषयांवर चर्चा करण्याचा छंद अकबराला लागला आणि त्यासाठी इबादतखाना नावाचे नवे ऑफिस अकबराने उघडले . 

शिया, सुनी, पारशी, शीख, जैन, बौद्ध, वैष्णव, शैव असे वेगवेळ्या पंथांचे पंडित बोलावून - इबादतखान्यात अकबर त्यांच्याशी चर्चा करू लागला. येथे चार्वाकाचे अनुयायी येवून गेल्याचे नोंद आहे. या चर्चात परस्पर मतांचे मंडन , खंडन होत असे. कफिरांना कुराणचे खंडन करायचा अधिकार देणे मौलवींना पटण्याजोगे न्हवते. हळूहळू सर्वच धर्म खरे आहेत अशा भुमिकेवर अकबर येवून पोचला. शेवटच्या चार्वाकाचा ऐतिहासिक उल्लेख अकबर बादशहाच्या काळात आढळतो . हा शहाणा अकबराची भेट घेऊन त्याला आपली नास्तिकता पटवून देत होता . उत्तर आयुष्यात १५८२ साली अकबराने इस्लाम धर्म सोडून दिला आणि दिने इलाही नावाचा नवाच धर्म काढला .त्याच्या या नव धर्माला - धर्म ग्रंथच नव्हता . मौलवी / पंडित हि भानगड पण नव्हती . या नव धर्म स्थापनेवर कदाचित चार्वाक मताचा अंशत: प्रभाव असावा.  

अकबराने  हिंदुवर लावलेला झिजीया कर  रद्द करून टाकला पुढे मुस्लिम धर्मगुरूंचा ब्लास्फेमीचा अधिकार  काढून घेतला. इस्लामचे प्रेषीत मुहम्मद पैगंबर यांवर कुणी टीका केली तर मुसलमान ते सहन करू शकत नाहीत. अशी टीका करणार्यांचा छळ करण्याचा अधिकार मुस्लिम धर्मगुरूंकडे असतो. आजही सर्व मुस्लीम देशात हा कायदा आहे. १५७९ साली अकबराने हा कायदा रद्द केला. (२)





अकबराने ब्लास्फेमीचा कायदा रद्द केल्यामुळे मौलवी चिडले. त्यांनी अकबराविरुद्ध बंड केले. कलक्त्त्याला मोठे बंड झाले. अकबराचा पाडाव झाल्याशिवाय भारतात इस्लामला भविष्य नाही असे मौलवींना वाटत होते. त्यांनी अकबराला काफर म्हणून जाहीर केले आणी अकबराविरुद्ध जिहाद पुकारला. अकबराने उलेमा आणी मौलवींचे बंड क्रूरपणे चिरडले. अनेक शेख आणी फकीर हद्दपार केले. अनेकांना कंदाहरच्या बाजारात विकले. त्यांच्या दर्गे आणी मशीदिंच्या जमिनी जप्त केल्या. राजकीय गोंधळ घातल्यास वक्फ च्या जमिनी जप्त करणारा आणी इस्लामी धर्मवेड्यांना गुलाम करून कंदाहरच्या बाजारात विकणारा, अकबर हा पहिला आणी शेवटचा भारतीय. 

 अकबर त्याच्या धर्म चिकित्सक बुद्धीमुळे आणि धर्म सहिष्णू राज्य कारभारामुळे तो सर्व धर्मीय प्रजेत लाडका होता . दिने इलाही या नव्या धर्माचा संस्थापाक  म्हणून  तो निर्वातला .  शिवाजी महाराजांनीही अकबराची स्तुती केल्याचे उल्लेख इतिहासात येतात. 

ज्यांनी अकबराविरुद्ध जिहाद केला   - अशा प्रसिद्ध मुल्ला मौलवित जमालुद्दीन हे नाव फार महत्वाचे आहे. ते मेहदवि चळवळीचे पाठीराखे होते . सय्यद नुरुद्दीन या आपल्या पूर्वजाचा वारसा ते चालवत होते . सय्यद नुरुद्दीन यांनी इस्लामी राजेरजवाड्यांनी इस्लामची मुल तत्वे सोडून भरकटू नये म्हणून हि चळवळ चालवली होती .  सय्यद नुरुद्दीन आणि जमालुद्दीन या प्रसिद्ध मौलवींच्या वंशात मौलाना आझादांचा जन्म झालेला आहे . (२) मौलाना आझाद हे अमीर खानचे मामे आजोबा होत . 


आझादांचा करार  


भारताच्या राजकारणात मुल्ला मौलाविना आणण्याचा अग्रमान मौलाना आझादांकडे जातो. १९१२ साली मौलाना आझाद यांनी 'अल हिलाल' नावाचे उर्दू साप्ताहिक  काढले आणि राजकारणात धर्म (इस्लाम ) आणला पाहिजे याचा ते जोरदार प्रचार करू लागले . (२). त्यांच्याच प्रेरणेने जमियत उलेमा हिंद नावाची उलेमांचि संघटना स्थापन झाली  आणि मौलविंनि धर्माचे आवाहन करून मुस्लिमांना उत्तेजित करायला सुरवात केली . ब्रिटिशांचे शासन आल्यामुळे भारत हा दार उल हरब (शत्रू भूमी ) बनलेला आहे . सबब ब्रिटिशांना हाकलून देऊन कुराण आणि शरियत वर आधारित राज्यव्यवस्था आली पाहिजे अशी मागणी मौलवी करू लागले. ब्रिटिशांना  विरोध करण्यासाठी या मौलविंनि कोन्ग्रेस शी हातमिळवणी केली म्हणून त्याना राष्ट्रवादी मुसलमान म्हटले जाते .  मौलाना आझादांच्या 'अल हिलाल' मध्ये अशी शिकवण दिली जात होती कि , 

"एका हातात धर्म आणि दुसर्या हातात राजकारण पाहिजे, पण कुराण मात्र दोन्हीकडे पाहिजे . (इमानवंत  हो = अल्लाहशी एकनिष्ठ ) तुम्ही अजिबातच हिंदुना घाबरू नका . फक्त अल्लाहची भीती बाळगा. तुम्ही अल्लाहने दिलेला गणवेश टाकून दिलेला आहे . तो अंगावर घाला म्हणजे सारे जग तुम्हाला घाबरू लागेल .  तुम्ही अल्लाहने पाठवलेले पृथ्वीचे शासन कर्ते आहात.   '(३)



मध्ये  आझादांनी कुराणाचा सहिष्णू अर्थ लावण्याचा प्रयत्न केला होता पण तो फसला .  या अक्षम्य गुन्ह्याबद्दल मौलविंनि त्याना तीन वेळा दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा दिली . हा  काल्पनिक फतवा  कधी आमलात आणला गेला नाही . पण मुस्लिम समाजाचे राजकीय नेते होण्यासाठी काय करावे ? वा करू नये ? याची पुन: शिकवण आझादांना मिळाली. 

काफ़िरांशि संबंध ठेवण्याचे ३ इस्लामी मार्ग :

जिहाद , करार आणि हिजरत हे इस्लामनुसार काफ़िरांशि राजकीय व्यवहार करण्याचे तीन महत्वाचे मार्ग आहेत. जिहाद (प्रयत्न  / पराकाष्ठा ) प्रथम स्वत:च्या मनातल्या गैर इस्लामि वृत्तीविरुद्ध करायचा आहे . नंतर वाणी आणि लेखणीने काफ़िरांना इस्लाम मध्ये बोलवायची दावत देण्यासाठी जिहाद करायचा आहे . इतके समजावूनही काफिर मुस्लिम झाले नाहीत तर मात्र (जिहाद बा सैफ ) तलवारीचा जिहाद करावा अशी कुराणाची आज्ञा आहे . अर्थात जिहाद करण्या एव्हढी शक्ती प्राप्त होई पर्यंत काफ़िरांशि करार (मोइदा ) करून राहता येते. तेही न जमल्यास दार उल हरब (शत्रू भूमी)  ला सोडुन  . दार उल इस्लाम मध्ये स्थलांतर करावे लागते . अशाप्रकारे देश सोडुन जाण्याला हिजरत असे म्हणतात .

मौलाना आझादांच्या मते काफिर हिंदुशि करार (मोइदा ) करून भारतात रहावे. इंग्रजांविरुद्ध जिहाद करण्यासाठी मौलाना आझादांनी  हा निर्णय घेतलेला आहे . हिंदुशि केलेला हा करार हा कुराण आणि शरियत या इस्लामी कायद्यानुसारच आहे अशी आझादांचि धारणा आहे .  असगर आली इंजिनिअर  लिहितात : (४ )

" हिंदु मुसलमान यांनी एका राज्यात रहावे यासाठी , आझाद प्रेषित मुहम्मद यांनी ज्युंबरोबर केलेल्या मदिना कराराचा आधार घेत असत ."  ते प्रेषीतांचे उदाहरण असल्याने शरियतचा भाग होत होता . या मदिना करारात शरियतचे राज्य असणार होते . राज्याचे प्रमुख प्रेषितच होते. कायदे करणारे , त्यांचा अंमल करणारे व न्याय देणारे तेच होते . हे प्रेषीतांचे अधिकार मौलाना आझादांना इमामासाठी पाहिजे होते . इमामाच्या  राज्याखाली हिंदुनि रहावे असे त्यांना वाटत होते . (४,५)
जमालुद्दीनचा जिहाद आणि आझादांचा करार समजून घेतला कि आमिरची असहिष्णुता समजण्यास मदत होईल . इस्लामची जुजबी ओळख झाल्यावर आता , तवलीन सिंग आमिर खान आणि मुलाखतकार यांच्यात काय चर्चा झाली ते पाहू :



आमिरचा इस्लाम वाद  : दहशतवादाला धर्म नसतो पण असहिष्णुतेला देश असतो !


भारतात असहिष्णुता वाढली आहे काय ? याचे उत्तर आमिर खान ने होकारार्थी दिले . बायकोचे नाव घेऊन भारत देश सोडुन जाण्याविषयी बोलला . तिचेअसहिष्णू  मत आमिरानेच सार्वजनिक केले आणि ते मान्य असल्याचेही सांगितले .  पण हि चर्चा इथे थांबत नाही . आमिरला दहशत वादाविषयी प्रश्न विचारल्यावर मात्र त्याने दहशतवादाला कोणताच धर्म नसतो असे उत्तर दिले . इस्लामी दहशतवाद असे म्हणू नये  असे आमिरने ठासून सांगितले . मग उगीच इतरही धर्माची  नावे घेतली ! दहशतवादाला धर्म नसतो पण असहिष्णुतेला देश असतो असे हे लॉजिक ! पिके चित्रपटात हिंदुच्या देवाधर्माची चिकित्सा आणि चेष्टा  करणारा पुरोगामी आमिर खान इस्लाम बद्दल भलताच आस्तिक निघाला !

आमिर खान चा जन्म इस्लाम मधील अतिशय महत्वाच्या मौलविंच्या घरातला आहे . त्या सांस्कृतिक वारशातून आणि बहुश्रुत , वाचनातून त्याला इस्लाम बद्दलच्या सर्व चर्चा ठाउक आहेत. आमिरचा ब्लोग पाहिला तर त्याच्या या संबंधिच्या ज्ञानावर सहज प्रकाश पडेल. 





तवलीन सिंग यांनी हि चर्चा पुढे वाढवली , त्यांनी म्हटले 
"इस्लामला वाचवण्यात काहीहि  अर्थ नाही. प्यारिस मधील हल्लेखोरांच्या हातात कुराण होते . ते अल्लाहू अकबर ओरडत होते. भारत जितका सहिष्णू वा असहिष्णू आधी होता तितकाच आताही आहे . आमिर जर तू  (हिंदुंच्या ) असहिष्णुते बद्दल इतका संवेदनशील आहेस तर या दहशत वादी हल्ल्यांबद्दल तुझी संवेदना काय आहे ? … वहाबी इस्लामच्या वाढत्या प्रसाराबद्दल तुझे काय मत ? "

यावर उत्तर देताना खान साहेबांनी वहाबी इस्लाम बद्दल चकार शब्द काढला नाही. उलट इस्लाम किती गोंडस आणि शांततेचा धर्म आहे हे ते पटवत बसले . अशाप्रकारे  मोडरेट लोक्स  धर्माचे रक्षण करतात. आणि धर्मातून  नवे   दहशतवादी तयार होत रहातात.

हिंदुच्या असहिष्णुतेने चिंताक्रांत झालेला आमिर खान इस्लामी दहशतवादाबद्दल कशी  धर्म रक्षक भूमिका घेत होता ते वाखाणण्या जोगे होते.

तवलीन सिंग यांनी असेही सुचवून पाहिले कि गालिब चा भारतीय इस्लाम आणि वहाबी आक्रमक इस्लाम यात फरक केला पाहिजे . आमिरने हा सल्ला धुडकावुन लावला  . सारा इस्लाम निष्पाप आहे आणि इस्लाम हिंसेला परवानगी देत नाही अशीच रट शेवटपर्यंत लावली. आमिर मौलाना आझाद आणि मौलाना जमालुद्दीन यांची पेन इस्लामिक भूमिका मांडत राहिला .

कुराणात काही सुरा मक्का शहरात  अवतीर्ण झाल्या आहेत आणि काही सुरा मदिना शहरातल्या आहेत . शक्ती कमी असताना इस्लाम धर्माचे गोड बोलून रक्षण आणि शक्ती वाढली कि परधर्म निर्दालन अशी कुराणाची स्पष्ट शिकवण या वरून समजते . जामाते इस्लामीचे संस्थापक मौलाना मौदुदि आणि नास्तिक अभ्यासक नरहर कुरुंदकर यांनी या विषयावर बरेच भाष्य केलेले आहे . (७)

एकतर आमिरची भूमिका कुराणाला धरून पडत्या काळातील गोड बोलून  धर्म रक्षणाचि असेल……  किंवा तो इस्लामची चिकित्सा करायला भीत असेल .

जर तो इस्लाम बद्दल बोलायला भीत असेल आणि हिंदुच्या असहीष्णूतेबद्दल एल्गार करत असेल तर - सहिष्णू कोण ? हे आमिरनेच समजून घेतलेले बरे.

 काही कलाकार याआधी भारत सोडतो वगैरे बोलले होते पण त्यांनी कोणतीही धार्मिक वा राजकीय टिप्पणी केली नव्हती .  आमिरने ती केली .

आमिर खान च्या इंटरर्व्ह्यु मधील ४ मिनिटे (व्हिडियो )



इतक्या अतिरेकी हल्ल्यांनंतरही इस्लामला हिंसक ठरवणे
चुकीचे आहे....
बर  मग..
दोन - चार घटनांवरून माझ्या देशाला तुम्ही असहिष्णू का ठरवताय ?"

याचे उत्तर  आमिर खान ला आज ना उद्या  द्यावे लागेल


अमिर खानची हिजरत 


ज्या देशात इस्लामचे भवितव्य कठिण दिसते त्या देशातून निघून जावे - हिजरत करावी  अशी इस्लामी धर्माज्ञा आहे. त्यानुसार आमिर खान ने भारत सोडुन जाण्याची भाषा केली आहे .

जमालुद्दिनचा जिहाद हरला ,  आझादांचा करार फसला आता देश सोडुन अन्यत्र जाणे (हिजरत) हि इस्लामी धर्माज्ञा आहे.  हिंदुत्व वादि पक्ष एकाहाती सत्तेत  आल्याने आमिरच्या पुर्वजांचे इस्लामिक भारताचे स्वप्न फसले आता हिजरत हा एक पर्याय तो सुचवू पाहतो आहे . खरे पाहता आमिरची भीती अनाठाई आहे . हिंदुत्व वाद्यांची  मर्यादा आत्गौरव आणि सनातनी पणा इतकीच आहे . वस्तुत: इस्लामचे पालन पोषण करण्यास (पुरो/प्रती) सर्वच हिंदु कटिबद्ध आहेत .

तरी  आमिरची हिजरत मागील  भूमिका समजून घेण्यासाठी त्यांचे  बडे  मामूजान मौलाना आझाद हिजरत विषयी काय म्हणतात ते पाहुया . ( साल १९२० खिलाफ़तच्या दरम्यान )

" शरियतच्या सर्व तरतुदी , सद्य:कालीन घटनाक्रम , मुस्लिमांचे हित आणि राजकीय साधकबाधकता या सर्वांचा विचार करून माझे समाधान झाले आहे कि , …. भारतीय मुसलमानांना भारतातून हिजरत (देशांतर ) केल्याशिवाय अन्य कोणताच पर्याय उरलेला नाही . … जे लगेच हिजरत करू शकत नाहीत त्यांनी हिजरत करणार्यांना (मुहाजीरीन ) मदत केली पाहिजे. " (६)

आमिर खान स्वत: अत्ता हिजरत करू शकत नाही हे उघड आहे ,  त्याचे आर्थिक हितसंबंध भारतात आहेत . कदाचित तो इतर इमान वंतांना तसे सुचवत असावा . खरे पाहता त्याची गरज नाही . सनातनी हिंदुत्व वादी आणि इस्लाम रक्षक हिंदु पुरोगाम्यांच्या भारत देशासारखी सुपीक जमीन इस्लामला कोठेच मिळणार नाही .

जमालुद्दिनचा जेहाद , आझादांचा करार आणि आमिर खान  ची हिजरत अशी एका माळेचे मणि ! बडे मामू  मौलाना आझाद खिलाफातीसाठी लढत इमान्वंत मुस्लिमाना हिजरत करण्याचे आवाहन करीत . त्यानुसार १९२० सालच्या आसपास १८००० इमानवंत हिजरत करून अफगाणिस्तान ला गेले होते . परंतु लगेच अफ़गाणिस्तानच्या आमिराने आपल्या सरहद्दी त्यांच्यासाठी बंद केल्या - मग हि हिजरत मोहीम थांबली. (५)

आज कोणि हिजरत करतो म्हणाला तरी हेच परिणाम दिसतील !

हज यात्रेला जाउन मुसलमान सैतानाला  दगड मारण्याचा एक विधी करत असतात . अर्थात हा विधी प्रतिकात्मक आहे . खर्या सैतानाला वाळूचे कण मारून काही उपयोग नाही --  धोंडे मारले पाहिजेत हे इमान वंतांना चांगलेच कळते . अशाच प्रकारे हि आमिरची प्रतीकात्मक हिजरत आहे . खरी खरी नाही !

तरीही इस्लामी जगतात हिजरत कि मोहिदा यावर  चर्चा सुरु झाली आहे . आजच ओवेसीने हिजरत करणार नाही म्हणून सांगितले . हि चर्चा सुरु करण्याचे श्रेय आमिर खान कडे जाते .


पवित्र हज यात्रेत सैतानाला दगड मारताना श्री आमिर खान 



मुसलमान जर ‘खरे’ मुसलमान बनले तर संघर्षच उरणार नाही.अशी आमिर खान ची भूमिका दिसते.   हे ‘खरे’ अमुक बनावे काय? हा प्रश्न एकदा ‘ओशों’ना विचारला गेला. ते म्हणाले “अरे भाई अगर कच्चा हिंदू और कच्चा मुसलमान इतना खतरनाक है, तो जरा सोचो! सच्चा हिंदू और सच्चा मुसलमान कितना खतरनाक होगा!!”
-------------------------------------------------------------------

ताजा कलम : संगीतकार ए आर रहमान यांनीही असहिष्णुते बद्दल भूमिका घेतली आहे .
ए आर रेहमान  यांच्या  या भूमिकेचे स्वागत . 

रहमान यांनी आमिर प्रमाणे इस्लाम धर्म रक्षण केलेले नाही तर …. रजा अकेडमि च्या धर्मांध फ़तव्यावर भाष्य केलेले आहे . संगित गैरीस्लामिक आहे . प्रेशितावरील एका चित्रपटाला रहमान ने संगित दिल्यामुळे रजा एकेडमी ने ए आर रहमान विरुद्ध फतवा काढला होता .

"आता ए आर रहमान धर्म भ्रष्ट झाला….  मुस्लिम होण्यासाठी त्याने पुन्हा कलमा पढला पाहिजे . काफिर झाल्याने लग्न रद्द ! आता शरीयत नुसार रहमान ने पुन्हा लग्नाचे विधी केले पाहिजेत असे रजा अकेडमि चे म्हणणे आहे .(८, ९ )
भिवंडितिल पोलिस हवालदार हुतात्मा जगताप आणि गांगुर्डे च्या खुनात दोषी आणि आझाद मैदानावर दंगल घडवणारी हीच ती रजा एकेडमी . ए आर रहमान ने रजा अकेडमि चा निषेध केला .

या इस्लामी फतव्या बरर्हकुम 'दिल्ली 'आणि 'युपीच्या' * कथित सेक्युलर  * मुख्यमंत्र्यांनि  रहमानचा कार्यक्रम  टाळणयाचा प्रयत्न केला  त्यांचाही उल्लेख  रहमान ने केला आहे . . यानंतर या तापल्या तव्यावर पोळी भाजत - इस्लाम मध्ये संगितसेवा जमत नसेल तर हिंदू व्हा ! असे घर वापसीचे बाष्कळ आवाहन करणार्या विश्व हिंदु परिषदेवरही ए आर रहमान टिका केली आहे .

वरील  सर्व गोष्टीना रहमान असहिष्णुता असे म्हणतो . 

धार्मिक बाबतीत टिका टिप्पणी करताना - त्या विषयाची जाण असावी आणि खरी सेक्युलर भूमिका घ्यावी हि बुद्धी ए आर रेहमान कडे आहे .पुरोगाम्याला तेव्हढि अक्कल नाही हा मुद्दा आहे . (८, ९ )

डॉ अभिराम दीक्षित 

------------------------
संदर्भ :

१) आमिरचे मावस आजोबा म्हणजे मौलाना अबुल कलाम आझाद आणि आझादांचे जिहादी पूर्वज म्हणजे मौलवी जमालुद्दीन: अमीर खान त्याच्या मामे आजोबांवर म्हणजे मौलाना आझादांवर चित्रपट बनवणार आहे , अशा बातम्या आधी येउन गेल्या आहेत .
  

२) आकलन : नरहर कुरुंदकर : मौलाना आझाद एक पुण्यस्मरण / अकबर 

३) लेखसंग्रह:  अप्रिय पण भाग २ . शेषराव मोरे  , २००८

४ ) पृष्ठ ११० , इस्लामिक स्टेट : असगर आली इंजिनिअर , विकास पब्लिकेशन,  १९९४ 

५) पृष्ठ १५६ आणि पृष्ठ १८४ , अखंड भारत का नाकारला , प्रा मोरे , राजहंस प्रकाशन , २०१२ 

६)   Page 219 , Gandhi : Pan Islamism , Imperialism and Nationalism in India , OUP , 1989

७)  जागर : नरहर कुरुंदकर , दवत उल कुरआन : मौलाना मौदुदि 

८) http://indianexpress.com/article/entertainment/entertainment-others/fatwa-against-a-r-rahman-majid-majidi-for-film-on-prophet/

९) http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/a-r-rahman-identifies-with-aamir-khan-says-he-too-faced-similar-situation/articleshow/49917936.cms


२१ नोव्हें, २०१५

प्रा शेषराव मोरेंच्या चष्म्यातून संघ



राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स्वदेशी चळवळ, गोळवलकर गुरुजी आणि चातुर्वण  या बाबतीत प्रा मोरे कोणते विचार सतत मांडत असतात ? सांस्कृतिक राष्ट्र्वादाबद्दल आणि धर्माच्या राजकारणाबद्दल शेषराव मोरेंचि मते काय आहेत ? हे जाणुन घेणे आज आवश्यक आहे . त्यांच्या संमेलनातिल भाषणाचा राजकीय मुद्दा बनवताना, आणि मोरेंना संघाचा (पेड) हस्तक ठरवताना, निर्वाचन आयोग सदस्य पुरोगाम्यांनी कशा चलाख्या  केल्या आहेत ते हि त्यातून स्पष्ट होईल .   प्रा मोरेंचे पुढील संघ विषयक विचार मला स्वत:ला  पटलेले आहेत.  ते वाचकांनीही समजून घ्यावेत आणि त्यावर निकोप मनाने विचार करावा. अट अशी कि लेख संपुर्ण आणि शेवटपर्यंत वाचला पाहिजे .






हिंदु - मुस्लिम प्रश्न आणि त्या अनुषंगाने येणारे सेक्युलारीझम , धर्म स्वातंत्र्य , संस्कृती या बाबतीत संघाचे  अनेक विचार मोरेंना मान्य नाहीत. त्यावर त्यांनी वेळोवेळी लिहिले आहे . पण तरीही मोरे हे प्रतिगामी /  संघाचे हस्तक वगैरे का ठरवले जातात याचेही उत्तर (पुरोगामी लॉजिक) या लेखात उलगडले आहे . त्यासाठी इस्लाम चिकित्सा आणि हिंदु संघट्न यावरील प्रा  मोरेंचि मते पहावी लागतील .  प्रा मोरे यांनि नेमके काय लिहिले आहे ? ते त्यांच्याच शब्दात पाहू : -

प्रा स ह देशपांडे हे संघातुन बाहेर पडलेले मोरेंचे समविचारी अभ्यासक , शेषराव लिहितात  "स. ह. चा बुद्धी प्रामाण्यवाद  ( विज्ञान निष्ठा ) व अभ्यासा अंति जे पटेल ते स्पष्टपणे व प्रकटपणे मांडण्याचि वृत्ती यांमुळे ते संघात टिकले नाहीत " (१:३). प्रा मोरे व संघ यांचा संबंध कसा आला याचे सविस्तर वर्णन त्यांनी केलेले आहे . मोरे लिहितात : 

" सावरकरांचे लिखाण आम्ही वाचले ते लिंगायत समाजातील उप्पे गुरुजिंच्या प्रेरणेने . त्यांचा कोणत्याहि हिंदुत्व वादि  संघटनेशि संबंध नव्हता . किंबहुना आम्हाला स्वत:ला वयाच्या १९ व्या वर्षा पर्यंत संघ हे नावही माहित नव्हते.… (पुढे औरंगाबाद्ला)  संघातील अभ्यासू मंडळिंशी चर्चा करताना त्यांच्याशी बुद्धिवाद , धार्मिक विचार व हिंदुत्व या विषयांवर वाद होत असत… सावरकरी विचारामुळे  आंम्ही अधार्मिक , नास्तिक व पाखंडी बनलो होतो हे  त्याना (संघाच्या मंडळिंना) आवडत नसे... याच महाविद्यालयीन काळात नवाकाळ मध्ये गोळवलकर गुरुजींची चातुर्वणाचे समर्थन करणारी मुलाखत दोन अंकात प्रसिद्ध झाली. … (पुढे ) मुलाखतीतील वादग्रस्त मुद्द्यांचा खुलासा प्रसिद्ध झाला, परंतु त्यामुळे आमचे समाधान झाले नाही. "(१: ६-८)


स्वदेशी कि चातुर्वण  ? 


प्रा शेषराव मोरे यांच्या स्वदेशी विषयावरील लेखनात त्यांचा हा  विचार अधिक स्पष्टपणे आलेला आहे . अप्रिय पण (२) या पुस्तकात हे लिखाण समाविष्ट आहे . या पुस्तकाचे प्रकाशन आम्हीच केलेले आहे . प्रा मोरे संघाची भूमिका निश्कोषित करतात  : -
" 'स्वदेशी' याचा संघप्रणित अर्थ ' राष्ट्रकारणात हिंदु सांस्कृतिक विचाराचा , हिंदु जीवन मूल्यांचा , हिंदु जीवन पद्धतीचा स्वीकार असा आहे. स्वदेशी वस्तुंचा वापर हा अर्थकारणाचा… भागही हिंदु जीवन मुल्यांवर आधारित आहे. … हिंदु दृष्टीकोना प्रमाणे आर्थिक स्पर्धा हि हानिकारक व त्याज्य गोष्ट आहे . हिदुप्रणित अर्थकारण हे अध्यात्मावर आधारलेले आहे. या विचारांची मांडणी गोळवलकर गुरुजिंनिच आपल्या विचारधन मध्ये करून ठेवलेली आहे, व त्यांचे अनुयायी तीच भूमिका मांडत असतात.…  गोळ्वलकरांचे  म्हणणे असे कि , आर्थिक स्पर्धा नको , भौतिक सुखासाठी अखंड धावपळ हि पाश्च्यात्य जीवनशैली आहे .… सुखप्राप्तीच्या स्पर्धेतून रोगट वासना चेतावली जाते. " (२: ५९) 





संघाची मांडणी सांगुन झाल्यावर त्यावर टिका करताना प्रा मोरे लिहितात कि , " आर्थिक स्पर्धेला संघ परिवाराचा असलेला तीव्र विरोध चातुर्वण्य व्यवस्थेतून आला आहे . गुणसिद्ध चातुर्वणाला ते (संघ ) यासाठी आदर्श मानतात कि , या व्यवस्थेत व्यावसायिक वा आर्थिक स्पर्धा नाही . प्रत्येक वर्णाने वा व्यावसायिक जातीने इतरांशी स्पर्धा न करता , हक्कांपेक्षा कर्तव्य आणि भौतिक सुखापेक्षा आध्यात्मिक  सुख मोठे मानून आपला व्यवसाय करत राहणे हे वर्ण व्यवस्थेचे तत्वच संघाच्या स्वदेशीच्या मुळाशी आहे "    अशा स्पर्धा विरोधी विचारांमुळे हिंदु समाजाचा घात झाला आहे  असा मोरेंचा आक्षेप आहे . या संघविचाराचे खंडन  पुढिल लेखात करताना  शेषराव लिहितात : 

" स्पर्धेसाठी आवश्यक गुण अंगि बाणवावेत अशी आमची इच्छाच नसते … . भरपूर पैसा…  नको असतो असे नाही : पण त्यासाठी पाश्चात्यांप्रमाणे शास्त्रशुद्ध परिश्रम करण्याची तयारी नसते . भ्रष्टाचार करून , अधिकाराचा गैरवापर करून , गुन्हेगारी मार्गही वापरून शोर्ट्कटचि पद्धत वापरून , नशिबाला कौल लावून खूप पैसे मिळवण्याचा हिंदु प्रयत्न करतील . पण त्यासाठी कठोर परिश्रमाचा (स्पर्धेचा ) मार्ग ते वापरणार नाहीत . …. प्रत्येक क्षेत्रात हीच स्थिती आहे . आणि याचे मुळ कारण आमच्यात परिश्रम करण्याची , कार्यक्षमता जोपासण्याची , जगाबरोबर स्पर्धा करण्याची … प्रवृत्तीच नाही . स्पर्धा म्हणून तिला तुच्छ लेखणे ही आमची संस्कृती आहे . आम्ही स्पर्धा करत नाही याचाच आम्हाला गौरव वाटतो ! " (२:६६)






सेक्युलारीझम  चा घटनेतील अर्थ काय ?


शेषराव मोरेंनि मांडलेला घट्नेतला खरा सेक्युलारीझम  पुरोगामी गट मान्य करत नाही हि खंत त्याना  आहे पण संघाने चालविलेला सेक्युलारीझम विरोधी प्रचारही मोरेंना मान्य नाही . ते लिहितात -  

" आजची भारतीय घटना सेक्युलर आहे हि  गोष्ट (सर्व भारतियांच्या ) आणि हिंदुच्याहि  दृष्टीने अतिशय मोलाची आहे . परंतु  ….  संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख मागो वैद्य म्हणतात कि " सेक्युलारीझम या शब्दामुळे वाद होतात…  हा बाहेरचा शब्द घटनेत घुसवण्यात आला…   अशा प्राकारचे विचार संघ नेत्यांनी मांडलेले आढळून येतील. …. घटनेतील सेक्युलारीझम च्या अर्था बद्दल …. आम्ही दाखवून दिले आहे कि सेक्युलारीझम हा शब्द घटनेत अगदी आरंभापासून आहे  आणि तोही धर्मस्वातंत्र्याच्या कलम २५ मध्ये आहे … घटनेने फक्त पारलौकिक बाबतीतले स्वातंत्र्य पाळण्याचा अधिकार दिलेला आहे …. ज्यास हिंदु किंवा मुसलमान जीवन पध्दती किंवा जीवन मुल्ये मानतात असा धर्म पाळण्याचे अधिकार घटनेने दिलेले नाहीत "(१: १९-२०)
त्यापुढे जाउन मोरे असेही म्हणतात कि , "सेक्युलारीझम हे घटनेने दिलेले मुल्य आहे ; घटना सार्वभौम आहे . हे लक्षात घेऊन राष्ट्र हि संकल्पना त्याच्याशी जुळवून घेतली पाहिजे . सेक्युलारीझम च्या विरोधी असणार्या गोष्टी राष्ट्र या संकल्पनेत आणता येणार नाहीत . " ( १: २४)

प्रा मोरेंनि अजून काय बोलायला हवे ? विचारकलह (२)  या पुस्तकात  प्रा मोरेंनि माझी धर्म विषयक भूमिका असे एक स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे . त्यात मोरे काय लिहितात हे पाहू आणि मग लेखाच्या समारोपाकडे जाऊ
".धर्माविषयी भूमिका मांडायचे म्ह्टले कि  धर्म चिकित्सा आलीच . … जगातील कोणताही धर्म असे  स्वातंत्र्य अनुयायांना देत नाही . अशी धर्म चिकित्सा करणार्याला काही धर्म आपल्या धर्मातून बाहेर काढून टाकतील; काही धर्म तर त्याला मृत्युदंड फर्मावतील….  तेव्हा माझी धर्मविषयक भूमिका याचा अर्थ माझी धर्म चिकित्सा … त्याचा धर्म प्रणित अर्थ धर्मपाखंड किंवा धर्मद्रोह असाच  असतो . तेव्हा या दृष्टीने माझी धर्मविषयक भूमिका याचा अर्थ बहिष्कृत होण्याची भूमिका असाही होऊ शकतो . धर्म चिकित्सा म्हणजे धर्माविरुद्धची लढाइच असते. माझी धर्म विषयक भूमिका सांगणे म्हणजे एक प्रकारे हि लढाइचि भूमिका मांडणे  होय ! " (३:८९)

प्रस्तुत लेखात शेषराव मोरे  लौकिक धर्म आणि ज्या अर्थाने संघपरिवारात कर्तव्य / जीवन पद्धती या अर्थाने धर्म हा शब्द वापरला जातो  त्यातले भेद स्पष्ट करून सांगतात . आणि या सर्वच अर्थाने धर्म कालबाह्य झाले असा निष्कर्ष काढतात . लेखाचा समारोप करताना मोरे लिहितात " देव , आत्मा मोक्ष मुक्ती या अर्थाने मनाच्या समाधानासाठी मृत्यू पश्चात धर्माचे स्वातंत्र्य ज्याला हवे त्याला द्यावे मात्र - इहलोकात जिवंत असताना किती आणि कसा धर्म पाळायचा याचा निर्णय  राज्य घटनेच्या  आधीन राहून   बुद्धिवादाने घेण्यात यावा . राज्य ज्यावर हरकत घेणार नाही तितकाच धर्म पाळता येईल .  ( ३:९७ )

प्रा मोरेंच्या सर्वच वैचारिक लिखाणात असे हजारोनी संदर्भ सापडतील . यात प्रतिगामी काय आहे ? संघाचे काय आहे ?  मोरे संघाचे विचार सांगतात असा पुरोगाम्यांचा आक्षेप आहे . जर पुरोगाम्यांचे खरे मानले तर संघाचे विचारच पुरोगाम्यांहुन अधिक पुरोगामी आहेत असे म्हणावे लागेल !





विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मोरे सरांची एक मुलाखत आम्ही नांदेड येथे घेतली होती.  त्यात शेषराव मोरे म्हणाले  " जातिव्यवस्था उध्वस्त करून हिंदु समाजाने एक  व्हावे असा विचार आम्हाला पटतो . हा विचार बाबासाहेबांच्या धर्मांतर घोषणेनंतर सुद्धा त्यांनी पुरस्काराला आहे . अनायलेशन  ऑफ कास्ट मध्ये  १९३६ साली आंबेडकर तो शब्द वापरतात . हिंदु संघटन  शब्दाचा राग करण्याचे कारण नाही . पण हे संघटन कोणते ? आणि कशासाठी ? ते महत्वाचे . धर्माच्या आधारावर हिंदु संघटित होऊ शकत नाहीत . हिंदु लोकांचे हजारो धर्म आहेत . हिंदुच्या व्यासपीठावरून धर्म हा शब्द उच्चारता सुद्धा कामा नये . प्रा. मोरे पुढे म्हणाले :
"ज्या वेळी हिंदु लोक  धर्म मुक्त होतील , आधुनिक  बुद्धिवादी विज्ञान निष्ठ होतील त्यावेळी हिंदुचे  हित होईल आणि जातीव्यवस्था संपुन हिंदुचे संघटन सुद्धा होईल. "

प्रा मोरे लिहितात : हि अमेरिका -  हे अध्यात्म आणि ती मनुस्मृती :  

" अमेरिकेत  अनैकता , हिंसाचार वाढलेला आहे .  … म्हणुन अमेरिकन लोक आत्मिक समाधानासाठी भारतीय अध्यात्माकाडे वळू लागले आहेत असे सांगण्यात येते . आमचे मत असे कि , अमेरिकेतील अडचणी खर्या आहेत , पण त्यावरील इलाज अध्यात्म नाही . मनुष्याचे मन सामाजिक दृष्टया सुसंस्कृत बनविण्या संबधिचे बुद्धिनिष्ठ शिक्षण व संस्कार हा त्यावरील उपाय आहे .…  मद्यपान , जुगार व्यसनाधीनता, विवाहपूर्व आणि विवाहबाह्य स्त्री पुरुष संबंध , स्त्री लंपटता इत्यादी दुर्गुणांचा इतिहास महाभारत कालापासून अध्यात्मिक भारतातही आढळतो. माणसे अध्यात्मिक असतात म्हणजे ती सामाजिक द्रुश्ट्या सुसंस्क्रुत होतात हा समज निव्वळ खोटा आहे . 'आमचे सारे अध्यात्मिक तत्वज्ञ एका हातात वेदान्त आणि दुसर्या हातात मनुस्मृती घेऊन वागत आलेले आहेत . ' हा डॉ  आंबेडकरांचा आरोप ज्यांना समजलेला आहे  त्यांना हा विषय अधिक खुलाशाने समजून सांगण्याची आवश्यकता नाही ; आणि ज्यांना तो समजलेला नाही त्यांना तो सांगुन फारसा उपयोग नाही !  अध्यात्म वैयक्तिक त्याचा परिणामही वैयक्तिक . या चिंतनाचा भौतिक परिणाम शून्य आहे . अध्यात्माने स्वत:च्या मनाचा शोध घ्यावा याला विज्ञान अजिबात  विरोध करणार नाही . पण त्या आत्मिक शोधाच्या निष्कर्षां आधारे सामाजिक आचार आणि नितीमुल्ये मुळीच ठरवू नयेत " (३ : ९८) 

हा काय संघाचा विचार आहे ? सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे ?

शेषराव मोरेंचे कोणतेच पुस्तक कोणताही लेख संघाच्या एकाही विचाराचे समर्थन करत नाही . मोरेंचे एकुण १३ ग्रंथ प्रकाशित आहेत.  त्यातले प्रत्येक पुस्तक संघाच्या एकातरी मुलभुत विचाराच्या आणि प्रचाराच्या निव्वळ  विरुद्ध आहे . मोरें चे  ग्रंथ आणि निष्कर्ष पाहू :


प्रा मोरेंचे ते १३ ग्रंथ : पुरोगामी कोण ? प्रतिगामी कोण ? 



१) काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला  ? हे पुस्तक फाळणी योग्य होती असे म्हणते  . गांधिंजी आणि  पं  नेहरुंनी मनापासून फाळणी करून हिंदुंवर उपकार केले असे म्हणते . बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्टिशन ऑफ इंडियाच्या बाजूने आणि संघपरिवाराच्या अखंड भारताच्या विरुद्ध असे हे पुस्तक आहे . 

२) काश्मीर एक शापित नंदनवन : काश्मीर प्रश्न व  त्यातील पं  नेहरू , जिन्हा , हरिसिंह आणि शेख अब्दुल्ला यांच्या भूमिकांचे विस्तृत दर्शन या पुस्तकात आहे .  काश्मीर कोणालाच भारतात नको होते पण हरिसींह आणि अब्दुल्लांच्या आडमुठ्या धोरणाने हा प्रश्न भिजत घोंगडे राहिला आणि भारताच्या गळ्यात पडला हे सत्य मोरे दाखवून देतात . सार्वमत घेऊन तेथील मुस्लिम प्रजेच्या मतानुसार निर्णय काय झाला असता ? काश्मीर पाकिस्तान कडे जायला हवे होते - हा मोरेंचा निष्कर्ष संघाशी कोठे जुळतो ?

३) १८५७ चा जिहाद : संघ आणि सावरकर या दोघांच्याहि विरुद्ध निष्कर्ष काढणारे हे पुस्तक आहे . त्यावरील सविस्तर लेख येथे वाचावा

४) शासन पुरस्कृत मनुवादी : हि पुस्तिका  पाडुरंग शास्त्री आठवले यांच्यावर लिहिलेलि  आहे . मागील युती सरकारच्या काळात पांडूरंग शास्त्रिंना सेना भाजपा सरकारने पुरस्कार दिल्यावर हा ग्रंथ त्यांनी विरोध म्हणून  लिहिला . तो पुण्याच्या सुगावा प्रकाशनाने प्रसिद्ध केला .  त्यात मोरेंनि शास्त्रिजिंचे जुनाट , बुरसटलेले , मनुवादी विचार दाखवून देत पुरस्कार देण्यास विरोध केला आहे . 

५-८ ) अप्रिय पण आणि विचारकलह : हे प्रत्येकी दोन भागातले लेखसंग्रह आहेत आणि त्यात विविध विषयांना स्पर्श केलेला आहे . सर्वाचा उल्लेख करणे या लेखाच्या मर्यादेत बसणारे नाही. पण त्यातील एक लेख सुभाष चंद्र बोस यांवर आहे . आणि सुभाष बाबू कसे गांधीभक्त , इस्लाम प्रेमी आणि हिंदुत्व वाद्यांच्या विरुद्ध होते याच्या पुराव्यांची जंत्री तेथे आहे . (३:१०६) . त्यावरील विस्तृत लेख येथे वाचता येईल. 






९ - १० ) सावरकरांचा बुद्धिवाद आणि सावरकरांचे  समाजकारण : नास्तिक , बुद्धिवादी , विज्ञान निष्ठ आणि सेक्युलर सावरकरांचे दर्शन या दोन  पुस्तकातून होते . सर्व धर्म ग्रंथ आज कालबाह्य झालेले आहेत असे गर्जून सांगणारे सावरकर इथे दिसतात . हा विचार संघाशी कोणत्या अर्थाने जुळतो ? (अधिक वाचनासाठी इथे क्लिक करा )

त्याचप्रमाणे इथे हे हि समजू न घेणे आवश्यक आहे कि मोरे रूढ अर्थाने सावरकरवादी किंवा भक्त नाहीत . अखंड हिंदुस्थान , १८५७ चे स्वातंत्र्य समर असे सावरकरांचे अनेक महत्वाचे विचार खोडून काढण्यासाठी मोरेंनि स्वतंत्र ग्रंथच लिहिले आहेत . तात्यांची  इतिहासदृष्टी , सावरकरांनी डॉ  आंबेडकरांच्या बौद्ध धर्मांतरावर केलेली टिका  असे इतरही बरेच सावरकर विचार  मोरेंना मान्य नसल्याचे त्यांच्या साहित्यात दिसते . मोरेंचा गोडसे विरोध तीव्र आहे . गोडसेवादि लोक सावरकरांना बदनाम करत आहेत असा त्यांचा आरोप आहे . 


११ ) डॉ  आंबेडकरांचे सामाजिक धोरण : एक अभ्यास : -  या पुस्तकात प्रा मोरे अशी मांडणी करतात कि , बाबासाहेब आंबेडकर हे एक अभ्यासू आणि विद्वान राजकारणी  होते .  राजकारण - समाजकारण - धर्म कारण याबद्दल ते सतत अभ्यास करत आणि नव्या अभ्यासानुसार - मते बदलत असत  . उदाहरण द्यायचे  झाले तर भगवत गीता या हिंदु धर्म ग्रंथाबद्दल लिहिता येईल . 

जोपर्यंत हिंदु राहून समता आणता येईल असे त्यांना वाटत होते तोपर्यंत बाबासाहेब  गीतेला पुज्य मानत होते. हा हिंदु समाजावरचा विश्वास उडाल्यावर ते गीतेला मुर्ख ग्रंथ म्हणु लागले . पुढे घटना   परिषदेत  दाखल   झाल्यावर ....जेंव्हा त्यांना हिंदु कोड  बिल  पास करून हिंदु स्त्रियांचे भले करायचे होते तेंव्हा........ ते बिल पास करायला त्यांना सवर्ण हिंदुंचा पाठिंबा हवा होता....... आणि त्यावेळी दो आंबेडकरांनी  गीतेत काही चांगल्या गोष्टी आहेत पण ........त्या बुद्धाकडुन उधार घेतलेल्या आहेत असे मत व्यक्त केले .

समता आणणे आणि लोकशाही रुजवणे  हे बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होते . त्यासाठी त्यांनी धर्म मिमांसा आणि इतिहास मीमांसा लिहिली , त्यात वेळोवेळी बदल केले , कारण त्यांना इतिहास केवळ लिहायचा नव्हता तर घडवायचाहि होता . अशाप्रकारे डॉ आंबेडकरांच्या कालानुरूप बदलत जाणार्या भूमिकांचा वेध प्रा मोरेंनि घेतला आहे .   आंबेडकरांचे १९३५ सालच्या आधीचे सिलेक्टिव्ह विचार सांगुन संघाचे समरसता वादि लोक डॉ आंबेडकरांचे अपहरण करत आहेत असे प्रा शेषराव मोरे यांचे मत या ग्रंथात  व्यक्त होते.  



  • डॉ  आंबेडकरांच्या विचाराची त्या काळानुरुप  मांडणी करून त्यांचे वैचारिक अपहरण कोणि करू नये यासाठी लागणारी भूमिका प्रा मोरेंनि  या पुस्तकात तयार करून ठेवली आहे . 

प्रा शेषराव मोरेंचि १३ पुस्तके प्रसिद्ध आहेत . त्यातले ११ ग्रंथ आपण वर पाहिले . यातला कोणता ग्रंथ संघवादि आहे ? प्रतिगामी आहे ? तरीही प्रा मोरेंना  पुरोगामी कंपु संघाचे हस्तक का म्हणतो  ? याचे उत्तर प्रा मोरेंच्या शेवटच्या दोन पुस्तकात आहे.  ती पुस्तके आहेत …. 

१२ - १३ ) मुस्लीम मनाचा शोध आणि चार आदर्श खलिफा : इस्लाम धर्माची तटस्थ चिकित्सा आणि मांडणी या दोन  ग्रंथात  आढळते . कुराण हदीस आणि जगमान्य  इस्लामी पंडितांचे पुरावे देऊन मोरेंनि प्रस्तुत पुस्तके लिहिली आहेत . मुस्लिम मनाचा शोध  या ग्रंथाला जमाते इस्लामीच्या पंडितांनि प्रस्तावना लिहून मोरेंचे कौतुक केलेले आहे . इस्लामी पंडित म्हणतात कि या कामाबद्दल अल्लाह मोरेंवर स्वर्गातून पुष्पवृष्टी करेल .  त्यामुळे या चिकित्सेत थोडाही द्वेष नाही हे वेगळे सांगायची गरज नाही . मोरेंचि या ग्रंथातील मांडणी पुढील प्रमाणे : - 

" इस्लाम हा केवळ धर्म नसून ती एक जीवन पद्धती (दिन )आहे . सर्व सामजिक आर्थिक आणि ऐहिक कायद्याचे नियमन इस्लाम ने करावे अशी इस्लामी धर्मशास्त्राची भूमिका आहे . इतर सर्व धर्म अपुर्ण आहेत . इस्लाम परिपुर्ण आहे . मूर्तीपूजा पाप आहे .  आणि  एकमेव देव अल्लाहचा एकमेव परिपुर्ण धर्म इस्लाम , इस्लामी कायदे शरिया , इस्लामी जीवनपद्धती याचा स्वीकार सार्या जगाने केला पाहिजे . या साठी सतत प्रयत्न - पराकाष्ठा म्हणजेच जिहाद करत राहणे हे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य म्हणून इस्लामी धर्मशास्त्राने सांगितले आहे . सर्वप्रथम हा जिहाद स्वत:च्या मनातील गैर इस्लामि प्रवृत्तीविरुद्ध करायचा आहे , मग लेखणी आणि वाणीने इतर धर्मियांना इस्लामचे महत्व सांगायचे आहे . तरीही काफ़िरां नि ऐकले नाही तर जिहाद बा सैफ - तलवारीचा जिहाद करावा अशी इस्लामी धर्माज्ञा आहे. दार उल हरब (शतृभूमी ) ला दार उल इस्लाम बनवण्यासाठी वेळोवेळी तडजोडी करत अल्लाच्या अंतिम उद्दिष्टासाठी वेगवेगळ्या कालोचित मार्गाने जिहाद करत  राहिले पाहिजे  "

हे इस्लामचे  स्वरूप जमाते इस्लामिला आणि त्यांच्या पंडितांना मान्य आहे .  मुस्लिम समुदायाचे धार्मिक नेतृत्व करणार्याना जे मान्य आहे ते हिंदु पुरोगाम्यांना मात्र मान्य नाही . 









प्रा मोरे आणि संघाची भूमिका : साम्य आणि भेद : 


यापुढे जाउन हे हि सांगितले पाहिजे कि  संघ कधीही धर्म चिकित्सा करत नाही. हिंदु किंवा इस्लाम याची कोणतीच चिकित्सा न करता त्यांचे राजकारण चालते . याबद्दल मोरेंनि संघाला दोष दिला आहे . आणि संघाने सर्व धर्म सामादार मंच , सर्व पंथ समभाव इत्यादी धार्मिक घोळ न घालता आधुनिक बुद्धिवादी दृष्टीकोन  स्वीकारावा असे आवाहन केलेलं आहे . हिंदुंच्या हितासाठी बोलणे मोरेंना गैर वाटत नाही . हिंदुचे हित आधुनिक बुद्धिवादी होण्यात आहे आणि ते संघ करत नाही हा मोरेंचा आक्षेप आहे . हिंंदु मुस्लिम समस्येबाबत पुरोगामी गट चुकीची भूमिका घेतो .  या  बाबतीत हिंदुच्या बाजूनेही काही मुद्दे आहेत असे मोरेंना वाटते आणि त्या बाबतीत मोरेंचे संघाशी मतैक्य असणे स्वाभाविक आहे . पण लोकशाही आणि घटना यांच्या चौकटीतच हिंदूची बाजू मांडली गेली  पाहिजे असा मोरेंचा आग्रह आहे . 

संघाला असे बुद्धिवादी होण्याचे आवाहन कोणत्या पुरोगाम्याने केले आहे ? सतत कोन्पिरसी थेअर्या चाललेल्या .  संवाद आणि चर्चा यावर पुरोगाम्यांचा विश्वास आहे काय ? असेल तर यातून संघ का वगळावा ? संघात माणसे नसतात ? संघाच्या व्यासपीठावर गेले कि माणुस बाटतो असे बरेच  पुरोगामी मानतात . याची भरपूर उदाहरणे देता येता येतील. असे बाटल्याचे  आरोप  नरेंद्र जाधवांपासुन गंगाधर पानतवणे पर्यंत लेखक विचारवंतावर झाले आहेत .  मग तेथे जाउन त्यांनी कोणते विचार मांडले ? याचेही पुरोगाम्यांना  देणे घेणे नसते .  हि पुरोगाम्यांची वैचारिक अस्पृश्यता होय . शिवाय हिदू  , हिंदू हित , इस्लाम चिकित्सा हे शब्द वापरणे हाच पुरोगाम्यांच्या दृष्टीने अपराध आहे . अन्यथा मोरेंना प्रतिगामी म्हणण्याचे काय प्रयोजन ? 




संघी सनातनी  आणि ढोंगी पुरोगामी : एकाच नाण्याची एकच बाजू 


संघ आणि पुरोगामी यांच्या विचारात मूल्यात्मक अर्थाने काहीही फरक नाही . परंपरेचे प्रेम , महापुरुष , उलट सुलट  अर्थाने धर्म ग्रंथाचे प्रामाण्य,  पुराण पोथ्यातले  स्वत:चे जातीय पूर्वज याचा अभिमान , आणि इस्लामची चिकित्सा न करणे या बाबतीत संघ आणि पुरोगामी यांचे एकमत आहे . सन्मानिय अपवाद फक्त नियम सिद्ध करण्याइतकेच ! 

हिंदू संस्कृती मध्ये इतरांहून काहीतरी भारी आहे असे संघाला विनाकारण  वाटते . चातुर्वण आणि वेदातली विमाने स्वत:ला विनाकारण भारी समजण्याच्या अंधश्रद्धेतून येतात . त्या आत्मगौरव आणि छद्म विज्ञानाचा अवश्य विरोध केला पाहिजे . पण पुरोगाम्यांनाहि त्यांची हजारो वर्षे जुनी परंपरा आहे आणि ती भारी आहे या अंधश्रद्धेतून बाहेर काढले  पाहिजे . मानव केंद्रि विचार , उदारमत वाद आणि पुरोगामित्वाचा जन्मच मुळी  फ्रेंच राज्यक्रांति नंतरचा आहे . पुरोगाम्यांना हे मान्य नाही आणि म्हणून मुल्यात्मक  अर्थाने ते संघाचेच प्रतिगामी इतिहासवादी  विचार वेगळ्या भाषेत मांडत असतात .  

एक मनुस्मृती झोडायचि आणि बाकी सार्या पुराणाचा काथ्याकूट करत स्वत:चे भलतेच पूर्वज सांगत विजयाचा धार्मिक वांशिक  इतिहास लिहायचा हा पुरोगामी कावा आहे . बुद्धिवाद नाही .


संस्कृती आणि नैतिकतेचे मापदंड सतत बदलत असतात - याला बुद्धिवाद असे म्हणतात . परंतु … पुरोगाम्यांची स्वत:ची अशी काही हजारो वर्ष जुनी धार्मिक वांशिक परंपरा आहे . पुरोगामी परंपरा हा मजेशीर शब्द त्यातूनच जन्माला आहे . शिवाय   इस्लामची चिकित्सा न करता. इस्लाम  हा एक पुरोगामी समतेचा सेक्युलर धर्म आहे असा जावई शोध पुरोगाम्यांनी लावला आहे . त्यासाठी डॉ आंबेड्करांच्या इस्लाम चिकित्सेकडे साफ डोळेझाक केली आहे.  डॉ आंबेडकरांचि  इस्लाम चिकित्सा वाचण्यासाठी येथे क्लिक करावे. 

हिंदुना धर्म मुक्त करणे हे हिंदुचे हित आहे  असे म्हणणे  आणि इस्लामची चिकित्सा  करणे या दोन्ही गोष्टी पुरोगामी गट अपराध समजतो . . अतिशय दर्जेदार अपराध करणार्यांना पुरोगामी भाषेत संघाचा हस्तक असे म्हटले जाते . त्यामुळे मोरे हे आपोआपच संघाचे हस्तक ठरतात .

यात वास्तविकता अशी आहे कि  सध्या पुरोगामी म्ह्णवणार्यांचि  विचारधारा  रिजिड  आहे .  ती कम्युनिस्ट साचेबंद विचाराला बांधलेली आहे . गेल्या साठ वर्षात यांनी स्वत:त कोणतेही बदल केलेले नाहीत .  त्यामानाने संघाने अधिक बदल केलेले आहेत . . विचार बदलता  येतात . आपल्या गटापेक्षा  वेगळे पुरोगामी विचार असू शकतात .  हे पचवणे सुद्धा पुरोगाम्यांना शक्य नसल्याने ते संघाला कावेबाज आणि मोरेंना हस्तक म्हणून मोकळे होतात .

खरे तर मराठी पुरोगामी हाच एक मोठा विनोद आहे . शरद पवारांच्या राजकारणाला जशी जातीय आणि धार्मिक समीकरणे लागतात ती जुळवणार्यांना महाराष्ट्रात पुरोगामी म्हणतात . शेषराव मोरेंचे विचार या पठडीत बसत नाहीत हाच त्यांचा अपराध आहे .




- डॉ अभिराम दीक्षित


------------------------------------------------------------------------------------
संदर्भ : (१:२० ) हा संदर्भ पहिल्या संदर्भ ग्रंथातील विसावे पान असा वाचावा .

१)  हिंदुत्व : संघ आणि सावरकर या ब ल वष्ट लिखित पुस्तकाला प्रा मोरे यांनी लिहिलेली प्रस्तावना .  कोण्टिनेण्टल प्रकाशन २०१३

२) लेखसंग्रह:  अप्रिय पण भाग २ . प्रकाशक : अभिनव निर्माण प्रतिष्ठान , २००८

३) लेखसंग्रह : विचारकलह : भाग २ .  प्रकाशक : अभिनव निर्माण प्रतिष्ठान , २००८
   .  






२० नोव्हें, २०१५

पुरोगाम्याचे इस्लाम प्रेम

पुरोगाम्याचे इस्लाम प्रेम : भाग २ : साने गुरुजी

उच्चशिक्षित विद्वान  आणि  पुरोगामी अभ्यासकांनी इस्लामबद्दल वेळोवेळी घेतलेल्या भूमिका इथे पहायच्या आहेत .

 शरद बेडेकर
शरद बेडेकर हे एक नास्तिक आणि अभ्यासू व्यक्तिमत्व . लोकसत्तेत त्यांनी मानवाविजय नावाची  मालिका लिहिली . त्यात सर्व धर्माची योग्य ती चिकित्सा करणयात आली . मात्र मूळ  इस्लाम मध्ये जिहाद आणि हिंसेचे स्थान काय ? यावर बेडेकरांनी भाष्यच केले नाही. काही फुटकळ दहशत वाद्यांना आणि हल्लिच्या मुल्ला मौलाविना दोष दिला पण कुराणात हिंसा आहे काय ? यावर लिहिलेच  नाहि . इथे एक लक्षात ठेवले पाहिजे कि गीतेत प्रत्यक्ष चातुर्वर्ण आहे अशी योग्य भूमिका त्यांनी याच लेखमालेत घेतालेलेली आहे . त्याबद्दल टिका केलेली आहे . असे करताना कृष्णाचे कौतुक करणायाच्या भानगडीत बेडेकर पडत नाहीत हे अतिशय स्वागतार्ह आहे . इस्लाम बद्दल लिहिताना त्यांनी कुराण इतर धर्माप्रती सहिष्णू आहे काय ? मुहम्मदाचि काफिर विषयक मते काय होती ? याची चर्चा केलेली नाही . मात्र मुल्ला मौलवी आणि सद्य कालीन राज्यकर्ते यान दोष देताना . मूळ इस्लामची प्रचंड स्तुती केली आहे . आणि मुहम्मदाला सर्व आधुनिकतेचे पितामह  ठरवले आहे . खरोखर बेडेकरांचे मुहम्मद प्रेम  मौलवी झाकीर नाइक लाहि  लाजवेल . बेडेकर काय लिहितात ते त्यांच्याच शब्दात पाहू :

"महंमदाने अरब टोळ्यांमधील भ्रामक व अनीतिमान चाली नष्ट करून, टोळीगणिक बहुदेवता मानण्याऐवजी, त्यांना एकेश्वरवाद शिकवून त्यांच्यात एक सामाजिक, सांस्कृतिक उत्थान निर्माण केले. त्यामुळे त्यांच्यात ज्ञानार्जनाची आस्था निर्माण होऊन तिथे एक सांस्कृतिक अभिसरण घडून आले. एका अशिक्षित माणसाने ‘विद्याभिरुची वाढविली’ हे म्हणणे काहीसे चमत्कारिक वाटत असले तरी ते पूर्णत: खरे आहे. अरेबियातील वाङ्मयीन प्रगती काव्य आणि इतर साहित्य प्रकारांचा उदय कुराणाबरोबर किंवा त्यानंतर मागोमाग झालेला असून, या चळवळींतून अनेक उत्कृष्ट ग्रंथांची उत्पत्ती झाली हे मत आता विद्वतमान्य आहे. अरबी भाषा ही ग्रीक, हिब्रू किंवा संस्कृत भाषांसारखी प्राचीन भाषा नसून, तीत कुराणपूर्व काळात धड व्याकरणही नव्हते व काही ग्रंथही नव्हते. महंमदानंतर त्या भाषेची सर्वागाने वाढ झाली. इ.स.च्या आठव्या शतकात हारून-अल्-रशीद व इतरांनी परदेशातून विद्वान लोक आणून त्यांच्याकडून ग्रीक, संस्कृत इत्यादी भाषांतील ग्रंथांची अरबी भाषांतरे करवून घेतली. अंकगणित, खगोलशास्त्र, संगीत, रसायन, वैद्यक, तर्कशास्त्र, अलंकारशास्त्र इत्यादी विषयांचे ज्ञान अरबांनी भारतीय पंडितांकडून मिळविले व ते युरोपियन लोकांना दिले. ख्रिस्तपूर्व ग्रीक संस्कृतीतील प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल यांच्याही ग्रंथांची त्यांनी भाषांतरे करून घेतली. अरबांनी करून घेतलेल्या ग्रीकादी विद्वानांच्या ग्रंथांमुळे व अरबांशी आलेल्या संबंधांमुळेच, पुढील काही शतकांनंतर युरोपात झालेले विद्येचे पुनरुज्जीवन (रिनेसन्स) घडू शकले, ही गोष्ट आता सर्वमान्य झालेली आहे. अशा प्रकारे पश्चिम आशिया व दक्षिण युरोप या खंडप्राय भूभागाला एक नवी दृष्टी देण्यास महंमद हा अशिक्षित, पण सदाचरणी माणूस मूळ कारण ठरला हे आज सर्वमान्य ऐतिहासिक सत्य आहे."

See more at: http://www.loksatta.com/sampadkiya-news/arabistan-and-islam-religion-1108650/#sthash.xYmhoyjh.dpuf


साने गुरुजी 

शामची आई वाचले नसेल असा मराठी वाचक विरळ. खरा तो एकची धर्म - जगाला प्रेम अर्पावे इतक्या  सरळ सोप्या  साध्या भाषेत वैश्विक तत्वज्ञान सांगणारा हा  संतपुरुष.…  गुरुजींची लेखणी इस्लामचे वर्णन करताना कशी प्रेमळ बनत जाते हे आपण त्यांच्याच शब्दात पाहुया . 'इस्लामी संस्कृती 'या नावाने साने गुरुजींनी दोन खंड लिहिलेले आहेत . त्यातला पहिला खंड तीन आवृत्तीत प्रकाशित झाला आहे . दुसरा खंड मात्र बाजारात मिळत नाही . तो साधना प्रकाशन कडे असावा .

साने गुरुजींचे इस्लाम प्रेम आणि मुहम्मद स्तुती इतक्या उच्च दर्जाची आहे . कि गुरुजिंच्या या पुस्तकाचे प्रकाशन आणि प्रसार जमाते इस्लामी सुद्धा करते . (लिंक खाली पहिल्या कोमेंटित )

"इस्लामचे बाळ जिथे पाळण्यात घातले गेले ' .  त्या अरब भूमीतील अरबांचे  गुरुजींना प्रचंड प्रेम  वाटे . अरबांच्या स्वभावाचे वर्णन करताना गुरुजी लिहितात ' लूटमार हा त्यांचा मुख्य धंदाच असे. त्यांची वाळवंटि जमीन त्यांना अन्न देत नसे. खजूर हीच त्यांची भाकरी . म्हणून घासदाणा लुटणे प्राप्त . निसर्गाने हि भामटेगिरी त्यांना शिकवली ' भामटेगिरिला नैसर्गिक म्हणून झाल्यावर त्यातही अरब कशी व्यावसायिक माणुसकी दाखवत याचे वर्णन करताना गुरुजी लिहितात :

--------------------------
"अरब लुटालुट करी परंतु या लुटालुटितहि त्याने मर्यादा धर्म ठेवला होता. तो *शक्यतो* हिंसा टाळी. मी या व्यापार्याचे ओझे कमी करतो आहे असे तो म्हणे ! आणि ज्यांना लुटायचे असेल तेथे स्त्री असेल तर … अरब लुटारू त्या  स्त्री वर हात टाकत नसे. तो म्हणेल - तुमचे नेसूचे लुगडे किंमतीचे आहे . ते मला हवे आहे . तुम्ही दुसरे नेसा . तोवर मी दूर जातो …आणि मग अरब दूर जाउन पाठ करून उभा राहील . "  
--------------------------

स्त्री ने नकार दिला तर अरब काय करील ? हे गुरुजींनी सांगितलेले नाही . पण वरील परिच्छेदातून  गुरुजींची इतिहासदृष्टी दिसून येते.  इतर  धर्मियांच्या कत्तली आणि मुर्त्या फोडून टाकण्याचे प्रसंग प्रेषित मुहंमदाच्या आयुष्यात येतात . त्याचे गुरुजींनी शैलीदार वर्णन केले आहे . बनी कुरेझा नावाची ज्यू जमात प्रेशितांशि एकनिष्ठ राहत नव्हती (इस्लाम कबुल करत नव्हती- दगा देत होती  ) . त्यांची प्रेषित कत्तल करतात . डॉ  रफिक झकेरिया यांच्या मुहम्मद एण्ड  कुराण या ग्रंथानुसार कत्तल केलेल्या ज्युंचि संख्या ९०० आहे . या प्रसंगाचे वर्णन करताना साने गुरुजी लिहितात : - तिसरी जमात बनी कुरेझा हि देखील प्रेशितांशि एकनिष्ठ राहिली नाही . त्यांच्यावरही प्रेशितांनि कारवाई केली . मात्र त्यांना (इतर ज्युं प्रमाणे ) हद्दपारीची शिक्षा न देता , त्यातील सर्व प्रौढांना ठार मारण्याची व स्त्रिया व मुले यांना गुलाम करण्याची शिक्षा दिली गेली … पुढे  गुरुजी या हत्या आणि गुलामीचे समर्थन करताना लिहितात - त्यां वेळेस मुहम्मद आणि त्याचे अनुयायी यांच्यासमोर जगण्या मरण्याचा प्रश्न होता. (अशी कारवाई न केल्यास ) बाल्यावस्थेतील अरब राष्ट्र जगते ना ! मुस्लिम धर्म टिकता ना ! पुढे पसरता ना !…. ६२७ सालचे ९०० ज्युंचे  हत्यांकाड मागे सारून । मुहम्मद प्रेषित यांच्या ६३० सालच्या मक्का विजयानंतर :  साने गुरुजी यांनी केलेले प्रेशीत  मुहम्मद  कृत मुर्तिभंजनाचे वर्णन तर विलक्षण आहे

--------------------------
" मक्का वाल्यांना त्रास दीला गेला नाही. (इथे वरील कत्तल लक्षात घेतलेली नाही )…  परंतु  मक्केतल्या मूर्तीना मात्र त्रास झाला . जुने मूर्तिपूजक आपल्या मुर्तिंचा भंग शांतपणे पाहत होते . त्या सर्व मूर्ती प्रेषित मुहम्मदानी  स्वत:च्या हाताने फोडून टाकल्या ! प्रत्येक मूर्तीसमोर मुहम्मद उभे राहत व म्हणत , 'सत्य आले आहे , असत्य नष्ट होत आहे . असे म्हणत त्या मूर्ती फोडत . अशा रीतीने सर्व मूर्ती भंगुन , सारे जुने कर्मकांड रद्द करून , जमलेल्या सर्वांना उद्देशून त्यांनी भाषण केले . कुराणातील मानवाच्या ऐक्याचे मंत्र म्ह्टले   "
--------------------------

साने गुरुजींची हि  मानवाच्या कुराणिय ऐक्याची कल्पना किती सुंदर  आहे ! जमाते इस्लामिला हि कल्पना विशेष आवडली असावी . जमाते इस्लामीने इतर धर्मियांना मुस्लिम बनवण्यासाठी प्रेषित  मुहम्मद सर्वांसाठी असे एक अभियान चालवले आहे . साने गुरुजींची इस्लामी संस्कृती हे पुस्तक केवळ समाजवादी साधना प्रकाशित करते असे नाही . इस्लाम प्रचारार्थ जमाते इस्लामीही साने गुरुजिंच्या या पुस्तकाचा प्रचार  करते . (लिंक खाली पहिल्या कोमेंटित ).

https://drive.google.com/file/d/0B0J3OP30FPKkOTM4OTQ2MDUtZmUwMy00NTgyLTk2NTAtY2NiNmQzYmI0MGU5/view


लिंक खाली पहिल्या कोमेंटित

सावरकर जेंव्हा पुरोगामी होते तेंवा तेही असेच बोलत असत . पुढचा भाग १९०८ सालच्या पुरोगामी साव्र्करांवर लिहितो . हे १९०८ सालचे क्रांतिकारी सावरकर स्माज्वाद्यांनाहि का मान्य असतात - ते लक्षात येइलच !

१३ नोव्हें, २०१५

गांधी जिन्हा टिपू सुलतान

गांधी जिन्हा टिपू सुलतान
मुहम्मद अली जिन्हांवरिल एका दर्जेदार चित्रपटाची लिंक खाली पहिल्या कोमेंट मध्ये देतो आहे . बेन किंग्सले च्या गांधी चित्रपटाशी स्पर्धा करायला या चित्रपटाची निर्मिती केली गेली . यात जिन्हांचे संपुर्ण जीवन दर्शन तर आहेच शिवाय जिन्हांना भविष्यकाळात बोलावून नथुराम ते बाबरी पतन ची चर्चा देखील आहे .
उदारमतवादी , लोकशाहीवादी आणि चक्क धर्म निरपेक्ष असे सेक्युलर जिन्हा या चित्रपटात दाखवले आहेत .
गांधीजिं चे वर्णन सत्याग्रह , अहिंसा , संस्क्रुत शब्द राजकारणात आणुन राजकारणाचे हिंदुकरण करणारे हिंदु धार्मिक नेते असा येतो !
तर पं जवाहरलाल नेहरूंचे लेडी माउंट्बेटन प्रकरण जणु काय फाळणीचे राजकारण ठरवत होते असा अतिशय बालिश आरोप केला आहे.
राष्टीय आणि आंतर राष्ट्रीय राजकारण समजावे इतकी या पाकि सिनेमाकडून अपेक्षा नाही . तथा तांत्रिक बाजू मात्र अतिशय भारी आहे .
नथुराम भक्तांचे आणि जिन्हा भक्तांचे गांधी नेहरुंबद्दल कसे एकमत असते याचा प्रत्यय इथे दिसेल ! सिनेमाच्या शेवटी यकदम पल्टि मारून बेरिस्टर जिन्हा पाकिस्तानची काल्पनिक केस काल्पनिक (स्वर्ग ? ) कोर्टात लढवतात असा जबरदस्त दि एण्ड आहे . शेवटची रोमांचक केस समजण्यासाठी अक्खा सिनेमा पहावा लागेल .
जिन्हांचि वकिली , इस्लामच्या नव्हे तर धर्म निरपेक्षतेच्या ढाच्यात करणारा हा तांत्रिक द्रुश्ट्या अतिशय दर्जेदार सिनेमा आहे . इतिहासाची दुसरी बाजू समजून घेण्यासाठी हा चित्रपट अवश्य पहावा . (लिंक खाली पहिल्या कोमेंट मध्ये )
आणि विचार करावा कि टिपुचे सेक्युलर रूप मार्क्स वाद्यांनी किती खुबीने रंगवले असेल !
पाकिस्तानच्या होम मेड अण्वस्त्र वाहक क्षेपणास्त्राचे नाव टिपू होते . इतर क्षेपणास्त्रांचि नावे घोरी , गजनवी अशी आहेत . (संदर्भ दुसर्या कोमेंटीत )
लवकरच येत आहे …. टिपू : मिसाइल आणि मुलतत्ववाद

७ नोव्हें, २०१५

सेक्युलारिझम : राज्य घटनेतला अर्थ काय ?

सेक्युलारीझम हा भारतातील राजकारणात सर्वाधिक चर्चिला गेलेला विषय आहे . राज्यघटनेवरिल चर्चेत हा विषय वारंवार येतो . वस्तुत:  सेक्युलारीझम हा कायद्याचा विषय आहे . संविधानातल्या २५ व्या कलमाच्या अर्थाने  … भारतीय राज्यघट्नेत कोणत्या अर्थाने सेक्युलारीझम आलेला आहे ? ते आपण समजून घेतले पाहिजे. हिंदु / मुस्लिम  धार्मिक लोकांनी सेक्युलारीझम चे अत्यंत चुकीचे अर्थ काढले आहेत . 

(आपल्या घटनेतले मुळ सेक्युलारिझम चे कलम लेखाच्या  शेवटी दिले आहे )


काय आहे सेक्युलारिजम ? त्याचा राज्य घटनेतला अर्थ काय ?


सेक्युलारिजम आणी सर्वधर्म समभाव हा विषय प्रत्येकाने चघळला. आणी प्रचंड घोळ घातला. सभ्य स्त्री - पुरुष हो - आपल्या राज्यघटनेत सर्वधर्मसमभाव नाही. धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य ही घटनेत नाही. घटनेत सेक्यूलारिझम आहे.

सर्वधर्मसमभाव आणी सेक्युलारिझम या एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी आहेत.

सर्वधर्म समभाव. सर्व धर्म सारखेच आहेत. त्यांची शिकवण एकच आहे. सर्व देव नमस्कारः केशवं प्रति गच्छती - ही हिंदुधर्माची शिकवण आहे. संविधानातला कायदा न्हवे ! उलट धर्मपालनाचे कोणतेच हक्क संविधान देत नाही. मी फक्त संविधानातला सेक्युलारीझम मानतो.धर्मातला नाही. .




----------------------------------------------------------
ज्याना स्वत:ला भारताचे नागरिक म्ह्णवायचे त्याना संविधानाचे सार्वभौमत्व मानणे अनिवार्य आहे.
----------------------------------------------------------

तुम्ही सगळे प्रेमात पडायच्या वयाचे आहात. कारण प्रेमात पडायचं वय कधीही संपत नाही आणी कुणाच्यातरी प्रेमात पण असणार. जो - जी नसेल त्यान कार्यक्रम संपल्यावर मला येऊन भेटावं. शनिवारवाड्यावर जाहिर सत्कार करण्यात यील. असो ..








समजा तुम्ही ट्रेन नी कुठेतरी प्रवास करत आहात. समोर एक अप्सरा बसली आहे. यौवन बिजली.. पाहून थिजली.. इंद्रसभा भवताली. अप्सरा दिसली. तुम्ही मनातल्या मनात तिच्यावर प्रेम करत आहात. असे प्रेम करण्याचे स्वातंत्र्य ती अप्सरा तुम्हाला अवश्य दील.

पण मनातल्या मनात. मांडे खा. पण मनातल्या मनात.
मांडे खा. पण मनातल्या मनात.

तिला ट्रेनमधे डोळा मारला ; की काय खायच ? सँडल !


भारताच्या राज्यघटनेत सेक्युलारिझम आहे. म्हणजे इहवाद आहे. कुठल्याही धर्मावर तुम्ही श्रद्धा ठेवू शकता. प्रेम करू शकता पण कसं ? मनातल्या मनात ! तुम्ही म्हणाल आमच्या धर्मात अस्प्रुश्यता आहे. आम्ही ती पाळणार... मग काय खायचं ? सँडल.

तुम्ही म्हणाल सतिप्रथा हा आमचा धार्मिक अधिकार आहे . मनातल्या मनात म्हणायचं - तुमच्या घरातसुद्धा असला धर्म पाळू लागलात तर तुरुंगात रवानगी होइल.

तुम्ही म्हणाल आमच्या कुराणात लिहिलिय . मूर्त्या फोडा. काफरांविरुद्ध जिहाद करा. म्हणा की. पण. मनातल्या मनात म्हणायच. खरोखर कुणी जिहाद करू लागला- तर काय खायच ? ....सँडल.

धर्माच्या चिकित्सेत संविधान शिरत नाही. पण २५ व्या कलमात बजावून सांगतं - धर्म पाळायचा पण मनातल्या मनात. इहलोकात कसं जगायच ? ते कायदा ठरवेल. लग्नाच वय किती असावं ? कायदा ठरवेल धर्म नाही.

सर्व धर्म चांगले आहेत ते जवळ घ्या म्हणजे सर्वधर्म समभाव. शासकीय निर्णयातून धर्म वगळा. धर्म दूर ठेवा म्हणजे सेक्यूलारिझम. म्हणजे च इहवाद. हा सेक्युलारिझम आपल्या संविधानाचा पाया आहे.



----------------------------------------------------------
मी फक्त संविधानातला सेक्युलारीझम मानतो . ज्याना स्वत:ला भारताचे नागरिक म्ह्णवायचे त्याना संविधान मानणे अनिवार्य आहे.
----------------------------------------------------------







हिंदुत्व वाद्यांचा खोटा प्रचार 


या देशात जी धर्मनिरपेक्षता आहे ती मुस्लिमाच्या फायद्यासाठी / पक्षपातासाठी आहे असा प्रचार अनेक हिंदुत्व वादि करतात . हा प्रचार असत्य आहे .  . या देशात एकही मुस्लिम नसता तरी हा देश धर्म निरपेक्षच राहिला असता . सेक्युलरीझम म्हणजे शासन आधुनिक राहील . शासकीय निर्णय न्याय , नीती , आचरण इत्यादी आधुनीक चष्म्यातून घेतले जातील .

----------------------------------------------------------

दही हंडीचे किती थर रचावेत ? किती लग्ने करावीत ? बुरखा घालावा का ? अस्पृश्यता पाळावी का ? तोंडी तलाक असावा का ? या बाबतीत कायदे करण्याचा कोणताच हक्क धर्माला नाही . सर्व हक्क शासनाकडे आहेत . 

धर्म आणि पंथ या दोन शब्दा बद्दल संघाने पुरेसा गोंधळ घातला आहे . त्यांना वाटते पंथ म्हणजे उपासना पद्धती आणि धर्म म्हणजे कर्तव्य ! म्हणून ते पंथ निरपेक्षता हवी म्हणतात …. हा संघ परिवाराचा भ्रम आहे किंवा सरळ खोटा प्रचार . धर्म / कर्तव्य हे सुद्धा राज्यघटनेच्या आधीन राहून पार पाडायचे आहेत हे समजून घ्या .  अगदी माता पिता पुत्र पत्नी या बाबतीतली कर्तव्ये सुद्धा कायदा ठरवतो - धर्म नाही .


  •  वृद्धाश्रम पुराणात नाहीत - तरी  ते बेकायदेशीर ठरवता येत नाहीत 
  • धर्मातला वानप्रस्थाश्रम कायद्याने सक्तीचा  करता येत नाही 
सेक्युलारीझम हा शब्द घटनेत पहिल्या दिवसापासून आहे . धर्म निरपेक्षता स्पष्ट करणाऱ्या घटनेच्या २५ व्या कलमात तो आहे . पुढे हा शब्द घटनेच्या प्रास्ताविकात सुद्धा घातला गेला . पण त्यामुळे त्याच्या अर्थात काहीच फरक पडत नाही . 


पुरोगाम्यांचे ढोंग 


घटनेतील मूलभूत  तत्वे धुडकावून लावत राजीव गांधिंनि मुस्लिम लांगुलचालन केले . शहाबानो केस मध्ये धर्मनिरपेक्षता ठोकरून मुस्लिम धर्मांधते समोर लोटांगण घातले आणि इस्लामी कायद्यानुसार एका मुस्लिम महिलेवर अन्याय केला . याची परतफेड म्हणून पुढे राजीवानेच बाबरी मशिदीचे कुलूप उघडुन एका नव्या वादाला तोंड फोडले . पुढचा इतिहास सर्वांना माहित आहे . 






देशाच्या सेक्युलारीझामचे वाटोळे कोन्ग्रेस ने केले . शहाबानो आणि बाबरीचा फटका कमी पडला असावा. दादरी वरून मुस्लिम व्होट बेंक पोलिटिक्स सुरूच आहे. 

समान नागरी कायद्याचे लोणचे घालणार्या कोङ्ग्रेसचि नोकरी पत्करून सध्या पुरोगाम्यांनि दादरिवर पुरस्कार वापसी सुरु केली आहे . हे सरळ मुस्लिम वोट बेंकचे राजकारण - आधी समान नागरी कायदा आणि सेक्युलारीझम वर मत मांडावे - आणि मग फुरस्कार वापसी करावी. 


दुट्टपी पुरोगाम्यांनी   हिंदुना सेक्युलारीझम आणि मुस्लिमांना सर्व धर्म समभाव लागू केला आहे . यात खरे तर नुकसान मुस्लिमांचे आहे . मुस्लिम यामुळे मध्ययुगातच राहत आहेत .  पण थोडा तोटा हिदुचा सुद्धा आहे . तो असा कि फ़ुरोगाम्यानच्या भंकस मुळे आपल्यात सुद्धा सध्या साक्षि साध्वी ला महत्व मिळु लागले आहे

----------------------------------------------------------


सेक्युलारीझम  चा हेतू काय ? 


देशातला सेक्युलारीझम हा सर्व धर्माच्या सुधारणेसाठी आहे । आणि ज्या धर्माचा समाज या सुधारणेच्या सुवर्ण संधीचा फायदा घेणार नाही … तो चिखलातच मागास आणि दरिद्री राहणार आहे … पण हे कोणि बोलायचे ?

धर्म ग्रंथ जुने झाले ते आता कपाटात ठेवा ग्रंथालयाच्या - आज कसे जगावे हे विज्ञान ठरवेल - धर्म नव्हे - हा सेक्युलारीझाम आहे …

----------------------------------------------------------

थोडक्यात : धर्म पाळायचा नाही, रस्त्यावर तर धर्म आणायचाच नाही , धर्म दारात पाळायचा नाही , धर्म घरात पाळायचा नाही - फार तर मनात पाळायचा ! धर्म घरात हि पाळायचा नाही . तुम्ही तुमच्या घरात तुमच्या पत्नीशी कसा व्यवहार करावा ? हे कायदा ठरवणार . संविधान ठरवणार आहे - तुमचा धर्म नाही . संविधान धर्म मानत नाही - तुम्हीही तुमचा धर्म घरातसुद्धा पाळायचा नाही - फार तर मनात पाळायचा
----------------------------------------------------------



घटनेतले २५ वे कलम लेखाच्या शेवटी  देतो आहे. हे सेक्युलारीझम चे कलम आहे. यानुसार public order, morality and health याच्या आधीन राहून धर्म पाळता येतो . धर्मातली एखादी गोष्ट जर अनैतिक , अनारोग्यकारक वा असामाजिक वाटली तर शासन त्याविरुद्ध कायदा करु शकते . economic, financial, political या सर्व बाबतीत शासनाचा निर्णय अंतिम आहे . धर्माचा नाहि.


----------------------------------------------------------


हमीद दलवाई काय म्हणतात ? 


खरे पुरोगामी आणि मुस्लिम समाजसुधारक हमीद दलवाई म्हणतात , 
  " हिंदू आणि मुसलमान अशा जातीय तत्त्वावर या देशाची एकदा रक्तरंजित फाळणी झाली. एक देश इस्लामी पाक पाकिस्तान झाला.  तेंव्हा  दुसरा देश हा हिंदुचा हिदुस्थान झाला पाहिजे असा एक मतप्रवाह आहे. मग हिंदूचे धर्मराज्य वगैरे आपोआप संकल्पना येतात , दुसरी संकल्पना मुस्लिमांची ! कि हा देश धर्म निरपेक्ष आहे .इथे धर्म स्वातंत्र्य आहे … तवा हवा तेव्हढा आणि वाटेल तसा इस्लाम आम्ही पाळणार ! इस्लाम पाळणे हा आमचा घटना दत्त अधिकार आहे . दोन्ही संकल्पना साफ चूक आहेत ."





मुस्लिमांच्या पक्षपातासाथि  देश सेक्युलर नाही . या देशात १०० % हिंदू असते तरीही हा देश सेक्युलरच राहीला पाहिजे  .   


या देशात जी धर्मनिरपेक्षता आहे ती मुस्लिमांसाठी नाही . या देशात एकही मुस्लिम नसता तरी हा देश धर्म निरपेक्षच राहिला असता . सेक्युलरीझम म्हणजे शासन आधुनिक राहील . शासकीय निर्णय न्याय , नीती , आचरण इत्यादी आधुनीक  चष्म्यातून घेतले जातील . आदत आणि इबादत या दोन वेगळ्या गोष्टी आहेत . कुणाची पूजा करावी आणि पारमार्थिक बाबिना इबादत म्हणतात . या इबादत चे स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षतेत जरूर आहे.  आदत म्हणजे इहलोक .आणी  इथले नियम . किती लग्ने करावीत ? बुरखा घालावा का ? अस्पृश्यता पाळावी का ? तोंडी तलाक असावा का ? या बाबतीत कायदे करण्याचा कोणताच हक्क धर्माला नाही . सर्व हक्क शासनाकडे आहेत .  या देशात फक्त हिंदूच राहिले असते तरीही हा देश सेक्युलरच राहिला असता.मनुस्मृती नाही , कुराण नाही कोणताच   फायनल ! असा ग्रंथ नाही . आम्ही नव्या ज्ञानाचे मानवतेचे आणि बहुविधतेचे चाहते ……हि आमची  चाहत . आणि शेवटची इच्छा !  माणसाच भल माणसांनी करायचं असत … माझे मुस्लिम समाजावर प्रेम आहे आणि या समाजाचे भले व्हावे त्यात बुद्धिवादी , उदारमतवादी आणि मानवतावादी प्रवाहांची निर्मिती व्हावी म्हणून मी परंपरांशी  युद्ध लढणार आहे . आयकल का ?  हे माझे धर्मयुद्ध आहे आणि एक मुसलमान म्हणून मी ते लढणार आहे. आमेन... सुम्मा आमेन !  

( संदर्भ : पृष्ठ १४३ ,  हमीद दलवाई - क्रांतिकारी विचारवंत : संपादक : शमसुद्दिन तांबोळी : २००९ :  डायमंड पब्लिकेशन्स) 

प्रा शेषराव मोरे काय म्हणतात ? 


प्रा मोरे लिहितात "सेक्युलारीझम हे घटनेने दिलेले मुल्य आहे ; घटना सार्वभौम आहे . हे लक्षात घेऊन राष्ट्र हि संकल्पना त्याच्याशी जुळवून घेतली पाहिजे . सेक्युलारीझम च्या विरोधी असणार्या गोष्टी राष्ट्र या संकल्पनेत आणता येणार नाहीत .

राज्यशास्त्राच्या विद्यार्थी अभ्यासकांनी प्रा. मोरेंचे पुढील भाषण अवश्य ऐकावे. विषय गंभिर असला तरी ,  हे एक विनोदी आणि खुसखुशीत भाषण आहे. 

सेक्युलारीझम चा खरा अर्थ : प्रा शेषराव मोरे (भाषण १ तास यु ट्युब )





-------------------------------------------------------------------
घटनेतले २५ वे कलम

Article 25 in The Constitution Of India 1949
25. Freedom of conscience and free profession, practice and propagation of religion
(1) Subject to public order, morality and health and to the other provisions of this Part, all persons are equally entitled to freedom of conscience and the right freely to profess, practise and propagate religion
(2) Nothing in this article shall affect the operation of any existing law or prevent the State from making any law
(a) regulating or restricting any economic, financial, political or other secular activity which may be associated with religious practice;
(b) providing for social welfare and reform or the throwing open of Hindu religious institutions of a public character to all classes and sections of Hindus Explanation I The wearing and carrying of kirpans shall be deemed to be included in the profession of the Sikh religion Explanation II In sub clause (b) of clause reference to Hindus shall be construed as including a reference to persons professing the Sikh, Jaina or Buddhist religion, and the reference to Hindu religious institutions shall be construed accordingly

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *