२ ऑक्टो, २०१५

गांधिजिंचा 'आज' शी संदर्भ - (पुस्तका पलिकडले गांधीजी )


--------------------------------------------------------------------------------------------------
गांधी नावाचा एकच माणुस - हिंदु , मुस्लिम, दलित , सवर्ण , ब्राम्हण , बहुजन , ख्रिस्ती , कम्युनिस्ट  - या सर्वांच्या विरुद्ध एकाच वेळी कसा काय असू शकतो ? आपले काही आकलन चुकते आहे काय ?
---------------------------------------------------------------------------------------------------

भारतात कॉंग्रेस वगळता जितक्या राजकीय पार्ट्या संघटना प्रोपोगांडे आहेत - तितक्या सर्व  आज गांधिंच्या कट्टर विरोधी आहेत. कॉंग्रेसला त्यांचे नाव निवडणुकीतही नको आहे .संघावर गांधिहत्येचा आरोप करण्या पलिकडे कॉंंग्रेस मुखातून गांधी हे नाव बाहेर पडलेले क्वचितच दिसते.

आजच्या दलित संघटना गांधीना सवर्णाचा लबाड वकील मानतात . पुणे करारातील दलितांच्या तेजोभंगाचा   आणि बाबासाहेबांच्या राजकीय नुकसानी मागचा  सनातनी  मेंदु म्हणजे गांधी! अशी धारणा जवळ जवळ सर्वच आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची आहे .

 हिंदुत्व वाद्यासाठी गांधी हा सरळ देशद्रोही आणि हिंदुना बुळचट बनवून मुस्लिमांच्या खाटिक खाण्यात ढकलणारा देशद्रोही बकरीवाला आहे . नथूरामचे सरळ वा लपून  पूजन हा हिंदु  धंदा तेजीत आहे . फ़ाळणिच्या गुन्हेगाराचा वध करणे हे अनेकांसाठी राष्ट्रभक्तीचे कार्य आहे !

प्रस्थापित पुरोगामित्वाच्या कोणत्याहि व्याखेत गांधी बसणार नाहीत . त्यांचे रघुपति राघव राजाराम - रामराज्य संकल्पना, उसंतवाणि भजने , धार्मिक उपास , शाकाहाराचा आग्रह , वेद उपनिषीद  पुराणे याविषयी ममत्व  , गाय बकरी छाप  राजकीय धार्मिकता  यामुळे हिंदु मुस्लिम एकतेत बाधा आली - आणि म्हणून हिंदु मुस्लिम प्रश्न उभा राहिला असे खडे बोल अनेक कडव्या 'नास्तिक ' डाव्यांनी आम्हाला ऐकवले आहेत .

मुस्लिम राजकारणाने गांधीला कधीच आपले मानले नव्हते .पूर्वीही  गांधीजीं च्या कॉन्ग्रेसला  मुस्लिम समाजातून नगण्य पाठींबा होता . स्वातंत्र्या पूर्वी १९३७ च्या किंवा १९४५ च्या  सार्वत्रिक निवडणुकीत अखंड भारतातील मुस्लिम मतदारांनी गांधीच्या विरुद्ध मुस्लिम लीगला भरभरून मते दिली होती . मुस्लिम मतदार संघातुन गांधीच्या कॉन्ग्रेसला मानहानीकारक आणि संपुर्ण पराभव पत्करावा लागला होता . फ़ाळणिवर   याच निवडणुकीत शिक्कामोर्तब झाले  .  स्वतंत्र  आणि खंडित भारतात पाकिस्तान वेगळा झाला - मुस्लिम लोकसंख्येचि फाळणी झाली - आणि आता अजून अति अल्प संख्य झाल्यावर  हिंदुवर  कुरघोडी करण्यासाठी - नथुराम हाच पहिला दहशतवादी म्हणत ढोंगी सेक्युलर अवतार  धारण करणे वेगळे - आणि गांधीना आपला म्हणणे वेगळे . गांधीजी चे राजकारण मुस्लिम हिताचे होते असे म्हणणारे इस्लामी  विचारवंत आज भारतात नाहीत…  पाकिस्तानात हि नाहीत.


कम्युनिस्टाना गांधी आवडत नाही , समाजवाद्यांना त्यांची  स्तुती पचत नाही , बहुजनवाद्यांना तो आपला वाटत नाही मग आजच्या भारतीय विचारपरिघात गांधींचे स्थान काय ? गांधिजिंचा 'आज' शी संदर्भ  काय ?

संघाला आणि हिंदुत्व वाद्यांना झोडपायला नथुराम पुरेसा आहे . गांधिजिंना कोणि वाली आहे काय ? गांधिजिंचा 'आज' शी संदर्भ काय ?

गांधिबाबा चि जात  वाणी (ओबीसी )  . या जातीची संख्या नगण्य . सध्याचे प्रधानसेवक मोदि याच तेली ओबीसी समाजातले आहेत . ते गांधिंचे पुतळे   परदेशात निश्कोषित करत असतात .पण त्याना गांधिबद्दल प्रेम आहे असे त्यांचे वीरोधक बोलणार नाहीत -  समर्थकहि  म्हणणार नाहीत . संघाच्या प्रात:स्मरणीय नेत्यात गांधीचे नाव आधीपासून आहे . पुढे सावरकर आंबेडकर आदी नंतर  आले . पण मी गांधी नावाच्या माणसाला मनापासून मानतो असे म्हणणारा स्वयंसेवक मला आजवर भेटलेला नाही . गांधी हि राजकीय सोय असावी .

म्हणजे गांधीबाबाला जातीत समर्थक नाहीत , (कोणत्याच) धर्मात समर्थक नाहीत , विचारधारात समर्थक नाहीत. राजकीय पक्षात सुद्धा समर्थक नाहीत . राहुल प्रियांका कॉंग्रेसला कोणि गांधीवादी म्हणेल तर तो एक नामी दर्जेदार  विनोद ठरेल ! मग आता स्पष्ट प्रश्न असा कि , गांधिजिंचा 'आज' शी संदर्भ काय ?

अनिल अवचट , कुमार सप्तर्षी आदी आद्य  समाजवादी ग्यांग ला सध्या कोणि फारसे ओळखत नाही . हि तशी चांगलि सज्जन माणसे . अनिल अवचट तर मस्त लेखक ….   त्यांच्या तारुण्याच्या काळी त्यांचा बराच बोलबाला होता. गांधी खुनानंतर आमची घरे जळाली - आता तशी वेळ आमच्यावर (म्हणजे आमच्या  जातीवर  ) येऊ नये - आणि खरोखर प्रामाणिकपणे कुणावरही येऊ नये (हे हि त्यांचे सच्चे  मध्यम वर्गीय  मत ) - म्हणून आम्ही गांधीवादी ! असा सुर त्यांच्या लेखनातून अगदी स्पष्टपणे जाणवतो .

मराठी ब्राम्ह्णात एक न्यूनगंडि अनभ्यस्त आणी भावुक प्राणि निर्माण होऊन तो गांधिंचे समर्थन करत बसला . एकतर सनातन प्रभात वा तत्सम कडे जाउन जानवे घालून छाचु जंतर मंतर करावे वा….  आपण आपले सज्जन गांधीवादी बनून आयुष्य कुंथावे असा रिव्हर्स इंजिनिअरिंग चा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला . आणि दहा कोटि च्या महाराष्ट्रात कुमार सप्तर्षीच्या सात्याग्राही मासिकाला ४७३.७  वर्गणीदार मिळाले . यापेक्षा अबब हत्ती ! , ठक ठक, चंपक, किशोर,    कुमार !  या समकालीन बाल किशोर कुमार मासिकाची नोंदणि शंभर  पट आहे !  कुमार साहेबाला तर बाळासाहेब ठाकरें  सारखी तेजस्वी रोखठोक  विधाने करून प्रसिद्ध होता येते असा शोध लागला आहे  ! खिक्क !!

एकतर पेशवाई  थाटात सडेतोड फुसका माज…… किंवा विनोबा ताटात शब्द्बंबाळ  प्रिटेण्डिंग   थापा मारण्याचा उद्योग या समाजाला  फार प्रिय वाटतो !

गांधिजिंचि पुस्तके उघडुन पहा - त्यांचे एक पुस्तक हिंदुत्व याच नावाचे आहे . त्यात  पूर्वसंचित आणि पुर्वजन्मातले   कर्म आणि त्यानुसार चे चातुर्वर्ण यावर गांधिजिंचि विस्तृत मते आहेत . गांधिंचि मते या पुस्तकात प्रतिगामी सनातनी याच लेबल खाली येतात . महात्म्याचे दुसरे पुस्तक सत्याग्रह …. तिसरे पुस्तक अहिंसा विचार …. . हि सारी पुस्तके आज वाचवत नाहीत …त्यातून काही बोध पण होत नाही . गांधिजिंचे हिंद स्वराज हे पुस्तक तर अजून विचित्र आहे . गांधिंचा विज्ञानाला विरोध आहे . रेल्वे,  तार यंत्र,  टेलिफोन,  यंत्र युग या सार्याला विरोध आहे . औद्योगिकरण  सोडुन खेड्यांकडे - अन्वयार्थ --- पुरातन सरंजामी व्यवस्थेकडे चला अशी त्यांची स्पष्ट हाक आहे . गांधी अराजकवादी आहेत .

गांधिजिंच्या लैंगिक प्रयोगाविषयी त्यांचे टिका कार भरपूर बोलत असतात . पण त्याचे संदर्भ गांधिजिंच्याच पुस्तकातून दिलेले असतात - हे लक्षात ठेवले पाहिजे . जे काही आहे ते सत्याचे प्रयोग उघड आहेत ….

सत्याचे प्रयोग हे एक नामी पुस्तक आहे . ते स्वस्तात मिळते. जाडजूड बनावे म्हणुन प्रकाशकांनी  कदाचित त्याचा आकार कमी केला असावा ! ए ४ साइझ मध्ये छापले तर सत्याचे प्रयोग शंभर सवाशे  पानात संपतील  ! बालवाडी ठसठशीत मोठ्ठ्या अक्षरात ……पण कॉफी   टेबल बुक म्हणून आमच्या हॉल मध्ये एक गांधिंचे पुस्तक पाहिजेच ! नाही का ? आणि चाळीस रुपयात मिळाले म्हणुन काय झाले ? त्यावर गांधी , सत्य आणि प्रयोग हे तीन शब्द असले कि आमच्या दिवाणखान्यातल्या लायब्ररी ची शोभा वाढते - आणि आम्ही अगदी ग्लोबल ग्लोबल  होऊन जातो !

आणी  हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही …. परदेशी फिरून पहा - भारतातली तीनच माणसे परदेशातल्या जनसामान्याला माहित आहेत - ते तीन भारतीय आहेत - गांधी,  बुद्ध आणि शाहरुख खान …

गांधी,  बुद्ध आणि शाहरुख खान …

या तिन्ही नावाना परदेशी जन सामान्याच्या मनात काही अर्थ आहे . बुद्ध महाराष्ट्रात समतेचे प्रतिक असला तरी त्याची पाश्चात्य छबी अध्यात्मिक आहे . बुद्धाचा समता हा शब्द बौद्ध साहित्यात मन: शांति या अर्थाने आला आहे.  मानवी मनाचा धिंडोळा घेणारे तत्वज्ञ आणि मनोभाष्यकार  म्हणून जग बुद्धाना  ओळखते . शाहरुख खान अशाच भारतीय मानसिकतेचा बॉलीवूडचा प्रतिनिधी म्हणून ओळखला जातो … व्यावसायिक रित्या त्याने स्वत:च्या आत बघण्याचा अध्यात्मिक  विचार पोप्युलर केला आहे … यश हवे असेल तर व्यावसायिकता हवीच… आणि गांधीजी हा व्यावसायिक अध्यात्मिक आणि राष्ट्रीय अर्थाने भारताचा प्रतिनिधी मानला जातो ….


*****************************************
परदेशाच सोडुन द्या आणि स्वदेश पहा ---
*****************************************

गांधिविरोधकांना गांधिजिंचा द्वेष करणार्यांना लेखाच्या शेवटी एकच प्रश्न विचारतो - गांधी नावाचा माणुस जर जन्माला आलाच नसता तर ? तर तुमचे सर्व प्रश्न सुटले असते काय ?


गांधी होते तेव्हा भारत नावाचा देश नव्हता .

गांधी काळात …
 पाच धर्म - पन्नास पक्ष  - पाचशे संस्थाने - पाच हजार जाती …. याचे कडबोळे ब्रिटिश आमलाखाली होते …त्याला ब्रिटिश इंडिया म्हणत --- आपण सारे एकमेकाच्या जिवावर उठलेले  -  गांधिंच्या अहिंसक जादुखाली आपण एकमेकात संवाद केला - म्हणून देशाची चळवळ आणि देश उभा राहील …. या हजारो गटतट जातीना एकत्र लोकशाही मार्गाने जवळ आणायची कला - कोणाही जवळ नव्हती -  पुन्हा म्हणतो कोणाही राजकीय नेत्याजवळ / पक्षाजवळ / विचाराजवळ नव्हती ………

फालतू थापा मारू नका - आणि जे गांधिंशि संवाद साधू शकले नाहीत - ते वेगळे झाले - यापुढेही वेगळेच होत राहतील ……. वाय झेड गिरी करत राहतील ….  आपापले नशीब - घ्या आणि  भोगा !

पण गांधीजी  आमचे राष्ट्रपिता आहेत - आणि संवाद्प्रिय लोकांचे राहतील - गांधियन परिभाषेत यालाच हिंदु म्हणत असावेत --- आज त्या जुन्या शब्दाला धार्मिक अर्थ प्राप्त झाल्याने --- आपण भारतिय  हाच राष्ट्रीय  शब्द वापरूया .

--------------------------------------------------------------------------------------------------
गांधी नावाचा एकच माणुस - हिंदु , मुस्लिम, दलित , सवर्ण , ब्राम्हण , बहुजन , ख्रिस्ती , कम्युनिस्ट  - या सर्वांच्याच विरुद्ध कसा काय असू शकतो ? आपले काही आकलन चुकते आहे काय ?
---------------------------------------------------------------------------------------------------

गांधी नसते तर हिंदुस्थान अखंड राहिले असते काय ? गांधी नसते तर दलितांना न्याय मिळला असता काय ? गांधी नसते तर हिंदु मुस्लिम प्रश्न उभाच राहिला नसता काय ? गांधी नसते तर …….

मी सांगतो आता ……. गांधी नसते तर … हा लेख मी लिहू शकलो नसतो . गांधी नसते तर भारतीयात संवाद कठीण होता …। गांधी नसते तर ……भारतात लोकशाही मार्गाने …. जनसामान्याच्या रेट्यात पहिले भारतीय आंदोलन लोकशाही मार्गाने उभे राहिले नसते ……

गांधीवाद हा शब्दच झूट आहे … गांधीवाद म्हणजे सतत मते बदल राहणे शिकत राहणे …. आणि लोकांच्या शिव्या खात राहणे ….

पुस्तका पलीकडे गांधी आहे . तो तुमच्या माझ्या मनात आहे …… कुरघोडी राजकारण आणि नथूरामचे उलट सुलट संदर्भ याहून गांधी मोठा आहे …. जातीय धार्मिक ऐतिहासिक संदर्भाहुन गांधी महान आहे . गांधी आहे तोवर चर्चा आहे …. गांधी आहे तोवर संवाद आहे …….

पुणे करारा पासून फाळणी पर्यंत आणि हिंदु मुस्लिम धर्म चर्चा पासून - संविधनापर्यंत - तो गांधी आहे तोपर्यंत ठीक आहे …

गांधीचे मतलबी विरोधक , परिस्थिती जन्य … गाउक समर्थक वा इतर कोणीही ….     त्यांना गांधी कळणार नाही ……. मलाही कळलेला नाही …कारण गांधी एक अतिशय सामन्य माणूस आहे …… सामान्य माणसाचे रसायन कोणाला समजत नाही …

गांधिजीचे वक्तृत्व शून्य … त्याना सावरकरांसारखी आक्रमक शैली नाही  , ने मजसी ने - अशी - उत्तुंग काव्य प्रतिभा नाही. गांधी दिसायला कसेसेच होते , त्यांचे कौटुंबिक जीवन एकदम बकवास आहे , गांधीजीची वकिलिसुद्धा कधी चालली नाही - गांधिंकडे डॉ बाबासाहेबांसारखि तीव्र बुद्धिमत्ता नाही - घटनाकारांची विद्वत्ता सुद्धा नाही, गांधिजिंकडे सुभाष बाबुंचे धाडस नाही , पंडित नेहरुंचे वलय नाही ……गांधी सामान्य मनुष्य ….

------------------------------------------------------------------------------
एक सामान्य  माणूस भारताचा राष्ट्रपिता होऊ शकतो  …… आणि सामान्य माणसाला राष्ट्रपिता बनवणार्या देशाला भारत म्हणतात …
----------------------------------------------------------------------------
जो पर्यंत भारत आहे तोपर्यंत गांधिजिंचा "आज" शी संदर्भ राहणार आहे. 

गांधिजिंवर हा शेवटचा लेख … या आधी दोन लेख   लिहिले आहेत … त्याचा उद्देश  - गोडसे विरुद्ध गांधी ------आणि गांधीजी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरातला संघर्ष टिपणे हा होता … त्या दोन्ही लेखांच्या लिंक्स इथे खाली देतो आहे . पण हा लेख लिहून झाल्यावर वाटतय - आधीचे लेख उगीच लिहिले !



(भाग - १ )
 गांधीहत्या आणि मी : माझा प्रवास :  नथुराम भक्ती ते गांधी समर्थक
मला समजलेले गांधीजी   (भाग - १ )http://drabhiram.blogspot.in/2013/01/blog-post_30.html


(भाग २ )
गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ? : काळाचा महिमा : अटळ संघर्ष 
मला समजलेले गांधीजी  (भाग २ ) :  http://drabhiram.blogspot.in/2013/10/blog-post.html












९ टिप्पण्या:

  1. सर, गांधी नंतर कोण असा सवाल आपण केला, भारताच्या स्वातंत्र्य मध्ये, नवीन समाजाला आकार देण्यामध्ये, modern politics मध्ये गांधीजी चा वाटा आहे पण अगदी सिंहाचा वाटा आहे असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल. बाबासाहेबांना दलित राष्ट्रपिता मानतात, राष्ट्रपिताच काय तर स्वताचा पित्या पेक्षाही अधिक मानतात, rightwing सावरकांना मानते, त्याच प्रमाणे महात्मा फुले, शाहू महाराज, भगत सिंग, सुभाषबाबू हे सर्वच जर नसते तर ????? कॉंग्रेस ला गांधीजी ची गरज होती म्हणून त्यांना कॉंग्रेस ने राष्ट्रपिता बनवला, गांधीजी नसते तर खूप काही मिस झाला असता असा आपल्या लेखातून अभिप्रेत होत आहे ते खरे नाही वरील सर्व देशभक्तांचा पंक्तीतच त्यांना बसावा... वर नको !!!!!

    उत्तर द्याहटवा
  2. सर गाधीना इतरां सोबतच राहु द्या गांधीशिवाय ही स्वतंत्र भारत असता

    उत्तर द्याहटवा
  3. गांधी ला कोणीच मानत नाही म्हणता हे बरोबर आहे. विदेशात hilter सुद्धा प्रसिद्ध आहे. गांधी ला ब्रीतीशनी यामुळे उदो उदो होऊ दिला कारण त्यांना हे मान्य करायचे न्हवते कि ते दुसर्या महा युद्ध नंतर परत भारतीय सैनिकांचा विद्रोह पेलू शकणार नाही . म्हणून असे दाखवल्या जाण्याचा प्रयत्न करतात कि शांती वाडी आहे म्हणून स्वातंत्र्य दिले. इतकेच शांती वाडी होते तर मग जालीयान्वाल्या हत्याकांड
    बद्दल किती काळ लागला माफी मागायला. विन्स्टन चर्चिल काय म्हणाला होता माहित आहे ?

    उत्तर द्याहटवा
  4. च्यायला पूर्ण लेख वाचल्यावर खात्री झाली, पूर्ण लेखच वाय झेड आहे. आणि जर सरळ मराठीत लिहा. कुठून वाचतात आणि कसा विचार करतात देव जाणे. गांधी काय किवा सावरकर काय किवा सुभाषचंद्र बोस काय सगळे राष्ट्रभक्तच होते. सगळ्यांचा सहभाग होता. पण त्यांचे राष्ट्रपिता म्हणून उगाच कौतुक केले गेले नाही. त्या मागे राजकारण होते. असो . आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही प्रत्येकाने ज्याचा त्याचा आवडता नेता पुजावा. त्यांना चूक म्हणणारे तुम्ही कोण ? गांधींची चांगली बाजू सांगा आणि त्य बद्धल आदर बाळगला जावा अशी अपेक्षा करा ठीक अहे. सगळी आझादी त्यांच्या मुळेच मिळाली.असा समज पसरवणे , तसेच त्यांचे चेले नेहरू आणि कंपनी यांच्या वरील अतीव आणि आंधळ्या प्रेमा मुळे त्यांच्या वरची श्रद्धा कमी झाली आहे. उगाच दुसऱ्याना दोष देऊ नका

    उत्तर द्याहटवा
  5. गांधी, बुद्ध आणि शाहरुख खान …

    या तिन्ही नावाना परदेशी जन सामान्याच्या मनात काही अर्थ आहे . >>>>>> यात एक नाव अजुन जोडा ते म्हणजे नरेंद्र मोदी या सर्वाना जगात माध्यमानी मोठ केल बुद्ध भिक्खुनी जगात पसरवला तर गांधी शाहरुख आणि मोदी माध्यमानी जगात पोहोचविला माझ्या मते फेमस असण्या पेक्षा विचारंवर कोणाचाही मोठेपण महत्वाच असत

    उत्तर द्याहटवा

  6. गांधिबाबा चि जात तेली (ओबीसी )  . या जातीची संख्या नगण्य .>>>> याच गोष्टीचा संदर्भ देउन आज काही गांधीवादी    फुले शाहु आंबेडकराना जातीचे महापुरुश ठरवण्याचा प्रयत्न करतायेत कारण का तर या महापुरषाना जातीच ठरवल्यावर जाती पार गेलेले गांधी ? चा प्रचार करायचा आहे त्याना प्रचार करायचा तो त्यानी करावा पण इतर महापुरुशाना जातिच ठरवुन त्यांचा अपमान करु नये गांधीच्या मागे जशी जात नाही तशी महात्मा फुलेंच्या मागेही जात नाही ते ज्या माळी समाजातुन आले त्यामाळी समाजातील 2-4% लोक महात्मा फुलेना आदर्श मानतात काय ? पण त्याना दलित समाज पुजनिय मानतो शाहु महाराजांच बोलाल तर कोल्हापुर सोडल तर मराठे शाहु महाराजाना आपल मानतात काय ? पण दलित समाज त्याना पुजनिय मानतो आता आपणच विचार करावा फुले शाहु त्यांच्या जातीचे नसुन सुद्धा आंबेडकरान इत्काच पुजनीय मानत असेल तर तो समाज गांधी त्यांच्या जातीचे नाहीत म्हणुन त्यांच्यावर टीका करत असेल काय ? ते गांधींवर टीका का करतात याचा विचार गांधीवाद्यानी करायच आहे उगाच गांधीना मोठ करायचय म्हणुन इतर महापुरुषाना जातिच ठरव्ण्याचा फालतु पणा करु नये 


    उत्तर द्याहटवा
  7. काही बहुजनवाद्याच म्हणन अस आहे की गांधी शुद्र आहेत म्हणुन त्याना बहुजनानी मानावे मुळात कोण ब्राह्मण व कोण शुद्र आहेत म्हणुन मानल जात नाही तर त्यांचे विचार काय या नुसार त्याना मानल जात याच बहुजन वाद्यानी भान ठेवायला हव एखादा ब्राह्मण ब्राह्मण्यवादी नसेल तर तो आदरास पात्र आहे व एखादा शुद्र ब्राहण्यवादी असेल तर तो आदरास पात्र नाही 


    खालील गांधीजींचे य.दी फडके यानी मांडलेले विचार बहुजन वाद्यानी नीट वाचावे 


    "नोव्हेंबर 1920

    सत्यशोधक समाज म्हणजे काय हे आपल्याला माहीती नस्ल्याचे सांगुन तो वर्णाश्रम व्यवस्था नष्ट करण्यास उद्युक्त झाला असेल तर ती फार वाइट गोष्ट आहे असे गांधीनी सांगीतले .

    आपण कट्टर हिंदु वैष्णव असुन आपण वर्णाश्रम धर्माचे कट्टर पाठीराखे आहोत असेही त्यानी जाहीर केले. ब्राह्मणांचा द्वेष करणे म्हणजे आपल्या हाताने आपल्या पायावर कुर्हाड पाडुन घेण्यासारखे ठरेल.असा महात्माजीनी ब्राह्मणेतराना इशारा दिला . वाइ सातारा निपाणि बेळगाव  वगैरे ठीकाणाच्या सभातुन गांधीनी ब्राह्मणांच्या तपस्येचे व त्यागाचे गुणगान केले आणि जगात आजवर जेवढे बलिदान ब्राह्मणानी केले तेवढे अन्य कोणेही केले नाही असे बजावले. निपणीच्या सभेत बेळगावचा मारुती राव रवण या मराठा गृहस्थानी ब्राह्मणानी ब्राह्मणेतराना खोटी शास्त्रे लिहुन वश केलेल आहे असा आरोप करताच गांधीजीनी त्या आरोपांचे खंडण केले "

    (विसाव्या शतकातील महाराष्ट्र- खंड 2 रा- य.दी फडके )


    (टीप.- फडके कोणतेही वादी असतील / नसतील पण ते आंबेडकरवादी नाहीत ) 





    उत्तर द्याहटवा
  8. Top !!
    I don't agree with your Atheist and So called Rational Understanding of everything, Dr.Abhiram .... But I have to expressly agree that you are the most pleasant and most innocent History-analyst and writer I ever read. You don't write with fixed intentions which is great strength you have ! How so ever may be our Disagreements, but I want to say thanks to you, man.... I learnt so many things sfrom your blog. The best thing I found there is the lesson: "Changing your believes when necessary is Humane, and not changing them is a Donkey-thing !"
    Best Wishes
    - Makarand Desai

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *